असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.
आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!
तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!
तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!
१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला 'लाइक' करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.
तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!
आजचे चित्र:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
तुझ्या भेटीच्या रंगाने येई
तुझ्या भेटीच्या रंगाने
येई आसमंती लाली
पाहू रेशम केसांचे
तुझी हॅट ठेव खाली
अ आणि अ चारोळी.

तिला आवडतो पास्ता त्याला
तिला आवडतो पास्ता
त्याला कचोरी खस्ता
दोघेही दगडावर बसून
चाखती चोप्सुई अमेरिकन ( त्या दोघांच्या पाठीमागच्या 'लाली' ला समर्पित )
अजून एक अ आणि अ... कैच्याकै !
जनरितींचा जुनाट गुंता सोडून
जनरितींचा जुनाट गुंता
सोडून आलो दोघे आपण
नाते आपले लखलखणारे
पसरू दोघे प्रेमचांदण
लाली तव गालीची पसरली
लाली तव गालीची
पसरली आसमन्ती
तुझ्याविना सखये जीवनी
नाही कसलीच आसक्ती
जरी तू खूप सामान्य
जरी तू खूप सामान्य दिसतेस
माझ्यासाठी तू रोझ असतेस
romantic जॅक मी तुझ्यासाठी
सारे जगच 'टायटॅनिक'आपल्यासाठी
तुझ्याकडे पाहण्यात. झालो मी
तुझ्याकडे पाहण्यात.
झालो मी दंग,
आजुबाजुला बहरला,
तुझ्या गालाचाच रंग.
लाल या रंगात जीव तुझा का
लाल या रंगात
जीव तुझा का गुंतला
सरक थोडी बाजुला
बसायला नाही जागा मला
अजून एक अ आणि अ... कैच्याकै !
आज सगळे टीपीच्या मूड मध्ये
आज सगळे टीपीच्या मूड मध्ये दिसतायत
हाती गुलाब माझ्या केसही मुक्त
हाती गुलाब माझ्या
केसही मुक्त तुझे
काढ टोपीस आता
डोईवरी का ओझे
(अगदीच ट ला ट ;))
रेशिम लडीवाळ जाई घासून तुझ्या
रेशिम लडीवाळ जाई
घासून तुझ्या मानेला
टोपी काय नि बर्मुडा काय
........सर नाही कशाची जॅकेटला
विनिता मस्त.
विनिता मस्त.
प्रेरणा : बीच्या चित्रचारोळी
प्रेरणा : बीच्या चित्रचारोळी १
नकळत त्या क्षणी सये जीव हा
नकळत त्या क्षणी
सये जीव हा गुंतला
प्रीत ही तुझी माझी
रेशीमगाठी या नात्याच्या
--------------------------------------------------------
अगदीच सो सो प्रयत्न आहे इथल्या दिग्गजांच्या तुलनेत .
प्रेमात पडल्यावर अगदी काहीही
प्रेमात पडल्यावर
अगदी काहीही होऊ शकत
कणकेच्या शेवयाला
लाल रंग चढू शकतो!!!!
तू माझी गर्लफ्रेंड मी तुझा
तू माझी गर्लफ्रेंड
मी तुझा बॉयफ्रेंड
माबोकरांनी पकडला
दोघांना रेड हॅण्ड
(लोहाच्या तुकड्याचे मूर्तीत
(लोहाच्या तुकड्याचे मूर्तीत रुपांतर..)
अनादी मी अनंत मी
रूपे माझी अनेक
सोसुनी अंगी ज्वाला मुशीत
जन्मलो लेऊनी रुपेरी वर्ख !
लाल रेशमी जादू भोवती हात
लाल रेशमी जादू भोवती
हात घेउनी तुझाच हाती
विसर जगाला विसर गुंते
आहे अतूट अपुले नाते
लाली पसरली चोहीकडे तुझ्या
लाली पसरली चोहीकडे
तुझ्या माझ्या प्रीतीची
कोरून ठेवू अशीच आठवण
अखंड अपुल्या साथीची