हरवलेला किनारा…….. (भाग १) http://
www.maayboli.com/node/54496
हरवलेला किनारा…….. (भाग 2) http://www.maayboli.com/node/54508
सोमवार उजाडला समीर मोठ्या ऐटीत लायब्ररीत आला, आज तो खूप खुश दिसत होता ,आल्याआल्या तो आकांक्षाला शोधू लागला .बघतो तर मिनू आणि आकांक्षा दोघी आतमध्ये अभ्यास करत बसल्या होत्या , दोघींचाही लक्ष त्याच्याकडे न्हवती तिला बघून त्याला जर समाधान वाटलं जणू त्याचादिवस आज खूप मजेत जाणार होता . मग त्याने त्याच्या
मित्राकडे चौकशी केली तेव्हा त्याला शनिवारच्या गोष्टीबद्दल घडले आणि त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागला . मग बाहेरूनच त्याने हळूच मिनुला इशारे करायला सुरवात केली . अचानक दोघींचाही लक्ष त्याच्याकडे गेल त्याचबरोबर आणखी दोन- तीन नजरही त्याच्याकडे वळल्या तसा तो गप्प बसला आणि एका बाजूला जाऊन उभा राहिला . मग काही काम आल म्हणून तो निघून गेला .थोड्या वेळाने परत तो काऊन्टरजवळ आला आणि पुन्हा हळूच त्याने इशारा करून मिनुला बाहेर यायला सांगितलं. मिनुच आता घाबरली कि हा तिला का बोलावतोय म्हणून आणि
ती आकांक्षाला म्हणाली, " ए तुमच्या भानगडीत हा मला खेचतोय , जा तूच भेटून ये त्याला जा !!"
आकांक्षा तिला विनवणी करू लागली ," plz मिनू जा न बघून तर ये तो काय म्हणतोय ते "मग मिनू बाहेर गेली . बाहेर गेल्यानंतर त्याने एक चिठी मिनुच्या हातात दिली आणि म्हणाला ,"हि चिट्ठी तिला दे "
"काय लिहिलंय यात ? आणि मी का म्हणून देऊ तूच देना जाऊन तिला " आणि काय रे तुझ नाव काय ते तरी सांग " मिनू खूप बिनधास्त होती
""plz दे न यात माझा नंबर आहे तिला मिस्डकॉल द्यायला सांग, आणि त्या दिवशी तुला बोललो म्हणून राग आला असेल तर सॉरी पण plz मला ती खूप आवडते गं , तीच नाव काय आहे सांग ना "
"काय!! नाव नाही माहित आणि प्रेम कसलं करतोस रे , मी नाही नाव सांगणार तीच, खर प्रेम करत असशील तर स्व:तच शोध तीच नाव " मिनू म्हणाली आणि लायब्ररीत निघून गेली.मग तिने ती चिट्ठी अकांक्षाकडे दिली . मग आकांक्षाने ती चिट्ठी उघडली तर त्यात एक लिहील होतं,
"…सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर
.. ........तु नक्किच आहेस....पण
.............त्यापेक्षाही सुदंरतुझं
माझ्या आयुष्यात असणंआहे.......
I L VE U DEAR …"
आणि खाली त्याचा नंबर होता. आकांक्षाला काय करावं हेच सुचत न्हवत. तिने समीरकडे पाहिलं तर तो तोही तिलाच एकटक पाहत होता.त्या दिवशी दिवसभर समीर आकांक्षाच्या मिस्डकॉल ची वाट बघत राहिला पण तिचा
फोन काही आला नाही, समीरला खूपभीती वाटू लागली कि तिला राग तर आलानसेल ना पण मग तीने लाजून हसून का बघितलं काहीच कळत न्हवतं .ती रात्र समीरने कशी घालवली त्यालाच माहित . एक एक क्षण त्याला एक एक
वर्षासारखा भासत होता . रात्री उशिरा झोपल्यामुळे त्याला उठायलाही उशीरच झाला होता. घड्याळात ८.३० वाजले होते , घाईघाईत त्याने आवरलं आणि कॉलेजमध्ये निघाला , तो स्टेशनवरच पोहोचला असेल इतक्यात त्याचा फोन वाजला एक अनोळखी नंबर होता, समीर,"हेल्लो !!""हेल्लो !!" समोरून एका मुलीचा आवाज येत होता.
"समीर स्पिकिंग आपण कोण बोलताय?" समीर
"तीच जिच्याकडे तू काल तुझं लव्ह लेटर दिलं होतंस " मिनू म्हणाली .
"तू !! " समीरला एकदम आनंद झाला,त्याचा स्व:तच्या कानांवर विश्वासच बसेना ," खरंच तू बोलतेयस का? कशी आहेस सॉरी मला तुझं नाव नाही माहित पण…. "त्याच बोलन मधेच थांबवत
मिनू म्हणाली ,"एक मिनिट किती घाई करतोस ,मी ती नाहीये जी तू समजतोयस "
" मग कोण बोलतेयस ? " समीर गोंधळून म्हणाला
."मी तिची मैत्रीण बोलतेय मिनू थांब तिला फोन देते " आणि मिनूने अकांक्षाकडे फोन दिला
"हेल्लो !!" आकांक्षा म्हणाली समीरला तिचा आवाज ऐकून खूप आनंद झाला ,"हाय , गुड मोर्निंग , कशी आहेस?"
"मी बरी आहे गुड मॉर्निंग " ती म्हणाली
."मला तुझं नाव माहित नाहीये plz सांगशील? खरं तर मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे पण फोनवर नाही जमणार ,जर तुझी हरकत नसेल तर कॉलेजपासून जवळच एक हॉटेल आहे तर आपण तिथे भेटूया का?" समीर थोडा धीर करून बोलला
."अग मिनू तो भेटायचं आहे म्हणतोय, नाही म्हणून सांगू का? मला खूप भीती वाटतेय गं " आकांक्षाने लगेच फोनवर हात ठेवत मिनुला सांगितलं.
"अगं अशी काय तू मग जा न भेटायला , तुला काय खावून नाही टाकणार आहे तो " मिनू चिडून म्हणाली .
"ठीक आहे, चालेल पण मी जास्त वेळ नाही थांबणार ok " आकांक्षाने त्याला सांगितलं ."ठीक आहे चालेल , काळजी घे बाय " म्हणून समीरने फोन ठेवला.थोड्या वेळाने आकांक्षा आणि मिनू त्या हॉटेलजवळ आल्या हॉटेल मध्ये मस्तपैकी चहाचा सुगंध दरवळत होता. तेवढ्यात समीरही तिथे पोहोचला पण मिनुला पाहून त्याचा हिरमोड झाला, त्याला वाटलं कि एकटीच येईल . मिनुला ते लगेच कळलं ,"
"आकांक्षा मला एक काम आहे इथेच आली मी लगेच zerox घेऊन, तू थांब इथे " असं म्हणून मिनू लगेच तिथून निघून गेली. मग समीर आणि आकांक्षा हॉटेलमध्ये गेले आणि एका टेबलवर बसले , काही वेळ कुणीच काही बोलत न्हवतं .मग
समीरनेच सुरवात केली ," तुझं नाव?"
"आकांक्षा आणि तुझं ?" ती म्हणाली.
"सुंदर नाव आहे अगदी तुझ्यासारखं " समीर हसत म्हणाला ," माझं नाव समीर, दोन महिन्यांपूर्वीच इथे जॉबला
लागलो, वाटलं न्हवतं आयुष्यात असाही turningpoint येईल म्हणून " समीर अजूनही तिच्याकडेच बघत होता आकांक्षा लाजली
, "एक विचारू?" आकांक्षा
" हो विचार ना " समीर
मग समीरकडे बघत तिने विचारलं" याआधी तुझ्या आयुष्यात कोणी होतं का ?"तिच्या या प्रश्नाने समीर क्षणभर घोंधळला त्याला या प्रश्नाची आकांक्षाकडून अपेक्षा न्हवती
" हो…… नाही म्हणजे …… हो!! होती एक मुलगी दोन वर्षावुर्वी आमचं ब्रेकअप झालं "समीर म्हणाला
"काय !! मग कशामुळे झालं तुमचं ब्रेकअप?" तिने प्रश्न केला .
" तिच्या घरच्यांना मान्य न्हवतं आणि आता तीच लग्नही झालं " समीर म्हणाला
“मग अजूनही तुझं तिच्यावर प्रेम आहे कि ……….” आकांक्षा बोलता बोलता थांबली .
"आकांक्षा आता माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तुला मी हे सांगतोय , जरी ती माझं पाहिलं प्रेम असली तरी आता ती माझ्या आयुष्यात नाहीये, पूर्णपणे नाही पण थोडफार तिला विसरू शकलोय मी, आज २ वर्षांनी मला तूच एक अशी मुलगी भेटलीस जिने मला पहिल्यांदा तिला विसरायला आणि पुन्हा प्रेमात पाडलंस." समीर म्हणाला.
मग आकांक्षा म्हणाली "हे बघ समीर ,मी इतर मुलींसारखी नाहीये जी फक्त स्व:तच मन रमवायला ४ दिवस हे अफ़ेअरचं नाटक करेल , खरं तर तुही मला आवडतोस आणि म्हणूनच मी तुझ्याकडे माझा lifepartner म्हणूनच पाहतेय , कारण तू जर माझ्या आयुष्यात येउन पुन्हा निघून गेलास तर, मला हे सहन होणार नाही. मग मी काय करून बसेन माझं मलाच नाही माहित "आकांक्षाकडून हे ऐकून आता कुठे समीरच्या जीवात जीव आला होता
तो म्हणाला ," तू काही काळजी करू नकोस , मी कधीच तुला फसवणार नाही rather मी हे करूच शकत नाही गं , मी खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि तुला वचन देतो कि शेवटपर्यंत तुला साथ देईन " हे ऐकताच आकांक्षाला खूप आनंद झाला . तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं .
To be continued......तू !!
खुप लहान भाग . पन nice
खुप लहान भाग . पन nice
छान पण लेखन थोड़े मोठे
छान पण लेखन थोड़े मोठे करा.....बाकी छान सुरवात....
पु.ले.शु......
मस्त.......... आवडला
मस्त.......... आवडला भाग............
पुढचा भाग लवकर येऊ द्या.............
पु.ले.शु
छान
छान