गणेशोत्सवानिमित्त चार शब्द......

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 12 September, 2015 - 13:09

गणपती साधेपणाने साजरा करा असे उपदेश पर्व सुरु झाले .प्रत्येक सणाआधी या पावसाळी छत्र्या उगवतात .पूर्वी बेडूक ओरडायला लागले कि पाऊस लवकरच येणार हे कळायचे तसे या पोस्टना सुरवात झाली कि सरत्या श्रावणाची उन्हे ओटीवर आल्यासारखा भास होतो

.मी या छान सार्वजनिक उत्सवात सहभागी होवून त्याचे रूप पालटेन,टिळकांना अभिप्रेत असलेला उत्सव साजरा करण्यासाठी सहभागी होईन हे नाहीच .बंद करा हा मार्ग सगळ्यात सोप्पा .उत्सवाचा बेंगरूळपणा,आवाजाचे प्रदूषण हे मी बाहेर राहून नाही तर त्यात सहभागी होवून कमी करेन अस का नाही वाटत ?

दुसरा प्रश्न दुष्काळाचा ,मान्य अगदी मान्य कि शेतकऱ्यांची हलत खरच वाईट आहे ,त्यांना सढळ हस्ते मदत करणे नितांत गरजेचे आहे पण प्रत्येक उत्सव ,आनंद याच्याशी त्याची सांगड घालायलाच हवी का ? छान उत्सवही साजरा करा आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात हि द्या .जे लोक उत्सव करू नका किवा साधेपणाने करा म्हणत आहेत त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे कि आत्तापर्यंत स्वतःच्या खिशाला दुष्काळग्रास्तानसाठी या लोकांनी किती चाट दिला आहे ?

शेतकऱ्यांसारखेच इतर बलुतेदारांचे हे कमाईचे दिवस आहेत .मूर्तीकार,फुलवाले ,मंडपवाले ,लाईट ,साउंड सिस्टीम ,स्वीटवाले ,मोदक विक्रेते ,गणपतींच्या दागिन्यांचे विक्रेते,कीर्तनकार ,कलाकार अशा असंख्य कुटुंबाच्या हाती या दहादिवसात किवा उत्सव काळात ४ पैसे खुळखुळतात .उत्सव हि एक मोठी बाजारपेठ आहे .

रोजमरा जीन्दगीतील हे आनंदाचे क्षण असे सुतकी का करायचे ,त्या पेक्षा प्रत्येक गणेशोत्सवाच्या मंडपात एक टेबल टाकून प्रामाणिकपाने दुष्काळ निवारणनिधी गोळा करा ,लोक यावेळी प्रसन्नचित्त असतात भरपूर पैसे जमा होतील .
गणपतीबाप्पा मोरया .

साभार - श्रीनिवास जी चितळे साहेब

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users