असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
स्मित
पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.
आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!
तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. डोळा मारा इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!
तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!
१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला 'लाइक' करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.
तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!
आजचे चित्र:
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
डोळे थकले, पायही थकले वाट
डोळे थकले, पायही थकले
वाट पाहतो थकला जीव
कासावीस मी जाण्या मुक्कामी
एस्टीमाते आता तरी धाव
बघ ही गर्द हिरवळ नको फिरवू
बघ ही गर्द हिरवळ
नको फिरवू पाठ
वसंत जरी संपला
उमेदीने काढ वाट!!!
आठवं!! कधी काळी ह्याच
आठवं!! कधी काळी ह्याच वाटेवर
आपण दोघे खेळलो-कुदलो होतो
भविष्याला कधीही न घाबरता
प्रत्येक क्षणाला उपभोगल होतं!
झाला पॅकअप, उतरवू आता
झाला पॅकअप, उतरवू आता मेकअप
भूमिकेतून दोघे बाहेर येऊ
फ्रेश होऊन, सिगारेट शिलगावून
नेहमीच्या बारमध्ये जाऊ
कुण्या गावचा कुठला थांबा वाट
कुण्या गावचा कुठला थांबा
वाट पाहतो; बाप ऊभा हा
लेक माझी ती सासुरवाशीण
सणासुदीला तीची आठवण..!
चल उठ मित्रा नको कंटाळा
चल उठ मित्रा नको कंटाळा करु
ह्या काठीची गुल्लेर बनवून
पाठीमागच्या झाडावरच्या
गाभुळलेल्या चिंचा पाडू
तसे केव्हाच सरले बहर
तसे केव्हाच सरले बहर हिरवे
वठाया लागली ही अंगकाठी
तरी रस्ता फुटे रस्त्यास तोवर
अखंडित चालणे आहे ललाटी
स्वाती किती क्युट
स्वाती किती क्युट
धन्यवाद.
धन्यवाद.
ह्या बायकांचा रोजचा करवाद सण
ह्या बायकांचा रोजचा करवाद
सण आलेत की गळे काढतात
जरा काही नाही मिळाले की
नवर्यांना रडवून घराबाहेर काढतात
(दादोबाची बकरी हरवलीय,
(दादोबाची बकरी हरवलीय, म्हातार्या गड्याला घेऊन तो शोधतोय )
दादोबा दादोबा नको रे बा..
संग तूझ्या ना येणार बा
चालता चालता दुपार टळली
तरी न दिसते तुझी ती बकरी.. !
(राजकुमार मोड ऑन) जानी (मोड
(राजकुमार मोड ऑन)
जानी (मोड ऑफ) माझी पोर चार बुका शिकली
टेचात उभा राहुन मी सेल्फी आज ठोकली
गड्या तुझ्या लेकीला शाळंत का नाही घातली
चिंतामणी झाला तुझा कंबर पण वाकली.
सगळ्यांच्याच चारोळ्या
सगळ्यांच्याच चारोळ्या भारी
चंबू..... बकरी
बी.... गुल्लेरचे ऑब्झर्वेशन भारी!
स्वाती कमाल!
दोघांनी कापले सारखेच अंतर,
दोघांनी कापले सारखेच अंतर, वाटा जरी निराळ्या
वाटचालीच्या खुणा त्यांच्या अंगावर विसावल्या
एक अजूनही ताठ, दुजा जरा थकलेला
पोचणार दोघे एकाच धामी, पल्याडल्या.
पंचवीस गेले पाच राहिले सुरू
पंचवीस गेले पाच राहिले
सुरू जाहली पानगळ
अजून किती कापायचा रस्ता
जीव झाला विव्हळ!
ऊठ गड्या, बसू नकोस थकून असे
ऊठ गड्या, बसू नकोस
थकून असे चालायचे नाही
नाना, मकरंदला गाठायला हवय
जगण्याची उमेद सोडायची नाही
कुणाला चालायचे भय कुणाला
कुणाला चालायचे भय
कुणाला काठीची सय
मागच्या हिरवाईला मात्र
ना कसली चिंता ना भय
गाठली वयाची साठी हातात आली
गाठली वयाची साठी
हातात आली काठी
का उगा हात ललाटी?
ऐश करु सोडून जगरहाटी
मी बी येतो गड्या नको पाठ
मी बी येतो गड्या
नको पाठ फिरवू
वाईच विसावा घेऊन
साथ तुझी धरतो
चल उठ पटकन्या मॅरेथॉन पुर्ण
चल उठ पटकन्या
मॅरेथॉन पुर्ण करुच
वीस किलोमीटर झाले
पहिले दुसरे बक्षिस मिळवू
आयुष्याच्या सायंकाळी उन्ह
आयुष्याच्या सायंकाळी
उन्ह सोसतो रणरणते
वाट पहाणे उरते हाती
दैव कुणाला कळते
बगुनाना बगुनाना बगताय
बगुनाना बगुनाना बगताय काय
"ती" फटाकडी परतून येईल काय ?
लाडात येऊन उल्लू बनवून
पाकिट मारून पळाली की वं माय !!
तसे ओळखीचे आहेत रस्ते तसा
तसे ओळखीचे आहेत रस्ते
तसा ओळखीचा आहे प्रहर
परतून यावे कुणी ओळखीचे
परतून यावा माझा बहर
बरं वाटेना दोस्ताला | वहान
बरं वाटेना
दोस्ताला |
वहान मिळेना
रस्त्याला |
धाप लागली आयुष्याला चढ संपता
धाप लागली आयुष्याला
चढ संपता संपत नाही
बसवत नाही बसकण मारून
वणवण ही जाईना संपुन ….
देवा मस्त जमलीय चारोळी
देवा मस्त जमलीय चारोळी
राहिले ते गाव पाठी दूर हिरवे
राहिले ते गाव पाठी
दूर हिरवे सोहळे,
रानचकवा पावलांना
प्राणपारवरू तळमळे...
गर्द हिरवे रान जंगली कुठे
गर्द हिरवे रान जंगली
कुठे हरवली "पाने पिकली?"
एकाला आधार काठीचा
दुसर्याची का 'आर्तच' विरली?
का रे बाबा असा तू डोक्याला
का रे बाबा असा तू
डोक्याला हात लाऊन बसला..?
विचार करतोय एवढ्या उन्हात,
तू स्वेटर कसा घातला ....? :p
रणरणत्या उन्हात या, सारा काळ
रणरणत्या उन्हात या,
सारा काळ आटून गेला..
केस पिकले, शरीर थकले,
जीव वाट पाहू लागला...
मित्रा पैलतीरी नजर लावून, होऊ
मित्रा पैलतीरी नजर लावून,
होऊ नकोस उदास,
निसर्ग बघ कसा प्रसन्न भोवताली,
दोघेही घेऊ त्यात मोकळा श्वास.
अंजु ,सुंदरच!!!
अंजु ,सुंदरच!!!
सगळ्यांच्याच भारी आहेत
सगळ्यांच्याच भारी आहेत चारोळ्या.
गात्र हि शिणले साथही सुटली
गात्र हि शिणले
साथही सुटली सोयऱ्यांची
आपले आपण भक्कम होऊ
मित्रा, शोधू वाट नव्या सुखाची