'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी बदलून "शिंगडया"

Submitted by देवीका on 21 September, 2015 - 00:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मूळ कृती इतकेच सर्व जिन्नसांचे प्रमाण:

बदललेले घटकः
३ कप गाजराचा किस= बारीक रवा
१ कप चणाडाळ = १ कप दूधीचा किस

१) ३ कप बारीक रवा
२) १ कप दूधीचा किस पाणी काढून,
३) अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर (चवीप्रमाणे कमी-जास्त)
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर

नोटः मी इथे सेमोलिना पीठ वापरले आहे कारण घरात तेव्हा तेच उपलब्ध होते. त्यामुळे रंग फिक्कट पिवळसर दिसतो आहे.

क्रमवार पाककृती: 

१) रव्यात, अर्धा टेबलस्पून तूप कडकडीत तापवून टाकावे. व रवा झाकून ठेवावा.
२)मग लागेल तसे पाणी घालून अतिशय कडक नाही किंवा नरम नाही असा रवा भिजवून ओल्या कपड्याने झाकून ठेवावा.
३) अर्धा तासाने पुन्हा मळावा. व ओल्या कपडाने झाकून ठेवावा.
४) आता वरील तूपामधील, अर्धा टेबल्स्पून तूपात दूधीचा कीस छान परतून घ्यावा.
५) उरलेल्या अर्धा टेबलस्पून मधे, ओले खोबरे परतून, मग साखर घालून नेहमीसारखाच चव परतून झाला की दूधी एकत्र करून मग नेहमीचे यशस्वी कलाकार(वेलची, जायफळ, केसर) घालावेत.
६) आता पीठाची एक पोळी लाटून, थोडे थोडे तूप(उरले सुरलेले) लाटून सुरनोळी करावी. व त्याचे लात्या कापाव्या.
७) करंजीच्या आकारात , दूधी व खोबर्‍याचे सारण भरून घ्यावे व त्याला कडेने दुमडीचे झालर करावी. हिच त्याची खासियत आहे.
८) अवनला १६० डिग्री सेल्सियस ला आधी अर्धा तास एका बाजूला मग दुसर्‍या बाजूला खरपूर भाजाव्या.
८) अतिशय सुंदर चवीच्या शिंगड्या तयार.
शिंगडी तयार होताना
shingadi1.jpg

बेक करण्यापुर्वी
shingadi2.jpg

बेक केल्यावर
bakedshingadi_0.jpg

आतले सारण
bakedshingadi2.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

१. स्पर्धेसाठी करायच्या असल्याने, नाहीतर नुसत्या दूधी हलव्याच्या करतात. बरेच दिवस टिकतात.
२. शिंगडया ह्या पारंपरीक पाठारे प्रभू रेसीपी प्रमाणे भट्टीतच भाजून आणतात. तळत नाहीत. दिवाळीला करतात. Happy
३. नुसत्या नारळ ,साखर आणि भरपूर सुका मेवाच्या सुद्धा असतात.
४. माव्याच्या सुद्धा करतात.
५. खिमाच्या सुद्धा करतात.
६. खरे तर ह्या साठाच्या करतात. पण तूपाचे प्रमाण तितकेच ठेवायचे असल्याने एक सुरनोळी करून केल्यात. तरी खुसखुशीत झ्याल्यात.
७. पारी नुसत्या मैद्याची सुद्धा करु शकता. किंवा ३ कप मैद्याला, २ टेबलस्पून रवा वापरू शकता.

माहितीचा स्रोत: 
पाठारे प्रभू खासियत मध्ये थोडा बदल करून.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही झालर कशी घालायची ते मला कोणीतरी दाखवा. मी खुप वेळा प्रयत्न केला पण जमतच नाही.

शिंगड्या मस्त झाल्यायेत.