बदललेले घटक:
पर्ल कुसकुसच्या ऐवजी स्वीट कॉर्न
हरिसा / लाल कॉर्नच्या ठेच्याऐवजी शेझवान सॉस
टँगी योगर्ट सॉसच्या ऐवजी भोटोल चटणी
१) १ कप पर्ल कुसकुसच्या ऐवजी १ कप स्वीट कॉर्न - उकडून आणि मिक्सरमधून किंचीत भरडून
२) १ कप पालकाची कोवळी पाने - ब्लांच करून
३) कोथिंबीर + मिरचीची चटणी चवीनुसार
४) हरिसा पेस्ट किंवा लाल मिरच्यांच्या ठेच्याऐवजी शेझवान सॉस
५) रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार) - माझ्या आवडीप्रमाणे मी बारीक कापून घेतले
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे - इच्छा झाली
७) काकडीचे पातळ काप - हेही मी घरच्यांच्या खायच्या मर्यादांमुळे बारीक कापून घेतले.
८) १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ) - घेतले
९) बारीक कुटलेली मिरी चवीनुसार - घातली
१०) मीठ चवीनुसार - घातलं.
संयोजकांनी मोठ्या हृदयाने परवानगी दिल्यामुळे टँगी योगर्ट सॉसच्या ऐवजी भोटोल चटणी करून घेतली. तुम्ही कित्ती चांगले आहात हो संयोजक!
भोटोल चटणीसाठी लागणारं साहित्यः
१ छोटी भोपळी मिरची
१ टोमॅटो
लसणीच्या ३ बिया - सोलून
मीठ, साखर
सजावटीकरता -
१) टोस्टेड अक्रोड / बदामाचे काप - बदाम घेतले.
२) थोडी पार्स्ले / बेसिल / कोथिंबीर यांची पाने - मिरची+कोथिंबीरीचा ठेचा घेतला.
१.पाकृची सुरुवात खरंतर कुसकुसने करायची होती, पण मी भोटोल चटणीने केली.
*भोपळी मिरचीला तेल लावून ती गॅसवर भाजून घेतली.
(तिच्या पोटात सुरी खुपसून हे मी मुद्दाम नमूद केलं नाहीये, कारण सीमंतिनी लगेच हिंव्सक म्हणेल. रसिक जाणकार प्रेक्षक ते फोटोवरून जाणतीलच.)
*टोमॅटो मात्र तेल न लावताच भाजला. (टोमॅटोच्या आतला रस आणि सालाला लावलेलं तेल एकत्र होऊन आपल्याच हातावर उडालं तर? असं मला भ्या वाटतं.)
* लसणीच्या बिया सोलून ठेवल्या.
२. भोपळी मिरची आणि टोमॅटो गार होईपर्यंत मक्याचे दाणे उकडून घेतले. हे कुसकुस नसून मक्याचे दाणे असल्यामुळे दुप्पट झाले नाहीत, एक कपच राहिले. यावरून घटक पदार्थ बदलला असता वाढणीचे प्रमाणही बदलते हे सिद्ध झाले. आणि हे कुसकुस नसून मक्याचे दाणे असल्यानुळे मोकळेच राहिले. पण मग ह्यांची हंडीं झाली नसती, म्हणून मग ते मिक्सरमधून थोडे भरडून घेतले.
३. मग मी काकडी आणि लाल-पिवळी भोपळी मिरची बारीक कापून ठेवली. पालक स्वच्छ धुवून हाताने फाडून ब्लांच करून घेतला.
४. तोवर भोपळी मिरची आणि टोमॅटो गार झाले होते. त्यांचे तुकडे, लसणीच्या बिया, मीठ आणि साखर मिक्सरमधून व्यवस्थित बारीक केले. अश्या रितीने तयार झाली भोटोल चटणी.
५. मग भरडलेल्या मक्याच्या दाण्यांचे दोन भाग केले. एकात कोथिंबीर मिरचीची चमीठ, ऑऑ आणि मीठ घालून एकत्र करून घेतलं. दुसर्या भागात शेझवान सॉस आणि ऑऑ घालून एकत्र करून घेतलं.
६. आता हंडी रचायला सुरूवात.
७. आणि अशी तयार झाली मक्याची हंडी.
अथक प्रयत्नांती पाककृती
अथक प्रयत्नांती पाककृती प्रकाशित झालेली आहे. आधी लिखाण उडलं. मग फोटो अपलोड होत नव्हते. मग क्रोमवरून फाफॉवरून आयईवरून क्रोम अश्या उड्या मारल्या. तेव्हा कुठे सगळ्याचा ताळमेळ जमून आला. हा प्रयत्न तिखट असला तरी सर्वांनी गोड मानून घ्यावा ही हक्काची नम्र विनंती
अगदी कमी वेळात डोक्यावर बर्फाच्या लाद्या बिद्या ठेवून गणेशोत्सवाचे नेटके संयोजन केल्याबद्दल सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन!!
बक्षीसादाखल मक्याच्या हंडीचा हा काला
खूप कौतुक अन शाबासकी ...
खूप कौतुक अन शाबासकी ...
नेत्रसुख घेतले... रसनासुख शक्य होणे नाही ... घटक पदार्थ मिळवणे जिकरीच काम आहे...
छान कल्पना लढवलीय !
छान कल्पना लढवलीय !
तोंपासू रेसिपी. भोटोल चटणी
तोंपासू रेसिपी. भोटोल चटणी भारी लागत असणार..
छान
छान
झकास आयडिया आहे मक्याचे दाणे
झकास आयडिया आहे मक्याचे दाणे वापरण्याची. काला मस्त दिसतोय.
मस्त , खुप डोक चालवलस
मस्त , खुप डोक चालवलस मंजुडी . छान झाली पा. क्रु.
मस्तयं!
मस्तयं!
छान दिसतेय मंजूडी प्रयत्न
छान दिसतेय मंजूडी
प्रयत्न चांगला आहे.
भोटोल.....:फिदीफिदी:
मस्त आहे हा प्रकार. भोटोल
मस्त आहे हा प्रकार.
भोटोल
मस्त आहे. भोटोल नाव पण भारी
मस्त आहे. भोटोल नाव पण भारी आहे.
मस्तं झालीय पाककृती. लिहीलय
मस्तं झालीय पाककृती. लिहीलय पण छान. हे घेतलं, ते घातलं वगैरे चेकलिस्ट
सॉलिड दिसतेय आणि मेहेनतपण खूप
सॉलिड दिसतेय आणि मेहेनतपण खूप जाणवतेय. ग्रेट.
मस्तच!
मस्तच!
Tussi great ho _/\__ Awesome
Tussi great ho _/\__
Awesome disatay
मस्त!
मस्त!
मंजूडी, लिखाण, पाकृ आणि
मंजूडी, लिखाण, पाकृ आणि फोटो तिन्ही मस्त.
खूपच मस्तं. फोटोही खूप छान.
खूपच मस्तं. फोटोही खूप छान.
वॉव, मंजूडी मस्त झालीये पाकृ.
वॉव, मंजूडी मस्त झालीये पाकृ. .. लिहिलियेस ही मस्त खुसखुशीत!!!