असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.
आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!
तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!
तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!
१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला 'लाइक' करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.
तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!
आजचे चित्र:
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
झाली किती उन्हे ही पसरून
झाली किती उन्हे ही
पसरून भोवताली
छाया लपून मागे
का ही मुकाट झाली?
काढावे लागले पडदे काच जरी
काढावे लागले पडदे
काच जरी तापली
बील भरलं नाही म्हणून
वीज ना हो कापली
दूर क्षितिजावर पाहून किरणे
दूर क्षितिजावर पाहून
किरणे सोनेरी,
लोपला माझ्या मनातला अंधार,
अन दिली उभारी.
काँक्रीटच्या जंगलात हिरवाई हि
काँक्रीटच्या जंगलात
हिरवाई हि लोपली
इमारतींच्या ओझ्याखाली
धरणीमाई वाकली
नलिनी true.
नलिनी true.
दिस उगवती, मावळती सरती
दिस उगवती, मावळती
सरती ऋतू....
मी इथे... कुठे तू?
मी इथे... कुठे तू?
(शेवटच्या २ ओळी प्रशांत दामलेच्या एका नाटकातल्या आहेत.)
मस्तं सोनू!
मस्तं सोनू!
उंच ऊंच गेली पोचली शिखरावर
उंच ऊंच गेली
पोचली शिखरावर बाहुली
सोबत तिच्या राहिली
एक तिचीच सावली
वाह ऋन्मेष!
वाह ऋन्मेष!
मस्त चालू आहे... अजुन
मस्त चालू आहे... अजुन येउद्या!
माजलेले घोर जंगल हरवलेली
माजलेले घोर जंगल हरवलेली वाटुली
मावळत का सूर्य नाही, प्रश्न करते साउली
नांदतो कल्लोळ का बाहेर आणिक आतही
चेहरा हरवून बसली माणसाची जात ही!
जग तुझे होते आज माझ्या
जग तुझे होते
आज माझ्या पायाशी
माझ्या जगात मात्र
मी एकटीच होते
अहाहा.... स्वाती, कसल उच्च
अहाहा.... स्वाती, कसल उच्च लिहलय!
Wah swati Agadich samarpak
Wah swati
Agadich samarpak
कवटाळून दु:खे, घडीही
कवटाळून दु:खे,
घडीही विस्कटली,
जगण्यातली सापेक्षता,
उंचावरुन उमगली.
आठवणींच्या दूरदेशी, कितीक वाट
आठवणींच्या दूरदेशी,
कितीक वाट पाहणे झाले,
दिवसामागून दिवस उलटता,
एकांताचे जगणेच नशिबी आले..
स्वाती आवडली... 'चेहरा हरवून
स्वाती आवडली...
'चेहरा हरवून बसली माणसाची जात ही!' << सही...
ह्या जगाचा कोलाहल बघून माझे
ह्या जगाचा कोलाहल बघून
माझे आकाश मी सिमित करते
निमुटपणे मी बसते घरात
आणि खिडकीतून जग न्याहळते!!!
बी मस्तच...
बी मस्तच...
दुनियेपासुनी दूर लपून
दुनियेपासुनी दूर लपून छपून
वाट किती रे पहायची
थकली रे माझी सावलीही
त्यात भीती एकटेपणाची