"चित्रचारोळी क्र.६"

Submitted by संयोजक on 22 September, 2015 - 04:49

असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्‍या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
Happy

पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.

आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्‍या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्‍या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!

तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. Wink इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!

तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!

१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला 'लाइक' करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.

तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!

आजचे चित्र:
Slide9_0.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सखी असावी सावली सारखी.........
सखी असावी सावली सारखी,
मी भावनाविभोर कधीतरी,
ती मात्र निश्चल उभी.

आभा वाह!

हसर्‍या लख्ख प्रकाशात
सार्‍या जगाचीच की साथ
अंधार पडू देत जरासा
सावलीही सोडेल मग हात

चाकोरीतल्या अरुंदश्या

चाकोरीतल्या अरुंदश्या वाटेवर
घरंगळून तुला चालत नाही
सोनपिवळे स्मितहास्य तुझे
लवभरी तरीही लोपत नाही

माबो गणेशाला
गळाभर झेंडूहार
असा मारला सिक्सर
की दुर गेला चेंडू पार

कैच्याकै र ला र Proud

खो खो च्या खेळाला
लागत नाही चेंडू
दोघी मिळून रचुया चारोळी
हास पाहू आता! नको माझ्याशी भांडू Proud

घे अजुन एक कैच्याकै

उन्हं चढली डोक्यावरती; आई बाबा हाक मारिती
अर्ध्यावरती डाव टाकुनी; चिंटू पिंटू घरात पळती
वाट पाहतो बालचमूची; हसतमुखाने कट्ट्यावरती
नको सोडू मज बालगोपाला; जीवन सार्थक तुझ्याच हाती