स्टेटस अपडेट : रिद्धी-सिद्धी
एकदाची गणेशाची स्वारी आज त्याच्या वार्षिक टूरवर गेली. आता दहा दिवस मी पण मज्जा करणार. शॉपिंग, मैत्रिणींबरोबर भटकणं आणि कैलासावर स्कीइंग ..... यिप्पी!!!!
आता परत येतील तर स्वारीला पुन्हा डाएटिंग करायला लावलं पाहिजे. आता कुठे फोर पॅक्स दिसायला लागले होते तर गेला मोदक आणि मिठाई रिचवायला..... हम्म्म.
लाईक्स : ८४१७५८९८६९९५९७१७७१७४१८७८१५९८६९०९६०८९२७८१७८९४.......
कार्तिकेय : यो! वहिनी. धम्माल कर.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी
भक्त पुरुष : तुम्ही एकच आहात की दोन? रिद्धी आणि सिद्धी अशा दोघीजणी आहेत ना?
रिप्लाय (रिद्धी-सिद्धी): रिद्धी माझं माहेरचं नाव आणि सिद्धी सासरचं. मी सिध्धी-साध्धी म्हणून सिद्धी. बायका दोन दोन आडनावं लावतात. मी दोन दोन नावं लावते.
लक्ष्मी : मस्तच. मी येतेय अर्ध्या तासात तुझ्याकडे. तुझी स्पेशालिटी असलेलं आईसग्लासमधलं ब्रह्मकमळ आणि सोमरसाचं कॉकटेल तयार ठेव. नंतर मला ऐश्वर्या साडी सेंटरमध्ये जायचंय ते जाऊयात.
लाईक्स (३) : रिद्धी-सिद्धी, सरस्वती, ऐश्वर्या साडी सेंटरचा मालक
सरस्वती : वा वा, गेला का नवरा टूरवर! मी उद्या येईन. आज वीणावादनाचे विद्यार्थी येणार आहेत. त्यांचा क्लास संपेपर्यंत उशीर होईल. आमचा मोर ओव्हर टाईम करायला तयार नसतो. त्याच्या लांडोरी वाट बघत असतात ना!
लाईक्स (१) : मोर
रिप्लाय (मोर) : ये दिल मांगे मोर (सुट्ट्या)!
रिप्लाय (कार्तिकेय) : अगं तुझं मॉडेल बदल. माझा मोर बघ कधीही कुठंही यायला तयार असतो. पृथ्वीप्रदक्षिणाही घातलेय मी त्याच्यावरून.
लाईक्स (१) : सरस्वती
डिसलाईक (१): मोर
शंकर : तुझ्या सासूबाईही चालल्यात गं परवा. मग मी ही जरा एकटाच भटकायला जाईन माझ्या शाळूसोबत्यांना भेटायला - विष्णु क्षीरसागर आणि ब्रह्म देव यांना. तुला आणि तुझ्या मैत्रिणींना स्कीइंग करायचं असेल तर घराच्या चाव्या नंदीपाशी देऊन ठेवीन.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी
रिप्लाय (रिद्धी-सिद्धी): यु आर सो कूल!
रिप्लाय ( कार्तिकेय) : बाबा, मी पण येऊ का?
रिप्लाय (शंकर) : चालत जाणार आहे मी. येणार का?
रिप्लाय (कार्तिकेय) : नक्को. मी मोरावरून जाईन.
रिप्लाय ( शंकर) : गेलास उडत!
पार्वती : जपून स्कीइंग करा गं पोरींनो. लागलं, खरचटलं तर फडताळातलं कैलासजीवन लावा. आणि हो, मागच्यावेळेसारखं धांदरटासारखं दार बंद करायला विसरू नकोस.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी, लक्ष्मी, सरस्वती
रिप्लाय (रिद्धी-सिद्धी): हो सासूबाई. तुम्ही काळजी करू नका. या तीन दिवसांनी.
भक्त स्त्री : ओ आय अॅम सो जेलस! म्हणजे, आम्ही इथे तुझ्या नवर्याची सरबराई करणार आणि तू मज्जा करणार!
लाईक्स (३४३९५१५८९७४५८७८९४५......) : पृथ्वीवरले काही भक्त
डिसलाईक (१) : रिद्धी-सिद्धी
रिप्लाय (रंगू ऊर्फ रँगेलिना) : ओ ताई, कामं तर मीच करतुया न्हवं! सुट्टी दिली नाय ना तुमी. येऊंद्यात की गणपतीबाप्पास्नी.
मामी, _/\_ क ह र!
मामी, _/\_
क ह र!
मस्त!
मस्त!
ये लगा सिक्सर और मामी फिर
ये लगा सिक्सर और मामी फिर चॅम्पियन....!
जाबरी !!
जाबरी !!
झकासच जमलय हे तेचबुक
झकासच जमलय हे तेचबुक
मस्त मामी! फॅमिली डायनॅमिक्स
मस्त मामी! फॅमिली डायनॅमिक्स सहीच आहेत. प्रत्यक्ष गणपतीचा तेचबुकावर विश्वास नाही की काय. किंवा ऑन्रूट कवरेज कमी पडलेले दिसतेय.
बापा तेबु वर नाहीयेत :प
बापा तेबु वर नाहीयेत :प
रिद्धीसिद्धी : @मृदुला,
रिद्धीसिद्धी : @मृदुला, बाप्पा आउट ऑफ कव्हरेज एरिया आहेत. पृथ्वीवरून तिकडच्या तेचबुकाला अॅक्सेस नाही.
@रि.सि. व्हाया भरत: बाकी
@रि.सि. व्हाया भरत: बाकी भक्त, रँगेलिना वगैरे कसे काय लिहितायत मग? (म्हणून ऑन्रूट कव्हरेज नाहीये का असा अंदाज केला होता. म्हणजे इथे पोचले नाहीत, पण तिकडून निघालेत अश्या मधल्यावेळेत हा संवाद घडलेला दिसतोय.)
भन्नाट.! आयडिया ची कल्पना
भन्नाट.!
आयडिया ची कल्पना भारीच.
भारी!
भारी!
@मृदुला : यु आर राइट.
@मृदुला : यु आर राइट.
सगळ्यांना धन्यवाद. बाप्पा
सगळ्यांना धन्यवाद.
बाप्पा ट्रान्झिट मध्ये आहेत हो. शिवाय पुढच्या १० दिवसांचं लॉजिस्टिक्सही सांभाळायचंय त्यांना. तुमच्या आमच्यासारखं नेटवर पडिक राहणं कसं जमणार? बाप्पा की भावनाओं को समझो.
मामी, भन्नाट कैलास जीवन
मामी, भन्नाट
कैलास जीवन
लैच भारी!
लैच भारी!
मस्त गं मामी! खुसखुशीत लिहिलं
मस्त गं मामी! खुसखुशीत लिहिलं आहेस एकदम!
मामी! अफाsssssट! नंबर
मामी! अफाsssssट! नंबर वन!
ऐश्वर्या साडी सेंटर वाल्याचं लाईक - जबरदस्त!
कैलासजीवन - अफलातून!!!
मला वाटतं बाप्पांनी रि.सि. ला अन्फ्रेंड केलं असावं!!! शिंचे घरी-दारी हिचे स्टेटस कोण बघणार???
मस्त लिहिलय मामी. पण लक्ष्मी
मस्त लिहिलय मामी. पण लक्ष्मी बाई शॉपिंगला पाहिजेतच.
मस्त लिहिलेय मामी!
मस्त लिहिलेय मामी!
आत्ता एकदम लक्षात आलं की हे
आत्ता एकदम लक्षात आलं की हे तेचबुक काळाच्या पुढे दिसतंय! मार्क कालपरवाच म्हणाला की डीसलाईक बटन देऊ लवकरच पण तेचबूकात हे बटन आहे ऑलरेडी
मस्तच!!
मस्तच!!
वेड!! भन्नाट मामी!!
वेड!! भन्नाट मामी!!
(No subject)
मामी तोडलंत. एकूणएक फटका
मामी तोडलंत. एकूणएक फटका सीमापार !
झक्कास. साडिसेंटर मालकाच्या
झक्कास. साडिसेंटर मालकाच्या लाइकची आयडिया भन्नाट. ३च लाईक्स आहेत तिथे. लय भारी
मस्त
मस्त
खूपच भन्नाट...
खूपच भन्नाट...
खतरा मामी.
खतरा मामी.
लाईक्स (१००००): असामी, ......
लाईक्स (१००००): असामी, ......
जबरदस्त, रॉकिंग.
जबरदस्त, रॉकिंग.
Pages