गिर्या स्टेटस : न्यु टॉय इन द टाऊन - आयफोन 6S. काल रात्रभर लाईनीत उभा राहून आयफोन ६S मिळवला. य्येस! #Iphone6S #Goodtimes #Firsttoget #Haapy #intheclouds
लाईक्स सत्या,सुन्या, मोहन, रावडी राठोड, दंबग मन्या, केतकी, रेवती,मेघना अॅन्ड २७ मोअर.
रावडी राठोड : अबे गिर्या, रात्रभर जागून, लाईनीत उभा राहून फोन घेतलास, त्यापेक्षा TEला तेवढा अभ्यास केला असतास तर पास झाला असतास.
गिर्या : राठोड, इथे पास होण्याचे काय आहे? आज बघ मी अमेरिकेला आहे. BE न काढताच.आणि तू बसलास तिथेच.
केतकी अॅट १:१० पिएम : हो. इथे आहेस रे. पण Uber चा ड्रायव्हर म्हणून. ( लाईक्स रावडी राठोड, दंबग मन्या, रेवती,मेघना ) -
गिर्या अॅट १:१० पिएम : आता घरातले भांडण तू इथेही आणतेस का?
केतकी एडीटेड अॅट १:१३ (संपूर्ण लाईन गायब आणि त्याजागी केवळ अशी टिकली
गिर्या : एडीटेड अॅट १:१४ (संपूर्ण लाईन गायब आणि त्याजागी केवळ अशी टिकली
मन्या: तुला केवढ्याला मिळाला?
गिर्या : $१९९ ला
मन्या : सही बे. इथे ६५,००० ला आहे, आणि तुला १३,००० ला?
डिंकी अॅट १:१२ ) गिर्या तिकडे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासला कमीत आय फोन मिळतो का रे?
लाईक्स रावडी राठोड, दंबग मन्या, रेवती,मेघना
सुन्या : आयफोन मध्ये काय पडलंय एवढ? अॅन्ड्रॉईड वापर. This phone is piece of shit ! सगळं काही प्रोप्रायटरी असतं अॅपलवाल्यांमध्ये. बॅड पिपल. नो डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. भंगार फोन #applesucks
तात्या : आर यु क्रेझी? तू आयफोन हातात तरी घेऊन बघीतला आहेस का?
सुन्या : यु सीम टू बी अनावेअर ऑफ द बेनिफिट्स ऑफ अॅन्ड्रॉईड!
तात्या : अरे भाऊ आधी मराठी सरळ मराठी मध्ये टाईप कर. इंग्रजीतून नको सांगू.
सुहास : अॅन्ड्रॉईड रॉक्स
शमी : काय रॉक्स? अॅन्ड्रॉइड इज अ रॉक !
युजर १ : अबकड
युजर २ : एबीसिडी
ही रॅन्ट चालूच आहे.
नम्रता : मी अॅपल डेव्हलपर आहे, आय कॅन टेल यु ऑल द बेनिफिट्स ऑफ IOS ९
मन्या : किंमत कमी करायला सांगा.
सुन्या : नाही तर काय. अॅन्ड्रॉइड बघा कशी समाजवादी रचना आहे. ३००० रू च्या फोनवर पण अॅन्ड्रॉइड. यु गाईज आर सो कॅपिटलिस्टिक मेंटॅलिटी. भंगार फोन #applesucks
नम्रता : अहो तो टॅग तुम्ही आधीही वापरला आहे. म्हणूनच तर मी इथे लिहिले. आता आणखी चार लोकं येतील. भोआकफ.
तात्या : भोआकफ. - म्हणजे तुम्ही मायबोलीवरच्या दिसत आहात. काय आयडी आहे तुमचा.
नम्रता : हो तात्या. सही, तात्या तुम्ही पण माबोकर का? वी गाईज रॉक !
रेवती : वॉव जबरी, मी अमेरिकेत राहिले असते तर मी ही घेतला असता, पण इथे भारतात ६५,००० ला आहे.
लाईक्स : सत्या, डिंकी, पिंकी, आयेशा, गिर्या, मन्या
गिर्या : भारतात कशाला गेलीस मग परत? इथेच राहायचे की ! लाईक्स : रेवती
सत्या : सरळ सांग की ६५००० ला परवडत नाही म्हणून.
रेवती : अरेच्चा, आता ह्यात परवडणे काय आले? आय फोनला ६५,००० कोण शहाणा घालेल?
मेघना : माझ्या नवर्याने घेतलाय ! ( ६ लाईक्स)
डिकी : आय अॅग्री. ६५,००० मध्ये ५ मोटो जी येतात.
मेघना : कैच्याकाय. म्हणे ५ मोटो जी. काहीही हं डिंकी ! उद्या ७००० च्या फोनला म्हणशील, अर्धा मोटो जी येतो.
जान्हवी ( मेघना ची मैत्रीन) : मेघना "काहीही हं" वर माझा प्रताधिकार आहे.
श्री : वॉव ६५,००० किंमत आहे का? मग आयफोन मला ही हवाय.
जान्हवी : काहीही हं श्री ! लाईक्स १७६३०३२३
मस्त!
मस्त!
"काहीही हं" वर माझा
"काहीही हं" वर माझा प्रताधिकार आहे. >>
लै भारी! Uber चा ड्रायव्हर
लै भारी! Uber चा ड्रायव्हर म्हणून
(संपूर्ण लाईन गायब आणि
(संपूर्ण लाईन गायब आणि त्याजागी केवळ अशी टिकली स्मित)
>> हे भारी आहे!
सुन्या : यु सीम टू बी अनावेअर ऑफ द बेनिफिट्स ऑफ आयफोन.
>> इथे काहीतरी गडबड झालीय का?
अरे वा.. मस्तंच. अस्सेच संवाद
अरे वा.. मस्तंच. अस्सेच संवाद वाचलेत कसल्याकसल्या बुकांवर. टडोपा!
(No subject)
स्वरूप ते अॅन्ड्रॉईड हवे.
स्वरूप ते अॅन्ड्रॉईड हवे. बरोबर केले आहे.
धन्यवाद सर्वांना.
मस्तं!
मस्तं!
झ्याक! काय पण म्हणा
झ्याक! काय पण म्हणा अॅन्ड्रॉईड रॉक्स!!
मस्तय.
मस्तय.
लई भारी आहे हे।। खुप आवड़ले॥
लई भारी आहे हे।। खुप आवड़ले॥
लई भारी आहे हे।। खुप आवड़ले॥
लई भारी आहे हे।। खुप आवड़ले॥
(No subject)
मस्त आहे हे
मस्त आहे हे
(No subject)
मस्त. कॉलेजच्या भाषेत ६५०००
मस्त.
कॉलेजच्या भाषेत ६५००० म्हणजे ... म्हणजे १३००० वडापाव येतील. भारीच म्हणजे.
(No subject)