नागपूर सहल - ३

Submitted by bvijaykumar on 11 September, 2015 - 11:25

नागपूर सहल - ३

दुस-या दिवशी नागपूरातील गांधी सागर, रामन सायन्स सेंटर, शून्य मैलाचा दगड, रेल्वे संग्रहालय, महाराजा बाग, पंजाबराव देशमुख शेतकी विद्यापीठ ही ठिकाणे पाहीली .

सर्वप्रथम गांधी सागर ... मला वाटतं हे सरोवर सध्या वापरात नसावं ... अगदीच दुरावस्था झालेलं वाटलं ... मन थोडं नाराज ही झालं ... पाण्याचे स्त्रोत असे दुरावस्था झालेलं पाहावत नाही . पण नजाकत भरलेलं ते लेणं पाहणं एक वेगळा अनुभव होता.
gandhisagar2.JPGghandhi sagar1.JPG
(माहित गारांनी गांधी सागर चा इतिहास सांगावा, प्लीज... आंतरजालावर खूप शोधण्याचा प्रयत्न केला आहे )

तदनंत र .. शून्य मैलाचा दगड..
0 mile marker1.JPG

या शिल्पाला भेट दिल्याशिवाय नागपूरात आलेल्या प्रवाशाने नागपूर सोडू नये पण याची माहीती देण्यास नागपूर वासीय उदासिन वाटले एका बुजूर्ग व्यक्तीने एवढेही म्ह्ट्ले. " काय आहे तेथे ? एक पुतळा तर आहे " .... पण आपल्या देशाची आगामी पिढी त्याबाबतीत नागपूरात आश्वासक वाटली एका शाळकरी मुलाने नुसता पत्ता नाही सांगितला तर, शून्य मैलाचा दगड पाहण्याविषयी आग्रह ही केला
0 milemarker5.JPG

" शून्य मैलाचा दगड " या इतिहासविषयक व भौगोलिक देखण्या शिल्पाभोवती प्रचंड गवत माजले आहे. पुरातत्वीय खाण्याचा निळा बोर्ड ही तेथून पसार आहे.
0 mile marker4.JPG0 mile marker2.JPG

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुक्रवार तलाव आधी चांद (हा बहुधा गोंड राजा असावा) नावाच्या राजाने बांधला होता. नाग नदीच (तेव्हा ती नदीच होती, आता नाला झालाय) पाणी तिकडे वळवून केलेला.

नंतर भोसल्यांच्या काळात त्याच अजून सुशोभीकरण झाल. टेकडी गणपती ते महाल ह्या भागापर्यंत त्याचा विस्तार होता. भोसले राजे त्यांच्या महालातून जलविहार करत टेकडीच्या गणपतीच दर्शन घ्यायला जायचे अश्या आख्यायिका सांगतात लोकं.

नंतर ब्रिटिशांनी तो रेल्वे लाईन टाकण्यासाठी बुजवला. आणि आत्ताचा उरलेला आहे.

शून्य मैल म्हणजे झिरो मैल दगड. ब्रिटीश कालखंडात जेव्हा भारताचा सर्व्हे पूर्ण झाला, तेव्हा नकाशाच्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम टोकांना जोडणाऱ्या रेषा ह्या ठिकाणी एकमेकांना छेदल्या गेल्या. It was center of British India, Geometrically. आजही तसा प्रयोग केल्यास नागपूरच्या जवळपास रेषा इंटरसेकट्ट होतात.

हुश्श. अजून काही लागल्यास सांगा Lol प्रयत्न करून बघेल Happy

बाकी झिरो मैलचा कचरा झालाय. ४ ५ वर्षाआधीपर्यंत नियमित साफ सफाई होत असायची आणि बरा दिसायचा स्पॉट. आता नेमकी काही माहिती नाही.

हो अनिरुद्ध,
तो गोंड राजाच होता..
देवगड चा राजा बख्त बुलंद होता. १८व्या शतकात त्याने नागपुर सुद्धा त्याच्या साम्राज्यात सामिल केल त्याचा चांद सुलतान हा वारस..

ध न्य वा द ! ...वर्षू नील , टीना, सकुरा , अनिरुद्ध_वैद्य

********************************************************************************************