Two Wheeler चालवण्याच्या भीती बद्दल

Submitted by सुरजभोसले on 31 August, 2015 - 05:08

दोन तीन महिन्या पूर्वी मी माझ्या मित्राच्या Two Wheeler शिकण्या बद्दल विचारल होते. तुमच्या प्रतिसादा मुळे त्याची Two Wheeler चालवण्याची भीती व लाज बरीच कमी झाली. मित्र ऑफिसला गाडी न्यायला लागला, पण आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाच ऑफिसला गाडी नेतो (चार महिन्यात गाडी च running फक्त ३०० किलोमीटरच झाल आहे.) ऑफिसला गाडी वर जायचं असेल तर भीतीन त्याचे हात थरथर कापतात व घाम फुटतो आस त्यानीच सांगितल. त्याची हि भीती कशी कमी करावी? मी त्याला गाडी वर जास्ती practice करायला सांगितली. मित्राला त्याच्या मुलाला त्याच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर पाळणाघरात सोडावे लागते. संध्याकाळी मित्राला गर्दीत गाडी चालवण्याची भीती वाटते म्हणून त्याची बायको मुलाला पाळणाघरातून घरी घेऊन जाते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीमा, नविन गाडी शिकताना चढाणवर थांबवल्यावर पुन्हा स्टार्ट करताना मागे येते यासाठी काय काळजि घ्यावि?

गीअर ची असेल तर थोडा क्लच स्लिप करून उचलावी लागते; कधी कधी हॅन्डब्रेक वापरून उचलणं जास्त सोपं पडत बंपर टू बंपर ट्रॅफिक असेल चढावावर तर...

टू व्हीलर तर पाय असतात खाली टेकवायला Wink

हँडब्रेक वापरावा.
यासाठी मारूती नामक गाडी सगळ्यात बोगस. फुल हँडब्रेक लावलेला असताना मी माझी मारूती ८०० गाडी (आजकालची आल्टॉ) ६०च्या स्पीडने चालवलेली आहे. थोडी खेचली जातेय इतकंच जाणवत होतं. अर्थात टोटल नवशिक्याही होतो त्या काळी. Wink

हॅन्ड ब्रेक लावल्यानंतर चढाणवर गाडि पुढे नेताना खालि करायचा असतो तेव्हा गडबड उडते गाडी मागे जाते

मुळात भिती असेपर्यन्त एकटयानेच प्रॅक्टीस करु दे.
दुसरे म्हणजे, प्रॅक्टीस, प्रॅक्टीस आणि प्रॅक्टीस. जरा रात्रीचे जा रस्ते रिकामे असताना. मुळात रस्ते नीट माहित असले की अर्धे कामं होतं. कुठे कसं जायचं माहीत असेल तर रीलॅक्स रहातो माणूस. तुम्ही इतरांवर फोकस नका करू. फक्त तुम्ही कशी गाडी चालवता ते पहा. अ. मा. म.

आधी रात्रीची कमी वर्दळीवर गाडी शिकणे उत्तम हा सल्ला मला मिळाला होता. खोटं वाटेल पण ते चांगलं ठरतं.
अ. मा. म.

रॉहू, पुण्यात हेल्मेट बाईकच्या आरश्यावर लावायचं असतं. अन मग बुंगाट गाडी हाणायची. आरसा वाचणं महत्त्वाचं काही झालंच तर... :रागः

हॅन्ड ब्रेक लावल्यानंतर चढाणवर गाडि पुढे नेताना खालि करायचा असतो तेव्हा गडबड उडते गाडी मागे जाते>>>
.'एक्सलेटर देत हळूच हॅन्ड ब्रेक सोडायचा गाडी मागे येत नाही प्रॅक्टीस,ने जमायला लागेल

रॉहू, पुण्यात हेल्मेट बाईकच्या आरश्यावर लावायचं असतं>>>.
हेल्मेट डोक्यावर घालायचा असतो ना?.

भारतात तर टू व्हीलर, फोर व्हीलर, ऑटो, बस इ. स्वतः चालवणेच काय, इतर चालवतात त्याचेच जास्त भय वाटते.
अगदी पायी चालताना सुद्धा.

>>>>>> मोटार सैकलवर ( फटफटी) वापरात नसल्यालं हेल्मेट कुठीसं ठिवत्यात ?:अ ओ, आता काय करायचं <<<<<<
डोके वापरत असेल, तर वापरात नसलेले हेल्मेट डोक्यावर ठेवतात......
अन डोके वापरत नसेल तर, वापरातील हेल्मेट गुढग्यावर ठेवतात!

सर्वांना प्रतिसादा बद्दल धन्यवाद,
तुमच्या प्रतिसादामुळे मित्राची Two Wheeler चालवण्याची भीती नक्कीच कमी होईल.
Two Wheeler चालवण्याच्या भीती मूळ तो काहीतरी कारण सांगून गाडी चालवण्याच टाळायचा (आज उशीर झाला, किंवा पाऊस आहे, किंवा गर्दी आहे.)
मित्राच्या मुलाचे पाळणाघर मित्राच्या ऑफीसच्या वाटेवर एक किलोमीटर वर आहे. रिक्षावालेकाका पाळणाघरातून त्याच्या मुलाला घेतात. मित्राच्या बायकोच ऑफिस पाळणाघराच्या विरुद्ध बाजूला आहे. सकाळी रस्त्यावर गर्दी कमी असते म्हणून तो मुलाला सकाळी पाळणाघरात सोडतो पण संध्याकाळी गर्दी खूप असते म्हणून मित्र एकटाच घरी जातो व त्याची बायको मुलाला पाळणाघरातून घरी घेऊन जाते.

<< मित्राला मायबोली मेंबर बनायला सांगा की...>>

त्यांना मित्राची भीती घालवायचीये, मित्र नाही घालवायचाय

अहो ते किती घुमवून लिहायला लागत.
मित्राची बायको, मित्राचा मुलगा म्हणुन तसा सल्ला दिला बाकी काही नाही.

सुरज
सकुरा नि लिहल्या प्रमाणे तुमच्या मित्राला मायबोली वर मेंबर बनायला सांगा म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम त्यांना व्यवस्थित सांगता येतील. तुमच्या मित्राला सांगा, गाडी रोज काही किलोमीटर चालवलीच पाहिजे नाहीतर गाडीला प्रोब्लेम येऊ शकतो.