या धाग्यावर फोटो जास्त झाल्यामुळे अपलोड व्हायला त्रास होत आहे त्यामुळे हा नविन धागा काढलाय. यापुढे नविन फोटो मी इथे शेअर करेल.. तुम्हीपन तयार केलेल सॅटीनच काम इथं शेअर केल्यास आवडेल..
बर्याच लोकांनी मागे मी दिलेल्या हेअरबेल्ट ची कृती इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.. लि़ंक त्यावर दिली आहे तरीही फोटोद्वारे ती समजवुन सांगण्याचा हा प्रयत्न.. तुमच्या आवडत्या रंगांना घेऊन तुम्हीसुद्धा हे तयार करा आणि बनवल्यावर त्याचे फोटो शेअर करा :)..
हा बेल्ट :
हि कृती :
दुसर्या कोलाज मधला शेवटचा फोटो पिकासाने परस्पर अॅडजस्ट केलाय आणि तो काढून टाकायला मी विसरली. त्यात स्टेपनुसार फोटो अरेन्ज केलेत मी पण १ २ ३ ४ नंबर टाकायला विसरली
मागील धाग्यावर एक बन असणारा हेअरबेल्ट दिला आणि त्याच रंगाच्या हेअरक्लीप्स सुद्धा दिल्यात. त्यात तयार केलेल्या फुलांच्या पाकळीची हि कृती..
ह्या पिन्स आणि फुलं :
हि त्याची कृती :
तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते ..
टीना, मी परवा फेसबुकवर आणखी
टीना, मी परवा फेसबुकवर आणखी एक वेबसाईट पाहिली अशी फुलं करायची. तू केलेल्यापेक्षा वेगळी फुलं दिसली. शोधून बघते आणि मिळाली की इकडे लिंक देते.
ओके चालेल..आवडेल
ओके चालेल..आवडेल
.
.
Mastach ga.. Chhan samajun
Mastach ga.. Chhan samajun sangitales
Mastach ga.. Chhan samajun
Mastach ga.. Chhan samajun sangitales
मस्तच .. चिकाटीचे काम आहे
मस्तच .. चिकाटीचे काम आहे एकदम. तुला __/\__
कृती चांगली दिलीय. बर्न
कृती चांगली दिलीय.
बर्न करताना एकदम नीट करावे लागत असेल ना? नाहीतर रिबीन चे टोक काळेकुट्ट.
मला इतकं सुंदर सफाईदार सॅटिन काम कधी जमेल हा विचार करतेय
वॉव!! मस्त गं टीना. ही
वॉव!! मस्त गं टीना.
ही सॅटीनची फुलं-पानं बनवणं अगदी चिकाटीचं काम दिसतंय.
मि अनु..माझा अनुभव असा कि
मि अनु..माझा अनुभव असा कि बर्न करायला मेणबत्ति घेतली कि त्यातल्या काजळीने का़ होत तो प्रकार सहसा लायटर मधे होत नाही . जरासा चटका जरी दिला तरी वितळुन चिटकुन जात सॅटीन ..
मंजुडी, अग एकदा का करायची कल्पना आली कि भरभर होत..मी मुव्ही वगैरे बघत असली ( आधीच कोळून प्यालेला ) तर असले काम करत असते सोबत सोबत..
सुरेख !!! काय काय करत
सुरेख !!!
काय काय करत असतेस
करून , स्टेप चे फोटो काढून , अपलोड पण करतेस
ग्रेट आहेस !!!
Time Manegment पण शिकव जरा
टिना, धन्यवाद इथे कृती
टिना, धन्यवाद इथे कृती दिल्याबद्दल. पुन्हा सॅटिन घेऊन बसायचा विचार करावा लागेल
अग एकदा का करायची कल्पना आली कि भरभर होत.. <<<< टिना, मग कधी येत आहेस कोकण/गोवा फिरायला? पुणे एरानाकुलम ट्रेन आहे त्यात बसून मेंहदी, फुल अस दोन्ही तुझ्याकडून करून घेईन. अजून पुण्यावरून कोणा मैत्रिणींना यायच असेल तर टीनाबरोबर या. एका कामात तीन काम करु.
Time Manegment पण शिकव जरा <<< + १ मला खूप गरज आहे त्याची.
एक एक पाकळी करायलाही मेहनत
एक एक पाकळी करायलाही मेहनत आहे. छान झालंय
टीनुटले , तुझ्यासाठी एक नविन
टीनुटले , तुझ्यासाठी एक नविन प्रोजेक्ट आणलय बघ .
नेट्वर बघितल आणि लग्गेच तुझी आठवण झाली
स्वस्ति, तुच गं बस तुच.. हा
स्वस्ति,
तुच गं बस तुच..
हा माझा ड्रिम प्रोजेक्ट आहे यु नो..
पहिल्यांदा ममोने शिकवल्यानंतर जेव्हा नविन कल्पना बघायच्या म्हणुन शोध घेत होते तेव्हा हे सापडल मला आणि मी पूर्णपणे या पेंडंट च्या प्रेमात पडली.. मी नक्की ठरवल तेव्हाच कि हे तर करायच्च आहे.. वाटल नै कि इथ्पन कुणी शेअर करेल
Thanks so much.
Thanks so much.
mani१२३४५६, welcome
mani१२३४५६,
welcome
टीने , ऑल्देब्येश्ट.
टीने ,
ऑल्देब्येश्ट.
टीना, तुझ्यासाठी अजून एक
टीना, तुझ्यासाठी अजून एक प्रकार फुलाचा
https://www.pinterest.com/pin/364228688590080481/
Behold....
Behold....
याला म्हणतात फसलेले
याला म्हणतात फसलेले प्रयोग..
करायला गेलो एक आणि झाल एक..
म्हणुन मला कुठलीही रेसेपी करताना त्यातले सगळे साहित्य हवे असते..निभवायला गेल कि अस काहीसं होत
मला माहिती आहे कि तुम्ही छान झाल असच म्हणणार पन मी समाधान आणि परफेक्शन दोन्हीमागे धावत असल्याने I am not at all satisfied..still हे फोटो देतेय..
सर्वात पहिले फसलेलं दाखवायची जरा जास्तच लाज वाटत असल्याने दुसरा प्रयत्न देतेय इथं..उजेडात आणखी वेगळा रंग दिसायची शक्यता वाटते म्हणुन दिवसा काढलेले फोटो जर खुप वेगळे जाणवले तर टाकुन आणखी बोर करेन म्हणते नै तर यावरच काम चालवून घ्या..
तस सकाळी टाकता आले असते फोटो पण दाखवायची खा़ज
नमनाला घडाभर ओतलं आता फटू..
ड्रिमप्रोजेक्ट कि ऐसी कि तैसी.
हा डिजी मधे काढलेला :
आणि हे दोन्ही मोबाईल (म्हणजे भ्रमणध्वनी चा..हलता नव्हे) कॅमेरा :
टिना तुमचे पाय कुठे आहेत?
टिना तुमचे पाय कुठे आहेत? हयाला तुम्ही not satisfied at all म्हणता मग satisfied कशाला म्हणता?
टीना, मस्तं झालंय पेंडंट.
टीना, मस्तं झालंय पेंडंट. ओरिजिनल पेक्षा थोडं वेगळं आहे, पण जे झालंय तेही छान दिसतंय.
मोरपंखी रंगावर सोनेरी किंवा सिल्व्हरी या दोन्ही पेक्षा ओरिजिनल चेनची जी शेड आहे तीच मला आवडली.
तुझ्या उत्साहाची खरंच कमाल आहे. कीप इट अप!
आई आई आई... टीना साष्टांग
आई आई आई... टीना साष्टांग नमस्कार.. कसलं गोड दिसतय ते
टीना????? वॉव्,सुपर ,मस्त!!!!
टीना????? वॉव्,सुपर ,मस्त!!!! क्या बात है!!!!
छान जमलंय पेंडंट सुद्धा!!!
तुझ्या दिवसभरात नक्की चोवीस तासच आहेत नं??
वॉव ! सर्व काम भारी आहे .
वॉव ! सर्व काम भारी आहे . स्टेप बाय स्टेप दिलेस ते मस्त केलेस
सुरेख झालय, ओरिननल पेक्षा
सुरेख झालय, ओरिननल पेक्षा वेगळ झालय पण छान वाटतय.
टिना.. मस्त जमलयं
टिना.. मस्त जमलयं पेंडंट!
ओरिजिनल पेंडंट्चा बेस आहे ना तसे कानातले आहेत माझ्याकडे.. ल्क्ष्मी रोडवर घेतलेले.. थोडा मोठा बेस आहे त्याचा..
हे फसलेलं आहे? किती गोड
हे फसलेलं आहे? किती गोड बनलंय.
(मला असे मोर्पीस कानातले आणि त्याला सूट होईल असा ड्रेस हवा )
टीना , मस्त जमलय . मला वाटत
टीना , मस्त जमलय .
मला वाटत ओरिजनलचा शेप थोडा नेटका आहे आणि त्या मुळ बेसमुळे फरक पडतोय .
वाईट नाही झालय पण शेवटी कलाकारच समाधान ही तितकच महत्वाच
हात्तीच्या .. कुणालाच कळलं नै
हात्तीच्या .. कुणालाच कळलं नै होय..
अहो ओरिजनल जास्त छान आहे कारण त्यात हव्या त्या वस्तु हव्या तश्या आहेत..
त्यातल्या रिबीन्स मोठ्या आहेत म्हणजे रुंदीला म्हणुन हिरव्या रंगाच्या सॅटीन च्या व्यवस्थीत वापर करता आला आहे..परत त्या सॅटीन ला व्यवस्थित प्लेस करण्यासाठी वर जे त्रिकोणी दिसतय ते क्रिम्स पण हव्या त्या शेप च आणि साईझ च आहे..
निदान दोन इंचाची तरी रिबीन हवी होती जी माझ्याकडे अज्जिब्बात नव्हती मग मी एक इंचावर काम भागवण्याच्या प्रयत्न केलाय...त्यामुळे ती टोकाची पाकळी जी आहे तिचा शेप मला असलेल्या रिबीन मधे त्या प्रपोर्शन मधे बसवण शक्य नव्हत..
याला म्हणतात जुगाड..
वरच्या क्रिम्प्स ऐवजी मी बीडकॅप वापरलीए..
Pages