आठवणीतल्या जत्रा

Submitted by गजानन on 22 September, 2015 - 07:02

अमा | 22 September, 2015 - 15:01

आणि केशरी किंवा हॉट पिंक कलरचा सिल्वर मुकुट घातलेला प्लास्टिकचा मारुती!!! गोल गोल फिरत
तारेवरून खाली येणारा?!

प्लास्टिकचा ग्रीन फ्रेम व लाल लेन्सेस चा चसमा?

आठ चित्रे कागदावर अ सलेला क्यामेरा?

सोनेरी व पां ढर्‍या प्लास्टिक च्या टोप्या व चकरे? हा सर्व माल चतरशिंगीच्या
जत्रेत पण असे. पण त्याचा बाफ येइल तिथे लिहू.

----------------------------

गणपतीबाप्पा आणि मी! या धाग्यावर अमांनी हे लिहिले आणि लहानपणी मनमुराद उपभोगलेल्या (!) सगळ्या जत्रा डोळ्यापुढे नाचू लागल्या.

सगळे लिहिण्याइतका आता वेळ नाही. तो मिळेल तशा इथे त्या आठवणी आणि गमतीजमती, किस्से इथे लिहू.

फक्त जत्रा स्पेशल.

जमतील तसे अशा गोष्टींचे फोटूही टाकू. Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे बालपण मालाडला गेले. जत्रेसाठी वगैरे गावाला जाणे व्हायचे नाही. पण दत्तजयंतीचा उत्सव मात्र अजून आठवतोय. आता दत्तमंदीरासमोर बांधकाम झालेय, पुर्वी तिथे मोकळे पटांगण होते. ते देऊळ म्हणजे आमचे फार लाडके ( ते फक्त गुरुवारीच उघडे असे, का आम्ही तिथे फक्त गुरुवारी जात असू ते आठवत नाही ) पण फार ऐसपैस देऊळ होते ते. मूर्ती अत्यंत देखणी.

दत्तजयंतीला त्या देवळाला रंगरंगोटी केली जात असे. पटांगणात झुलते पाळणे वगैरे असत.
साडेसहाचा जन्म म्हणून आमच्या दिवसभरात १५/२० फेर्‍या तरी होत. सुंठवडा तर मूठ मूठ भरून खात असू.
साडेसहाचा पाळणा आमच्या घरी सुद्धा ऐकू येत असे, पण आम्ही कुठे घरी थाबणार ?

तिथे मग रात्री उशीरा भजने चालत. त्याकाळी सिनेमाची गाणी लावत नसत. फार तर आर एन पराडकरांच्या रेकॉर्ड्स लावत ( अजित कडकडे तेव्हा गात नसावेत, पौडवालबाई पण नव्हत्या ) मला हे दत्तगुरु दिसले, हे गाणे पण लावत नसत. देवळात खुप गर्दी होत असे, देवळातले आमचे नेहमीचे बागडणे व्हायचे नाही.
देवळातली पालखी फक्त त्याच दिवशी वापरत असत. रात्री मिरवणूक निघे पण त्या मिरवणुकीत नाच वगैरे नसत, फक्त भजनी मंडळे असत.

अगदी भावपूर्ण वातावरणातला तो सोहळा असे.

मी परवाच जयवंत दळवींच्या 'भंडार्‍याचे हॉटेल' या कथासंग्रहात कोकणातील जत्रेचे वर्णन वाचले आणि साधारण ३०-३२ वर्षांपूर्वी मी गावाला पाहिलेल्या जत्रेची आठवण झाली. पेट्रोमॅक्स्च्या प्रकाशात उजळलेला विठ्ठलाच्या देवळाभोवतालचा परीसर, अचानकपणे एका दिवसात उभी राहिलेली छोटी दुकाने - त्यात स्वस्त खेळण्यापासुन लाडु-खाज्यांपर्यंत सगळी दुकानं होती. एकीकडे भजी तळणं सुरु होतं. सोरटाची दुकानं तर भरपूर. पिपाण्या-फुगे यांसाठी लहानग्यांची भूण्भूण.. त्यातच रात्री सुरु होणार्‍या दशावतारासाठी जागा पकडण्याची बाया-बापड्यांची लगबग. आणि प्रथमच पाहिलेले जुगाराचे पट! वेड्यासारखे गावातले बाप्ये पैसे लावत होते, जिंकले की पुन्हा लावत आणि हरलेले मग उदास चेहरा करुन हळुच पाय काढता घेत. रात्री १-१.३० ला दशावतार सुरु झाला. मामा मोचेमाडकरांची कंपनी होती आणि आमच्याच गावातले आणि नात्यातले वसंतमामा कृष्णाची भूमिका वठवत होते, मी पाहिलेला पहिलाच 'लाईव्ह' दशावतार! हनुमान आल्यावर मधेच प्रेक्षकातुन उठुन कोणितरी पाया पडला आणि त्याला लाडुंची पुडी दिली. रामाला १ रुपया दक्षिणाही दिली गेली. पहाटे कधितरी दशावतार संपला आणि त्याबरोबर जत्राही. दुसरा अख्खा दिवस सगळं गाव झोपेत होतं.

हे सगळं माझ्यासाठी नविनच! अजुनही ते सर्व लख्ख आठवतंय. आणि पुन्हा अनुभवायला मिळणार नाही म्हणुन थोडी खंतही! असो.