नमस्कार !
मायबोली गणेशोत्सव २०१५ च्या उपक्रमांचा श्रीगणेशा करत आहोत आपल्या छोट्या दोस्तांच्या आवडीच्या कार्यक्रमाने! दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या पाल्यांसाठी सादर करत आहोत एकापेक्षा एक उत्साहपूर्ण उपक्रम.ह्या वर्षी शाळेतल्या ताई-दादांसाठी आपण एक नवीन उपक्रम आणला आहे - चित्र काढून रंगवणे.
उपक्रमाची माहीती -
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
४) वयोगट - ६ ते १५
५) चित्र काढून रंगवायचं आहे.
६) चित्रासाठी विषय -
१. माझी खोली
२. माझा आवडता पक्षी \ प्राणी
३. माझे आवडते वाहन
७) चित्रं पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १७ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
८) 'मायबोली गणेशोत्सव २०१५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
९) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
चित्र अपलोड कशी करायची त्याची माहीती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.
१०) एक पाल्य एकापेक्षा जास्त चित्र काढू शकतो. तसेचं एकाच पाल्याची प्रवेशिका बाप्पा इन टॉप गिअर व ज्युनिअर चित्रकार दोन्हीसाठी देऊ शकता.
११) प्रवेशिका ज्युनिअर चित्रकार - < विषय> - पाल्याचे नाव या नावाने द्यावी.
१२) चित्रं गणेश चतुर्थीपासून, १७ सप्टेंबर २०१५ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २७ सप्टेंबर २०१५ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतीलं.
ज्युनिअर चित्रकार, मग बाप्पाला तुमची कला दाखवून खुश करणार ना ?
गणपती बाप्पा मोरया !!!!
गणपती बाप्पा मोरया !!!!
आमची एंट्री दोन्हीकडे
आमची एंट्री दोन्हीकडे पडणार...
आमची एंट्री दोन्हीकडे
आमची एंट्री दोन्हीकडे पडणार...>> सेम पिंच!
धन्यवाद!
धन्यवाद!
संयोजक - हे कुठे लिहावं कळत
संयोजक - हे कुठे लिहावं कळत नाहीये, म्हणून इथेच लिहिते.
लहान मुलांसाठी सगळे उपक्रम मस्त आहेत. एक सुचवावंसं वाटतं. मुलांसाठी काही लिहीण्याचा उपक्रम आयोजित कराल का? त्यानिमित्ताने मुलं मराठीतून लिहीतात. तेव्हढाच मायबोलीची नवीन पिढी उभी करण्यात हातभार.
गणपती बाप्पा मोरया !!!! मस्त
गणपती बाप्पा मोरया !!!!
मस्त उपक्रम
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!