अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम .. अत् अस् लम ..
पुर्ण ऑडिटोरीयम या गर्जनांनी दणाणून उठले होते. आमचाच ग्रूप यात आघाडीवर होता. थोडे ओळखीपाळखीचेही त्यात सामील झाले होते. ईतरांची काय बिशाद जे या आवाजाला दाबायला जातील. जेमतेम चारपाचशे मुलांना सामावून घ्यावा इतका तो हॉल. मात्र त्याला हजारोंच्या स्टेडियमचे रूप आले होते.. आणि ट्रिंग्गग ऽऽ .. त्याने गिटारवर एक झंकार बीट् देताच क्षणार्धात सारा माहौल शांत.. पण क्षणभरासाठीच.. आणि पुन्हा एकवार भयंकर मोठा जल्लोष ..
आणि तो गाऊ लागला ..
दूरीऽऽ .. दू री ऽऽऽऽऽ सही जाये ना ऽऽ .. हो ओ हो ऽऽ सही जाये ना ऽऽऽ आआ ऽऽऽ
काळजालाही छाती फाडून बाहेर येत त्याच्या सोबत गावेसे वाटावे असे ते शब्द न तो आवाज कानात शिरत होता..
खामोशिया ये सह ना सकू ...
आवाज दे के मुझे तू दे जा सुकून ..
सर्वांचा उत्साह तसाच ठेवत त्याने दुसरे गाणे घेतले..
पहली नजर मे कैसा जादू कर दिया..
तेरा बन बैठा है मेरा जिया..
ओ जाने जा दोनो जहा ..
मेरे बाहो मे आ भूल जा
आणि पाठोपाठ आतिफ अस्लमच्या गाण्यांची एक ‘रेस’च लागली
या सर्वांत परीक्षक शांत होते. निव्वळ त्यांनाच शांत करणे हा आमचा हेतू होता.
जेव्हा त्या आमच्या मित्राला स्टेजवर विचारण्यात आले होते, की स्पर्धेसाठी तू आता कोणाचे गाणे गाणार आहेस.. तेव्हा आतिफ अस्लमचे नाव घेताच त्याच परीक्षकांमध्ये हास्याची खसखस पिकली होती. त्यांचे तेच हसणारे दात आता आम्हाला त्यांच्याच घशात घालायचे होते.
-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
आतिफ अस्लम !
आमच्या कॉलेजलाईफची सुरुवात आणि त्याच्या कारकिर्दीची सुरुवात बहुधा एकाच वेळची.
त्याच्या "आदत" या एका गाण्याने आम्हाला त्याचा फ्यानक्लबात नेऊन बसवले. तेव्हा आमच्या दर वाक्यात "अब तो आदत सी है मुझको, ऐसे जीने मे.." हे पालुपद असायचेच. त्यानंतर त्याने काही गायले नसते तरीही आम्ही आजीवन त्याचे फ्यान बनून राहिलो असतो.
पण त्याला तेवढ्यावरच थांबायचे नव्हते.
त्यानंतर एका पाठोपाठ एक हिट गाण्यांचा त्याने धडाकाच लावला. मी तर तेव्हा, जेव्हा केव्हा गायचो, त्याचीच गाणी गायचो. आवाजही माझा बरेपैकी त्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा, त्यामुळे लवकरच मी `गरीबांचा आतिफ अस्लम' म्हणून ओळखलो जाऊ लागलो.
(माझ्या आवडत्या गाण्यांची लिस्ट लेखाच्या शेवटी दिली आहे)
पुढे ईंजिनीअरींगला देखील सुदैवाने म्हणा वा योगायोगाने, मला जो ग्रूप मिळाला त्यातही सारे आतिफचेच फ्यान. त्यात एक जण तर कमालीचा सुंदर गाणारा होता आणि त्याचाही आतिफ लाडका होता. आता तो सिनिअर आतिफच्या नावानेच ओळखला जाऊ लागला आणि मी बनलो ज्युनिअर आतिफ. पण मी यातही खुश होतो.
बस्स आमचा तोच मित्र त्या दिवशी कॉलेजतर्फे ईंटरकॉलेज सिंगिंग कॉम्पिटीशनला कोण जाणार याच्या सिलेक्शन स्पर्धेत उतरला होता.
तर,
त्या दिवशी आम्ही आतिफच्या नावाने माहौल केला, मात्र परीक्षकांनी याचा वचपा अंतिम निकालात काढला.
पहिल्या तीन क्रमांकात तो आमचा ‘आतिफ मित्र’ कुठेही नव्हता, ना उत्तेजनार्थ बक्षीसांच्या यादीत होता.
पण सारे निकाल जाहीर झाल्यावर कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाकडून एक घोषणा झाली.
त्याने मुलांचा मिळवलेला रिस्पॉन्स आणि जिंकलेली मने बघता, त्याला फायनल ईयरच्या सेन्ड ऑफ पार्टी म्हणजेच निरोप समारंभात, कॉलेजच्या मैदानातील स्टेजवर गायचा बहुमान मिळणार होता.
तो हरूनही जिंकला होता...
आणि आमच्यासाठी आमचा आतिफ अस्लम जिंकला होता..
-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
आज फार काही वर्षे झाली नाहीत त्या घटनेला. पण हल्ली आतिफची गाणी मुद्दामहून ऐकणे होत नाही. त्या दिवशी कोणीतरी ऑफिसमध्ये आतिफचे एक गाणे लावले होते. ‘हम किस गली जा रहे है.. अपना कोई ठिकाना नही’ ... दुसरा कोणीतरी ओरडला, काय रेकतोय हा.. तेव्हा मात्र चीड नाही आली त्या कोणाची. उलट ऑफिसच्या वातावरणाला अनुसरून ते पटलेच.. खर्रच गोंगाट नुसता !
पण तेव्हा एक गोष्ट समजली. आतिफ अस्लमची गाणी ऐकायचे एक वय असते, एक मूड असतो, एक माहौल असतो. शांत आणि चाकोरीबद्ध आयुष्य जगणार्यांनी त्या वाटेला जाऊ नये.
असो,
आतिफ अस्लमच्या माझ्या काही आवडत्या गाण्यांच्या यू ट्यूब लिंका खाली देत आहे. एंजॉय
आदत - आतिफ अस्लम - https://www.youtube.com/watch?v=GRXwzUf9Atc
आदत (चित्रपट - कलयुग) - https://www.youtube.com/watch?v=FpsdrNLnDkI
तू जाने ना.. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=P8PWN1OmZOA
तेरा होने लगा हू .. (चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी) - https://www.youtube.com/watch?v=rTuxUAuJRyY
पहली नजर मे .. (चित्रपट - रेस) - https://www.youtube.com/watch?v=BadBAMnPX0I
तेरे बिन ... (चित्रपट - बस एक पल) - https://www.youtube.com/watch?v=k6NnNv7XJYg
वोह लम्हे वोह बाते .. (चित्रपट - जहर) - https://www.youtube.com/watch?v=omv2hDDVBkg
बाखुदा तुम्ही हो .. (चित्रपट - किस्मत कनेक्शन) - https://www.youtube.com/watch?v=Jpq9tm0gnTM
पिया ओ रे पिया .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=_hdgIqwIpSk
तू मोहोब्बत है .. (चित्रपट - तेरे नाल लव हो गया) - https://www.youtube.com/watch?v=ApnLd04X7-U
मै रंग शरबतों का .. (चित्रपट - फटा पोस्टर निकला हिरो) - https://www.youtube.com/watch?v=GnzZyGQi2ps
नादान परिंदे (आतिफ वर्जन) - https://www.youtube.com/watch?v=DwENxBjtpI8
रॉकस्टार चित्रपटात हे मोहीतच्या चौहानच्या आवाजात आहे. त्यापेक्षा हे सरस आहे.
दूरी फुल्ल अल्बम - https://www.youtube.com/watch?v=IydHmfhbnoA
यातील माझी आवडती गाणी -
१) दूरी .. २) अहसास .. ३) हम किस गली जा रहे है
वर फक्त माझी आवडती गाणी दिली आहेत. याव्यतिरीक्तही त्याची बरीच गाणी आहेत, जी हिट गेली आहेत. किंबहुना अपवाद वगळता तो हिट गाणीच गातो बहुधा. आता याला त्याच्या आवाजाची जादू बोला वा नशीबाची बाजू. पण अगदी विवेक ओबेरॉयच्या प्रिन्स सारख्या टुक्कार सिनेमात काही बघण्या ऐकण्यासारखे होते तर ते आतिफचीच दोन गाणी.
हे आतिफचे लेटेस्ट - तू चाहिये .. (चित्रपट - बजरंगी भाईजान) - https://www.youtube.com/watch?v=WTLLym2wzIM
(आतिफकडून असलेल्या अपेक्षा यात पुर्ण नाही होत, पण बरे आहे)
असो, हा लेख अपुरा, आहे क्रमश: आहे, किंबहुना लेख असा नाहीयेच.
माझ्या कॉलेज जीवनाशी आतिफच्या गाण्यांच्या एवढ्या काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत की त्या अश्या पानभर जागेत नाही मावणार, त्यामुळे ही निव्वळ प्रस्तावनाच समजा.
तरी माबोवरील सर्व आतिफ अस्लमच्या चाहत्यांचे इथे स्वागत आहे हे वेगळे सांगायला नकोच
या धाग्याच्या निमित्ताने आज आतिफची उजळणी झाली, वरची सारी गाणी पुन्हा पुन्हा ऐकून झाली. वेळेचे सार्थक झाले, मजा आली
अरे, तू अतिफची पाकिस्तानी
अरे, तू अतिफची पाकिस्तानी गाणी ऐकली नाहीस का? ती बॉलीवूडपेक्षा भन्नाट आहेत.
त्याचं जलपरी ऐक. मस्तच आहे.
मला अतिफ अस्लमची सगळी गाणी
मला अतिफ अस्लमची सगळी गाणी आवडतात असं नाही पण तो खूप छान गातो.
नंदिनी, +१०००
हे लेटेस्ट ऐक! ताज दार ए हरम - माझ्यामते त्याचं सर्वात उत्कृष्ट गाणं आहे हे आत्तापर्यंत!
एका महिन्याच्या आत अडीच कोटी व्ह्यूज उगीच नाही मिळाले!
https://www.youtube.com/watch?v=a18py61_F_w
आदत माझं पन फेवरेट गाणं आहे..
आदत माझं पन फेवरेट गाणं आहे..:)
आमच्या कॉलेजलाईफची सुरुवात आणि त्याच्या कारकिर्दीची सुरुवात बहुधा एकाच वेळची.
त्याच्या "आदत" या एका गाण्याने आम्हाला त्याचा फ्यानक्लबात नेऊन बसवले. तेव्हा आमच्या दर वाक्यात "अब तो आदत सी है मुझको, ऐसे जीने मे.." हे पालुपद असायचेच. त्यानंतर त्याने काही गायले नसते तरीही आम्ही आजीवन त्याचे फ्यान बनून राहिलो असतो. >>
सेम हिअर..:)
नाही ना.. बहुधा तेव्हा
नाही ना.. बहुधा तेव्हा इंटरनेटच्या अभावामुळे आणि मी कधी एफएम सुद्धा बाळगला नसल्याने पाकिस्तानी गाणी फारशी पोहोचलीच नाहीत माझ्यापर्यंत.. आणि मग नंतरच्या काळात फॉलो केले नाही.. आज आता मात्र चाळतोय.. अजून बरीच रात बाकी आहे, तुर्तास जलपरी ऐकतच ही पोस्ट लिहितोय
जलपरीमधला नुसरतसाबचा भाग
जलपरीमधला नुसरतसाबचा भाग अफलातून जमलाय.
Mi panahech I the. Tuzya list
Mi panahech I the.
Tuzya list madhal ekun ek gaan avadat
बस एक पल मधल तेरे बिन
बस एक पल मधल तेरे बिन सर्वाधिक प्रिय मला...
कातिल गायलेल आहे ते...
एकदा नीट ऐकायला हवीत ही गाणी.
एकदा नीट ऐकायला हवीत ही गाणी. माझ्या अनेक ओळखीच्यांना, माबो मित्र-मैत्रिणींना एवढी का आवडतात पाहायला (नाहीतर आपण चाकोरीबद्ध लाईफवाले नाय, आपण एकदम खंग्री लैफ जगतो अशी स्वतःची इमेज करायची असेल तर याची दोन तीन गाणी फेकता आली पाहिजेत असे दिसते).
मी एकच ऐकले आहे - 'तेरा होने लगा हूँ' - आणि आलिशा चिनॉय च्या आवाजानंतर याचा रडा आवाज विचका करतो असेच वाटते मला ते गाणे ऐकल्यावर.
आवडला लेख. आतिफ अस्लमची गाणी
आवडला लेख.
आतिफ अस्लमची गाणी ऐकायचे एक वय असते>>> 'एक वय असते' हे नाही पटलं..
आवडणारी गाणी ऐकायला वयाची मर्यादा नसते
वर उल्लेखलेली सगळीच गाणी आवडतात. मध्यंतरी एक विसरुन जावा असा सिनेमा येउन गेला 'रमैय्या वस्तावैया" या सिनेमातली लक्षात ठेवावी अशी एवढी एकच बाब ... आतिफ ची गाणी . आतिफ ची ३ गाणी होती... 'जिने लगा हूं', 'बैरिया' आणि 'रंग जो लाग्यो' पैकी शेवटचं गाणं अशक्य सुंदर जमलंय.
त्याची पाकिस्तानी गाणी ऐकायची आहेत खरंच.
फा, जिज्ञासाने लिंक दिलेलं
फा, जिज्ञासाने लिंक दिलेलं गाणं खरंच ऐक. ओरिजिनल कव्वाली ऐकली नसलीस तर तीही ऐक. साबरी बंधूंनी कमाल गायली आहे.
>> आवाजही माझा बरेपैकी
>> आवाजही माझा बरेपैकी त्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा <<
म्हणजे तुम्हीसुद्धा बेसूर आहात का ?
ताजदार ए हरम आतिफच्या आवाजात
ताजदार ए हरम आतिफच्या आवाजात काही जमले नाही. मला त्याची अनेक गाणी आवडतात, पण ताजदार मध्ये त्याचा आवाज बरेचदा चिरका वाटतो. तसेही अनेक गाणे चिरके आहेत पण बरेच आवडतात.
माझा बरेपैकी त्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा, त्यामुळे लवकरच मी `गरीबांचा आतिफ अस्लम' म्हणून ओळखलो जाऊ लागलो. >>
अरे वा ! अभिनंदन ! तुम्ही कोणकोणत्या चित्रपटतात गायले आहे? यु ट्युबच्या लिंक द्या की मग. नेकी और पुछपुछ !
आतिफची रेडिओवर मुलाखत ऐकली
आतिफची रेडिओवर मुलाखत ऐकली होती.
गाण्याच शिक्शण कधी घेतलं नाही. गिटार कशी जुळवावी हे माहित नव्हती , त्यमुळे गाण्याची सुरवात चुकीच्या नोट वर झाली . आजच्या आणि आधिच्या अनेक कन्व्हेनशन्ल गायकांपेक्शा तो बेसुर गातो हे त्याने स्वत: मान्य केलयं.
पण त्याच्या आवाजात आणि गाण्यात जादू आहे हे खरं .
आतिफ ची ३ गाणी होती... 'जिने लगा हूं', 'बैरिया' आणि 'रंग जो लाग्यो' पैकी शेवटचं गाणं अशक्य सुंदर जमलंय.>>>>>>>>>>>>>>> + १०००००००००००००००००००००००००००००००. अतिशय भन्नाट गाणं आहे ते .
रसप, उगाच, अनावश्यक कमेंट आहे
रसप, उगाच, अनावश्यक कमेंट आहे ही ! असो!
मित, तिनही गाणी माझीही प्रचंड आवडती.
या बीबी वर ज्या ज्या गाण्यांचा उल्लेख होतोय ती सगळीच गाणी माझी आवडती आहेत
आज अतिफ ऐकावाच लागणार!
पण त्याच्या आवाजात आणि गाण्यात जादू आहे हे खरं .
>>>
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
रसप, उगाच, अनावश्यक कमेंट आहे
रसप, उगाच, अनावश्यक कमेंट आहे ही ! असो!
>>>
अनावश्यक कॉमेंट नाहीये ही, बरेचदा हा वाद चालतच असतो आतिफच्या गायकीला धरून.
खास करून त्याच्या सुरुवातीच्या काळात.
बरेचदा असे वाटायचे की त्याला बेसुरा ठरवण्याचा कट रचल्यासारखे आपल्या म्युजिक ईंडस्ट्रीमधले त्याच्या मागे लागले आहेत.
पण ठिकाय, शेवटी त्याच्यातील कला बोललीच. सुरांचा थोडा कच्चा असणे आणि बेसुरा असणे यात फरक आहे, आणि आवाजाची देणगी असल्यास सूर थोडे इथे तिथे चालतात.
बाकी माझे म्हणाल तर मी बेसुराच आहे. तसे नसते तर आज मी यूट्यूबला खाऊन टाकला असता. इथे माझा फॅन क्लब निघाला असता
आवाजाची देणगी असल्यास सूर
आवाजाची देणगी असल्यास सूर थोडे इथे तिथे चालतात.
>>
त्यापेक्षा मी असं म्हणेन की जोपर्यंत एखादं गाणं थेट हृद्याला जाऊन भिडतंय तोपर्यंत इतर काहीच मॅटर नाही करत.
लिष्ट टाका सगळ्या संग्रहणीय
लिष्ट टाका सगळ्या संग्रहणीय गाण्यांची त्याच्या ऋन्मेषराव
<< सुरांचा थोडा कच्चा असणे
<< सुरांचा थोडा कच्चा असणे आणि बेसुरा असणे यात फरक आहे, आणि आवाजाची देणगी असल्यास सूर थोडे इथे तिथे चालतात.,>>
<< बाकी माझे म्हणाल तर मी बेसुराच आहे. तसे नसते तर आज मी यूट्यूबला खाऊन टाकला असता. >> देव न करो, पण असं झालच तर नवीन धागा काढून रेसिपी टाकायला विसरु नका.
>> सुरांचा थोडा कच्चा असणे
>> सुरांचा थोडा कच्चा असणे आणि बेसुरा असणे यात फरक आहे, आणि आवाजाची देणगी असल्यास सूर थोडे इथे तिथे चालतात. <<
ऋन्मेष,
माझी कळकळीची विनंती आहे की किमान संगीताबद्दल तरी असे काहीही मनाला येईल ते बोलू नका. सूर इथे तिथे गाढवाच्या गळ्याला चालतात, गात्या गळ्याला नाही.
रिया,
तुला अनावश्यक वाटली, वाटो. त्यामुळे तो बेसुरा सुरात येणार नाही. मला ह्याविषयी वाद घालायचा नाही आहे. माझं घराणंच गाण्यातलं असल्याने आजची ही बेडकांची मांदियाळी असह्य होते मला.
सूर इथे तिथे गाढवाच्या
सूर इथे तिथे गाढवाच्या गळ्याला चालतात, गात्या गळ्याला नाही.

बेडकांची मांदियाळी
मला असह्य होतो ह्याचा आवाज
मला असह्य होतो ह्याचा आवाज आणि त्या "भिगे होंठ तेरे" वाल्या गायकाचा आवाज सुद्धा!
रसप अगदी अगदी.....
रसप अगदी अगदी.....
माझी कळकळीची विनंती आहे की
माझी कळकळीची विनंती आहे की किमान संगीताबद्दल तरी असे काहीही मनाला येईल ते बोलू नका. सूर इथे तिथे गाढवाच्या गळ्याला चालतात, गात्या गळ्याला नाही.
>>>
सूर इथे तिथेचा तुम्ही शब्दशा अर्थ सोयीने घेऊ नका.
चला आपण स्टेप बाय स्टेप जाऊया.
दोन गायक घेऊया,
१. सोनू निगम २. मोहम्मद रफी
आता मला सांगा या दोघांपैकी कोणाचे सूर परफेक्ट आहेत?
...
लिष्ट टाका सगळ्या संग्रहणीय गाण्यांची त्याच्या ऋन्मेषराव
>>
बागुलबुवा, लेखात शेवटी लिस्ट आहे ना, ती ऐकून घ्या. अजून हवे तर येतो प्रतिसादांत
माझं घराणंच गाण्यातलं
माझं घराणंच गाण्यातलं असल्याने आजची ही बेडकांची मांदियाळी असह्य होते मला.
>>>>
इथे मी आपल्या भावनांचा आदर करतो रसप.
पण बरेचदा अश्या केसेस मध्ये होते काय, तर अमुक तमुक म्हणजेच खरे संगीत असे संस्कार आपल्याही नकळत लहानपणापासून मनावर बिंबले जातात. आणि त्यापलीकडे काही कानावर पडले की सिस्टीम ऑटोमेटीक ते रिजेक्ट करते.
<< पण बरेचदा अश्या केसेस
<< पण बरेचदा अश्या केसेस मध्ये होते काय, तर अमुक तमुक म्हणजेच खरे संगीत असे संस्कार आपल्याही नकळत लहानपणापासून मनावर बिंबले जातात. आणि त्यापलीकडे काही कानावर पडले की सिस्टीम ऑटोमेटीक ते रिजेक्ट करते.>>
इथे सुरात गाण्याविषयी बोलतायत रसप रे. त्याच्याशिवायचं जे काही असेल ते खरं संगीत कसं असू शकेल ?
रणजीत, ते ठिकेय पण तरीही
रणजीत, ते ठिकेय

पण तरीही एखाद्याला त्याचं गाणं आवडत असेल तर त्याच्याही मताचा तुला आदर हवाच ना?
रीया
रीया
मला अन्नु मलिक चा आवाज खुप
मला अन्नु मलिक चा आवाज खुप खुप आणि अतिचशय आवडतो.
मला तुमच्याविषयी सहानुभूती
मला तुमच्याविषयी सहानुभूती आहे
ऋन्मेष छान लेख. अतिफ
ऋन्मेष छान लेख.
अतिफ अस्लमच्या गुणवत्तेबद्दल मला काहीच बोलायचे नाही कारण त्याचे एखाद-दुसरेच गाणे माझ्या कानावरून गेले आहे. काहीही असले तरी अतिफ अस्लम लोकप्रिय आहे हे मान्यच करायला हवे. पण वरील चर्चा वाचून असे वाटते की बर्याच वेळा लोकप्रियता आणि गुणवत्ता ह्यात गल्लत होते. जे लोकप्रिय असतील ते गुणवान असायलाच हवेत असा अजिबात नियम नाही.
Pages