हुंदके

Submitted by गजानन रताळे on 8 September, 2015 - 01:12

हुंदके

शब्द सारे भूकेच होते
बोलणारे मुकेच होते

आटले आसवे घनांचे
दाटले हुंदकेच होते

गाव माझे दिसे न तेव्हा
भोवताली धुकेच होते

मी न दारी उभा सुखाच्या
दुःख ही लाड़केच होते

दान त्यानी दिले जरी पण
हात हे फाटकेच होते

काय बोलू अजून आता
अंतरात इतकेच होते
-गजानन रताळे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा...खासंच!
एकूण गझल नी खयाल खासंच!

>>>मतल्यात एका मात्रेचा फरक दिसतो...
ती सूट म्हणता येईल का?

>>>आटली आसवे घनांची...
असं अधिक बहरदार राहिल का?
(कृ.गै.न.)

सत्यजित सर टी चूक typing mistake झाली माझी परंतु मी खुप आभारी आहे ।। आणि चुका कळवत रहा।