मूळ घटक '१०-१५ कोवळी तोंडली' बदलून 'वाटीभर फ्रोझन मटर' घेतले आहे.
लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे घटक -
१) वाटीभर मटर
२) एक कांदा
३) ७-८ लसूण पाकळ्या
४) २ हिरव्या मिरच्या (ऐच्छिक)......तिखटपूड असल्यामुळे ईच्छा नव्हती
५) १०-१२ काड्या कोथिंबीर
६) डावभर तेल
७) अर्धी वाटी डाळं
८) अर्धी वाटी शेंगदाणे
९) पाव वाटी तीळ
११)१ मोठा चमचा धणेपूड
१२) १ लहान चमचा हळद
१३) १ लहान / मोठा चमचा तिखटपूड
१४) १ मोठा चमचा आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ........मी आमचूर पावडर वापरली.
१५) २ मोठे चमचे गोडा मसाला/ किचन किंग मसाला किंवा रोजच्या भाजी-आमटीला वापरू तो कुठलाही मसाला.........रोजच्या भाजीचा मसाला वापरला.
१६) अर्धी वाटी गूळ..................चवीनुसार वापरला.
१७) दीड मोठा चमचा मीठ
१८) कणीक
१९) पराठे भाजायला तेल
२०) पाणी
कृती -
१) चिराचिरी:
- कांदा, कोथिंबीर, मिरच्या हे घटक धुऊन बारीक चिरून घ्यावे.
- लसणाच्या पाकळ्या ठेचून बारीक चिराव्या.
२) मिक्सरमध्ये बारीक करणं -
- डाळं, शेंगदाणे, तीळ हे खमंग भाजून, गार करून, ह्या सगळ्यांची मिक्सरमधून (एकत्र) बारीक भुकटी करून घ्यावी.
३) फोडणी -
-कढईत तेल गरम करून चिरलेला कांदा घालून परतने. कांदा जरा शिजला कि लसूण, हळद, धनेपूड, तिखटपूड, गरम मसाला, आमचूर पावडर, मिक्सरमधून काढलेली भुकटी, चवीप्रमाणे गूळ, मीठ घालावं आणि मंद आचेवर परतावे. खुपच कोरडे वाटले तर पाण्याचा हबका मारावा.
नंतर मायक्रोव्हेव मधे गरम केलेले किंवा पॅनमधे परतून घेतलेले मटर बत्त्याने ठेचून वरच्या मिश्रनात घालावे. ४-५ मि. नंतर गॅस बंद करावा. आता त्यात कोथिंबीर घालून एकत्र करावे.
तयार पदार्थ असा दिसेल....
४) पराठ्यांसाठी पिठाचा गोळा तयार करणं -
- कणीक मळून घेणे.
५) पराठे करणं -
- कणीकेच्या वाटीत मटाराचे सारण भरून ती बंद करावी. सुरुवातीला भाकरी करतो त्याप्रमाणे हा गोळा हातात घेऊन दाबावा व चपटा करावा म्हणजे लाटायला सोपे जाते.
-तवा व्यवस्थित गरम करून, त्यावर आधी पराठे दोन्ही बाजूंनी चांगले शेकून, त्यानंतर वरून तेल सोडून भाजावे.
हे पराठे दही/ केचप/ लोणचे याबरोबर वाढावेत.
टिप : पराठे करायचा कंटाळा आला असेल तर मटर न ठेचता सारण करावे. मग त्या सारणामधे पाणी घालून त्याची ग्रेव्ही करावी. छान लागते.
हि अशी.......
या ग्रेव्हीत मटार ऐवजी तळलेले/ तेलावर परतलेले वांगे घातले तर जास्त छान लागेल असे मला वाटते.
बापरे, मटार बत्त्याने
बापरे, मटार बत्त्याने ठेचून!!! लईच हिंव्सक पाकक्रूती वो!!
पण कल्पना आवडली, सोपी आणि सहज.
मस्त!! सन्डला करावेत म्हंतेय!
मस्त!! सन्डला करावेत म्हंतेय!
मस्त! कल्पकताआवडली
मस्त! कल्पकताआवडली
बापरे, मटार बत्त्याने
बापरे, मटार बत्त्याने ठेचून!!! लईच हिंव्सक पाकक्रूती वो!! >>>> माझ्याकडे अगदी छोटुसा खल-बत्ता आहे.
मस्त..
मस्त..
इच्छा नव्हती मस्त दिसताहेत
इच्छा नव्हती
मस्त दिसताहेत पराठे! पहिला फोटो एकदम मस्त आहे.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
वॉव काय तोपासू रंग आलाय..
वॉव काय तोपासू रंग आलाय.. बघूनच तुटून पडावेसे वाटतेय, तसेही नाश्त्याची वेळ झालीच आहे आणि पराठे ऑल टाईम फेव्हरेट.. ज्या ज्या भाज्या मी खातो त्या प्रत्येक भाजीचे पराठे खाऊ शकतो..
वा मस्त .
वा मस्त .
मस्तं झालय प्रकरण.
मस्तं झालय प्रकरण.
मस्त दिसताहेत पराठे! पहिला
मस्त दिसताहेत पराठे! पहिला फोटो एकदम मस्त आहे.
मटर हे परफेक्ट रिप्लेसमेंट
मटर हे परफेक्ट रिप्लेसमेंट आहे. मस्त दिसताहेत पराठे.
छानच कल्पना, चवही छान असणार
छानच कल्पना, चवही छान असणार
वा मस्त जमलेत.
वा मस्त जमलेत.