अंबाबाई:
========================================================================
घुले मास्तरीन : मले म्हाईत हाय वं माय खबर सगळी
अंबाबाई: मायबाई तुले तं पयले म्हाईत रायते सार्या गावायच्या खबरा सांगू नको वो माय कोनाले
पाटलीन बाई: मले पन माईत हाय व तू काहून हासली
अंबाबाई: आत्ता!! तुले कस काय माईत?
पाटलीन बाई: म्या पायल व्हत तुले कांबळीनच्या घरुन कुरोड्या पापड्या घेऊन जाताना
टेलरीन बाई: सांगू कावं मी? मले माय सांगावच वाटून र्हायल
अंबाबाई: तू सांगून तं पाह्य !! बिब्बा घालीन तोंडात
डाक्टरीन: ट्रे माह्या घरचा नेला व्हता त्वा अन हे म्हावाली हिन्ट हाय
मठवाली बाई : अव अंबे सकाई त्वा दोन किलो मठ घेतले तवाच म्या वयखल वं माय
भुरी: बाई बाई बाई काय माय तवाच लावल. एक जन सांगत नाई. मी कवाची रीफ्रेश मारत हाय. मायबाई माय धुन र्हायल, भाकरी र्हायल्या. संत्या शाळेतून येईन त थयथय नाचीन आता. सांग व माय काय झाल.
भाजीवाली: लाळू ठेवजो वो अंबे मले. मले तू खबर सांगू नको पन लाळू ठेवजो
अंबाबाई: काव भुरे तू त घराच्या भायर निंगत नाही अन म्हंते मले खबर सांग. जाय नाई सांगत.. बस घरात अंडे देत
भुरी: मायबाई तुले काय सांगू आमच्या घरचा उतावळा!! हन्यासून आनल व माय! अन संत्याचा बाप इतका निपत्तर हाय कि तुले काय सांगो माय माली जिंदगानी काय हाय
परमिला: अव माय लय चांगल झाल त्वा म्हाया घरुन सातरी नेली म्हनून झाल व माय त्वाय काम सातरी पाठोजो वो माय
अंबाबाई: परमिले तुया वाली सातरी रुतली व माय माह्या घरच्या पावन्याले
परमिला: मांडीवर बसवाच ना मंग रुतली त
डाक्टरीनः माडीवर पन घेऊन जाजो वो माय
अंबाबाई: मायबाई परमिले..डाक्टरीने लाज सोळल्ली व माय त्वा
अंबुआजी : अंबे मले पन म्हाहीत हाय अन सार्या गावाले म्हाहीत हाय खबर काय हाये तं.
अंबूआजी : माय रांगोळी कोन काळ्ळी व तुया अंगणात आज. तुया पोरान पिच्चर लावले तेचबुकावर?
किरान्यावाली: जुळ्ल का व पोरीच ? तुया नवरा आल्ता दुकानात चार खेप सामाईन घ्यायले. तवाच म्या वयखल रेखी च जमल म्हनून
अंबुआजी: माय किरानेवाले तुया पोटात एक गोष्ट रायत नाही व माय
किरान्यावाली : तु काय इमान देनार व्हती खबर दाबून ठेवाले
भुरी: मायबाई रेखी च लगन जुळल त मले सांगतल नाई फक्त नाई जमल की मायापाशी रळाले येत तू थांब आता अंबे आलीच तुया घरी लाळू खायले
अंबाबाई: बर व बायायनो .. म्या चाल्ली आता. उद्याले पोरीच कुकु हाय. त येजा सगळ्याजनी कुकाले. भुरे येताना चौरंग आनजो. परमिले तू येताना कपबशा आनजो व माय. या मंग उद्या ५ ले. अन लवकर येजा सैपाकायले बाया पायजेत व माय
(सगळ्याजनी एकमेकींचे स्टेटस लाईक करतात. आणि दुसर्या दिवसी समोरासमोर कुंकवाला भेटतात.)
हे तेचबुक स्टेटस आहे की
हे तेचबुक स्टेटस आहे की तेचबुक ग्रूप चॅट?
बात कुछ जमीं नहीं
जे काय असेल ते असेल पण
जे काय असेल ते असेल पण सगळ्यात भारी लिहिलयस बी !
छानच आहे. तेचबुकावर गप्पा
छानच आहे. तेचबुकावर गप्पा मारतातच की! मस्तं जमलय बी.
ओडी, स्टेटसवरचे प्रतिसाद आहेत
ओडी, स्टेटसवरचे प्रतिसाद आहेत हे.
बी, एकदम फिट्ट!
बी, एकदम फिट्ट!
बी, भारीच एकदम!!
बी, भारीच एकदम!!
मस्त.
मस्त.
वाचायला मजा आली
वाचायला मजा आली
मस्त.. आवडलं मला.
मस्त.. आवडलं मला.
मस्तय..
मस्तय..
आवडलं . मस्त!
आवडलं . मस्त!
भारीय
भारीय
भन्नाट! काही काही ओळी
भन्नाट! काही काही ओळी समजल्याच नाही .पुन्हा पुन्हा वाचल्यावर अर्थ कळले या. भाषेची जम्मत काही वेगळीच आहे.
oh my my .... कित्ती माय.
oh my my .... कित्ती माय.
छान लिहिलंय. भाषा गोड आहे.
मस्त आहे. व्हॉट्सअॅप चाट
मस्त आहे. व्हॉट्सअॅप चाट जास्त वाटतंय खरंतर. पंण वाचायला भारी.
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त रे बी
मस्त रे बी
मस्त रे बी
मस्त रे बी
मस्त.
मस्त.
मजा आली वाचायला. लाळू म्हणजे
मजा आली वाचायला.
लाळू म्हणजे काय?
लाडू
लाडू
मस्तं, आवडलं.
मस्तं, आवडलं.
मस्त.. आवडलं मला
मस्त.. आवडलं मला
लाडू द्या पाटउन
लाडू द्या पाटउन
क्या बात है फारच मस्तं
क्या बात है फारच मस्तं लिहिलंय, बी. खूप आवडलं.
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.
(No subject)
मी हे आज पुन्हा वाचले बी.
मी हे आज पुन्हा वाचले बी. काही सुटलेले अर्थ पुन्हा लागले. भाषाच मुळात ऐकाबोलायला मजेशीर आहे
बी मस्तच लिहिलं आहेस.
बी मस्तच लिहिलं आहेस.