तेचबूक ! - आईआज्जी यो

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 September, 2015 - 17:37

मी मराठी सिरीअली पौर्णिमा अमावस्येच्या मुहुर्तावरच बघतो. त्यामुळे फारश्या डिटेलिंगच्या अपेक्षा ठेऊ नका.
..................

आईआज्जींचे तेचबूक अकाऊंट !

(ज्यांच्यामते या दोन भिन्न बायका आहेत त्यांनी आत्ताच घरी जा आणि पोगो बघा)

तेचबूक स्टेटस
आईआज्जी यो -- कमिंग सून Happy

श्रीरंग गो. - आईचा घो ! अजून एक सून ... होणार या घरची

घरातल्या बायका - आन दो, आन दो ..

जान्हवी गो. - आईआज्जी नको हो. नको हो. अजून नऊ महिने थांबा की हो Sad
[डिसलाईकड् बाय - रंजलेले गांजलेले प्रेक्षक]

शशीकला - बाई बाई बाई..

जान्हवीचे बाबा - तू गप्प बस कला

कला - पण मी म्हणते, का गप्प बसू मी? आता एका बाईने बाई बाई बाई पण नाही म्हणायचे का?

बाबांचा रिप्लाय - ह्म्मम ............. मीच गप्प बसतो.
[डिसलाईक - मालिकेचे तमाम ‘पुरुष’ प्रेक्षक]

अदिती - ईश्श! आता होऊ दे दुरावा.. होणार सून मी या घरची Blush
[लाईकड् बाय जयचे अन्ना]

जयचा रिप्लाय - ए अदिती, हे काय मध्येच. ही चिटींग आहे. आणि जर असे असेल तर मी सुद्धा येणार तुझ्याबरोबर..

अदिती - जय, वेडा आहेस का तू?

जय - अदिती, पण आपले लग्न झालेय.

अदिती - ए चूपे माकडा. तेचबूकवर बोल्लास ते ठिकाय, पण फेसबूकवर बोलू नकोस. नोकरी जाईल तुझी. माझे काय, मी चाल्ले गोखले गृहउद्योग करायला.
[लाईकड् बाय जयचे अन्ना]

जय - अन्ना तुम्ही का तिच्या पोस्ट लाईक करताय Uhoh

अण्णा - तस नाही, पण म्हटलं श्रीरंग गोखले ऑपरेशन करून देतात. Wink
[लाईकड् बाय जान्हवीचे बाबा]

जय - च्याईला ! ए अदिती, मग माझे पण बघ ना. मी सुद्धा तिथे कुठे अ‍ॅडजस्ट होतोय का?
[लाईकड् बाय सरू मावशी]

जय - हायला सरू मावशी, खर्रच !
वीरू को मिली बसंती और जय को मिली मौसी ..
आता होऊ दे खर्चा.. होणार जावई मी या घरचा Blush

जान्हवी - हू हू हू .. काहीही हा श्री !

श्री - तेचबूकवर सुद्धा तेच तेच नको ग्ग जानू. ती जयची पोस्ट आहे, माझी नाही.
[लाईकड् बाय - लाखो करोडो वैतागलेले प्रेक्षक]

रजनी - लै लय लई.. ले लई लैयी..

जय - ए अदिती, या लैयलाला समजले सारे.

कदम काका - घाबरू नका रे पोरांनो. ती ‘लै लय लई’ तिची ऑटो पोस्ट आहे. दर तासाला पडत असते. तिला काही समजले नाही, घ्या एडीट करून पटपट.
[लाईकड् बाय - जय, अदिती अ‍ॅण्ड सरू मावशी]

-------------------------------------------------------------------------------------------------------

दुसर्‍या दिवशी ...

आईआज्जी यो - अरे बाबांनो ‘सून’ म्हणजे मराठी नाही ईंग्लिश ‘Soon’ ..
Coming Soon .. लवकरच येतोय Happy

श्रीरंग गो. - आईआज्जीच्या गावात.. वाचलो..

१ प्रेक्षक - आम्ही पण !
[लाईकड् बाय - लाखो करोडो होरपळलेले प्रेक्षक]

गरीबांचा पिंट्या दादा - पण मग नक्की येतोय कोण?

आईआज्जी यो - अरे येऊन येऊन येणार कोण ...

श्रीरंग गो. - आणखी कोण, आणखी कोण, गणपती बाप्पा! ए नाचो, आपले बाप्पा येणार..

श्री चे काका - अरे नाही रं येड्या, ते केव्हाचेच आलेत. म्हणजे आता तू पप्पा होणार Happy

पिंट्या दादा - म्हणजे.. म्हणजे.. मी मामा होणार.. गरीबांचा पिंट्या मामा होणार !

१ प्रेक्षक - फायनली !!!
[लाईकड् बाय - तमाम स्त्री-पुरुष आबाल-वृद्ध सुजाण-अंजान हैरान-परेशान प्रेक्षक]

परिणामी, आई आज्जींचे तेचबूक अकाऊंट चार दिवसांसाठी हॅंग !!!!!!!!!!!!!!!!

-------------------------------------------------------------------------------------------------------

पाचव्या दिवशी ....

आईआज्जी यो - अरे बाबांनो ते एवढ्यात कुठे.... फारच आशावादी दिसताहात Proud

तर, महाराष्ट्राच्या ईकलौत्या अन उगवत्या सुपर्रस्टारचा सिनेमा येऊ घातलाय..
ढॅंग टॅ ढॅंग ..
.......... मुंबई पुणे मुंबई - द्वितीय Happy

[लाईकड् बाय - रिशी पकूर]
[ईन्फायनाईट डिसलाईकड् बाय - तमाम माबोकर]

मायबोली आठ दिवसांसाठी हॅंग !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

Lol Lol Lol Lol

दिनेशदा,
जगातले मोस्ट अवेटेड बालक एका मराठी घरात जन्म घेतेय एवढी माहिती तर असेलच Happy

बाकी शेवटच्या ट्विस्टमागे धाग्याला टीआरपी मिळवून देणे एवढाच प्रामाणिक हेतू होता Wink

Pages