Submitted by अभय आर्वीकर on 22 September, 2015 - 00:10
चुलीमध्ये घाल
मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल
जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?
बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल
कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल
साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल
या मातीचा लोळ एकदा क्षितिजे भेदुनी मार
चिंब न्हाऊ दे दिगंताला रंग दे लालीलाल
'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर
खूप सुंदर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
छान!
छान!
फारच आवडली.
फारच आवडली.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
कविता आवडली. कवितेचे शिर्षक
कविता आवडली.
-
कवितेचे शिर्षक आणि नवीन लेखन मधील नावे वापरुन अजून एक (काहिच्या काही) कविता होईल
आयटी आणि भाकरी, चुलीमध्ये घाल
माझं काय चुकलं?, चुलीमध्ये घाल
रंगीबेरंगी पुलाव, चुलीमध्ये घाल
सुरक्षितता वगैरे..., चुलीमध्ये घाल
पुण्यातले पुणेकर, चुलीमध्ये घाल