कॉलेजच्या मखमली दिवसात त्याने आणि त्याच्या टवाळक्या ग्रुपने "तिला" पाहिलं.. त्यांचा ग्रुप सेकंड इयरचा. ती नव्यानेच कॉलेजला आलेली. अगदी साधी सरळ.. खालची जमिन न्याहाळत चालणारी. तेल लावलेले केस आणि त्यांची कंबरेपर्यंत बांधलेली वेणी. पंजाबी ड्रेस. कपाळावर टिकली. डोळ्यावर चष्मा. पाठीवर पुस्तकांनी भरलेली ब्याग. हे तीच रूप कॉलेजला येऊनही पहिल्या सहा महिन्यात बदलल नव्हत. अगदी अभ्यासू किडा. "मी भली आणि माझा अभ्यास भला" तरीही आजूबाजूला मुलींच्या चर्चा तिच्या कानी पडायच्याच. हा ग्रुप असा फ़ेमस तर तो ग्रुप तसा फ़ेमस. तिच्या मोजून २-३ मैत्रिणी, पण तिच्यासारख्या त्या नव्हत्या.. कॉलेज म्हणजे मस्तीचे दिवस.. तिलाही समजावून सांगायच्या ती फक्त हसायची. याच २-३ मैत्रिणीनमधली एक त्याच्या ग्रुपमध्येही असायची आणि याच मैत्रिणीकडून तिच्या तो दृष्टीस पडला होता. तसं पाहायला गेल तर तो दिसायला अगदी "हिरोच", घरची श्रीमंती आणि त्याचाच असलेला माज. संवेदनशीलता, आदर, भावना या सगळ्या गोष्टींना तुच्छ मानणारा. मस्ती आणि मजा. सिरिअस्नेस हा प्रकार त्याच्यात कधीच नव्हता. म्हणून तिच्या मैत्रिणीने तिची माहिती दिल्यावर, ग्रुपने दिलेलं च्यालेंज त्याने लगेच स्वीकारलं, "बोल कुणाल, लावतोस का पैज?.. हि असली भोळी मुलगी पटवून दाखवायची.. मगच तू खर्रा हिरो ... जास्त लांब नाही फक्त ३ महिने तिच्याबरोबर फिरायचं तशीही ती अशी साधी सुधी रडेल रडेल आणि शांत होईल.. तुमच्यात जमीन आस्मानचा फरक तेच कारण तिला द्यायचं आणि ब्रेक अप करायचं.. फक्त एक अभ्यासू पोरगी तुला पटते का एवढच साबित करायचं...आपली फुल हेल्प असेल तुला आणि तसही मुलींसोबत फीरण तुला नवीन नाही ... " “हम हारने वालो में से नहीं है, वैसे इस बहेनजी के साथ ३ महिना निकाल ने का मतलब थोडा टफ तो है | But challenge is accepted.” त्याने खांदे उडवत मित्रांना उत्तर दिल आणि त्यांनी एकमेकांच्या हातावर टाळी मारली.
आता कॉलेज कट्टा आणि कॅन्टीन सोडून तो तिच्याभोवती घुटमळू लागला. तिच्यासोबत लायब्ररीत वेळ घालवू लागला. कधी तिच्याकडे एकटक बघण्याचे आभास तिला दाखवू लागला. मुलगी हि कितीही मुलांपासून दूर राहत असली तरी कोणी आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे हे समजून घेण्या इतपत तिला आकलन शक्ती नक्कीच असते. तिलाही त्याच्या देहबोलीतून ते जाणवत होत. कधी ती चुकून कॅन्टीन मध्ये आलीच तर लगेच तिच्या दृष्टीस पडायचे त्याचे प्रयत्न चालू झाले, त्याच्या त्या सलगीमुळे तीही थोडी बावचळली, त्याचा विचार नकळत तिच्या मनात घर करू लागला आणि असच करता करता एक दिवस कुठल्यातरी "डे" च्या निमित्ताने त्याने तिला विचारलच. त्याने "तिला" विचारलं तेव्हा आकाश ठेंगण झाल होत तिला.. एवढा राजबिंडा दिसणारा तो...त्याने मलाच का निवडल? असले प्रश्न तिला पडले नाहीत. सगळ्याच मुलीना आवडायचं तो.. एकदम ड्याशिंग क..काय म्हणतात तसाच तो. इतक्या दिवसात तिच्यावर छाप पाडण्यात त्याला यश आल होत. पण संस्कार म्हणा किंवा मुळातच अभ्यासू असलेला स्वभाव म्हणा, पहिले तिने त्याला नकारच दिला पण त्याच तिच्या आजूबाजूला फीरण कमी झाल नव्हत. तिच्यासमोर जेवढ चांगल वागता येईल तेवढ वागण्याचा तो प्रयत्न करत होता.
त्याने पुन्हा प्रपोज केल, तिच भिरभिरणार मन आणि तारुण्यात केलेलं पदार्पण. तिलाही आवडला होताच तो तरीही तिने त्याला प्रश्न विचारलाच, "मी ? म्हणजे अस कस होऊ शकत ?.. माझ्यावर प्रेम करण्यासारखं आहे काय?" तिला द्याव्या लागणाऱ्या उत्तरांची उजळणी त्याने केली होती त्यामुळे या प्रश्नावर त्याने सहज उत्तर दिल होत, "न आवडण्यासारख काय आहे तुझ्यात? तुझ साधपण हेच माझ्या प्रेमाचं कारण. जो खुबसुरती साधगी मै हैं वह और कहा ? तुझ्या साध्या सरळ स्वभावामुळेच तुझ्या प्रेमात पडलो आणि ते प्रेम तू कबुल करावस अशी मनापासून अपेक्षा आहे ...." पुढे काय काय फिल्मी डायलॉग तो मारत गेला आणि ती बहरत गेली. त्याच्या प्रेमाला खर समजून तिने त्याला होकार दिला.
जवळ जवळ पूर्ण पैज कुणाल जिंकला होता. आता फक्त तिला खोटी स्वप्न दाखवत स्वतःच्या तालावर नाचवण एवढच काय ते बाकी होत. ३ महिन्यांचा खेळ होता सारा. एकही लेक्चर न चुकवणारी ती कट्ट्यावर दिसू लागली. लायब्ररीतले एक्स्ट्रा तास आता मुव्ही वगैरे पाहण्यात जाऊ लागले. अभ्यासाकडे दुर्लक्ष करत घरातून बाहेर त्याच्याबरोबर फीरण चालू झाल. त्याच्या खांद्यावर डोळ्यातले अश्रू ढाळताना ती तीच करिअर पुसत होती आणि संसाराची स्वप्न पाहत होती. कधीही कोणा मुलाच्या जास्त संपर्कात नसल्याने त्याच्या खोट्या स्तुतीला ती खर मानत गेली. आपण एखाद्याला या स्वभावामुळेही आवडू शकतो हेच तिच्या आनन्दाच कारण ठरत होत. तो पैज जिंकण्यासाठी एक एक पायरी चढत होता आणि ती त्याच्यात गुरफटत जाऊन उध्वस्त होण्याकरता एक एक पायरी उतरत होती.
अडीच पावणे तीन महिने संपत आले आणि कुणाल ने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तिच्याकडे दुर्लक्ष करण, तिचा फोन आल्यावर तो न उचलण, तिला वाट पाहत तासनतास उभी करण हे सगळ सुरु झाल. काहीही कारण नसताना भांडण काढायचं आणि तिला वाट्टेल तसं बोलायचं. कालपर्यंत आपल्याला चांगल समजणारा हा अचानक का बदलला याच उत्तर तिला सापडत नव्हत. काय चुकल? ह्या प्रश्नाच उत्तरही तो देत नव्हता. दररोज रडून ती थकली होती. अजूनपर्यंत याने दाखवलेली स्वप्न खरी कि आत्ताचा हा खरा हे तिला कळत नव्हत. त्याच्या मागे पुढे ती फिरत होती जसा तो फिरायचा. तिने न राहवून एकदा ओरडून त्याला विचारलं, " काय झालय? का वागतो आहेस असा ? " एव्हाना ३ महिने उलटून गेले होते. तो हि तिच्यावर आवाज चढवून म्हणाला, " हळू ठेव तुझा आवाज...मी कुणाल आहे कुणाल ... कुणाल कारखानीस आणि हे लक्षात ठेव. तुझ्यासारख्या अभ्यासू मछलीला फक्त जाळ्यात अडकवायचं होत. पैज लावली होती मी.. तू अडकलिस आणि मी खर्रा हिरो ठरलो ... काय...? आता निघायचं." क्षणभर ती त्याच्याकडे बघत राहिली. आपण फसवले गेलो आहोत यापेक्षा जास्त; एखादी व्यक्ती एवढ खोट कस वागू शकते? आणि आपण इतके मूर्ख कसे ठरू शकतो ? अस काहीतरी तिच्या डोक्यात चालू झाल होत. जग आणि त्याचा अनुभव तिने घेतला नव्हता पण पहिलाच अनुभव अस काही करू शकतो हे तिला मान्य करण कठीण जात होत. आई वडिलांशिवाय बाहेरच जग पाहायला गेलेली ती फसली होती. जोरात आकांत करावा अस तिला वाटत होत. तो आणि त्याचा ग्रुप हातावर टाळ्या मारत, हसत तिच्या अश्रूनसोबत दूर वाहून गेला होता. ती एकटी पडली होती. खर तर तो तिच्या सोबत कधी नव्हताच.
सगळ एकतर्फी होत? ती कोसळली पूर्णपणे. रडत राहिली कितीतरी दिवस .. मुलीमधले बदल घरी लक्षात आले. ती कोणाशीही बोलत नव्हती, शेवटी मोठ्या बहिणीने तिची चौकशी केली. कॉलेजमध्ये माहिती काढली, तिला सावरल... सांभाळल. घरचे जे तिचे होते त्यांच्या आधाराने ती पुन्हा उभी राहिली... त्यांच्यासाठीच. तीन-चार महिन्यानपूर्वी आपल्या आयुष्यात आलेल्या एका खोटारड्या व्यक्तीपायी आपल आयुष्य उध्वस्त कराव हे तिला मान्य नव्हत. ती जगायला शिकली पुन्हा एकदा. पुढे ते कॉलेज सोडलं आणि त्या आठवणीही मनात खोल पुरून टाकल्या तिने.. आणि करिअरवर ध्यान देऊन पुन्हा अभ्यासात रमली. तिच्या आयुष्यातला एक वाईट काळ संपला होता.
९ वर्षांनंतरचा प्रसंग ......
रस्त्यावरून एक कार भरधाव धावत होती आणि अगदी तीच्यासमोरच ती चिमुरडी उडत जाणारा फुगा पकडायला धावली, त्या क्षणीच स्मिताच लक्ष तिच्याकडे गेल आणि ती त्या मुलीचा अपघात होईल या विचाराने जोरात धावली आणि त्या मुलीला रस्त्याच्या कडेला खेचल. एका क्षणाचा विलंब झाला असता तर ती लहानगी जीवाला मुकली असती. आजूबाजूला गर्दी जमा झाली आणि त्यातून वाट काढत त्या मुलीचे आई बाबा धावत आले, आईने मुलीला जवळ केल आणि रडतच म्हणाली, " थ्यांक्स, ती दुकानातून न कळत कधी बाहेर आली कळलंच नाही" मुलगी घाबरल्याने रडायला लागली. आई तिला समजावत बाजूच्याच खेळण्यांच्या दुकानात शिरली. गर्दीही आईबापाला दोष देत तिथून पांगली. आता तिथे फक्त ते दोघेच उभे होते. क्षणभर अगदी एक क्षणच त्यांची नजरानजर झाली आणि तिच्या निर्जीवपणे त्याला पाहणाऱ्या नजरेला नजर न भिडवता आल्याने त्याने त्याची मान झुकवली आणि तसाच बोलत राहिला, "आज तुझ्यामुळे माझी मुलगी वाचली.. तू नसतीस तर काय झाल असत? तुझे उपकार शब्दात नाही व्यक्त करू शकत मी .. " त्याची नजर तिच्या पावलांवर होती. तिची पावलं वळलेली पाहून त्याने वर बघितलं , ती निघून जात होती तसा तो लगेच म्हणाला, "माफ करशील मला?" आता मात्र ती थांबली, त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली, " माफ आपल्या लोकांना करायचं असत. ज्यांना आपली आणि आपल्याला ज्यांची गरज असते त्यांना करायचं असत. नात टिकवण्यासाठी माफ करायचं असत. मी तुझ्यासाठी कधीच नव्हते त्यामुळे मीही तुला त्या दिवसानंतर स्वतःच कधी मानल नाही. मेलेलास तू माझ्यासाठी त्याच दिवशी. आता या क्षणाला आपण फक्त परके आहोत एकमेकांना...अनोळखी आहोत आणि हो आणखीन एक मिस्टर कुणाल कारखानीस तुम्ही शिकवलेल्या धड्याबद्दल मी आभारी आहे तुमची ... पण आता तुम्हालाही एक मुलगी आहे ... तिची काळजी घ्या नीट ... आणि तिच्या आयुष्यात कोणी तुमच्यासारखा “कुणाल कारखानीस” येणार नाही याकडे लक्ष द्या. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी." एवढ बोलून तिने तिची वाट धरली, आज तिच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू होते, इतक्या वर्षानंतर तिला, त्याची चूक दाखवण्यात यश आल होत. कुणाल स्मिताच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत होता, आजही तिची मोठ्या काळ्याभोर केसांची वेणी कंबरेपर्यंत बांधली होती, आजही ती तितकीच साधी दिसत होती पण पूर्णपणे बदलली होती, त्या साध्या दिसण्यात साधेपणा मात्र नक्कीच नव्हता, पण तिचा तिच्या स्वतःवरचा आत्मविश्वास होता.
"कुणाल तू ओळखतोस का रे तीला? देवासारखी धावून आली बघ ती ... " बायकोच्या प्रश्नाने त्याची तंद्री भंगली. त्याची ३ वर्षांची मुलगी आईच्या खांद्यावरून उतरत बाबाकडे धावली, "अस नाही हं वागायचं छकुली ... तुला काही झाल असत तर बाबा मरून गेला असता ना" कुणाल त्याच्या मुलीशी बोलत होता.. त्याने तीला हृदयाशी कवटाळल, त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या, "तिच्या आयुष्यात कोणी तुमच्यासारखा “कुणाल कारखानीस” येणार नाही याकडे लक्ष द्या." हे स्मिताचे बोल त्याच्या डोक्यात घुमत होते. काही वर्षांपूर्वी केलेल्या चुकीचा त्याला आज पश्चात्ताप होत होता. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्याने केलेल्या चुकीची त्याला झालेली जाणीव दर्शवत होते. इतक्या वर्षांनी त्याला त्याची चूक कळाली होती.
.........मयुरी चवाथे-शिंदे.
कथा छान जमलीय.
कथा छान जमलीय. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध विशेष आवडला.
प्रेडिक्टेबल आहे पण छान
प्रेडिक्टेबल आहे पण छान मांडलिये.
खूप छान!
खूप छान!
खुपच छान... आताच... FB अंतरंग
खुपच छान...
आताच... FB अंतरंग वर वाचली.....
छान आहे. नेमक्या शब्दात
छान आहे. नेमक्या शब्दात हळुवारपणे मान्डलीय.
<कथा छान जमलीय.
<कथा छान जमलीय. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध विशेष आवडला.> +1
कथा आवडली.
कथा आवडली.
मस्त
मस्त
मस्त कथा
मस्त कथा
कथेत बरेच लॉजिकल झोल आहेत. पण
कथेत बरेच लॉजिकल झोल आहेत. पण तसं सांगायचं नसतं त्यामूळे
मस्त्!! आवडली.
खूप छान!
खूप छान!
छान!
छान!
छान आहे कथा
छान आहे कथा
वाचली. काहीतरी नाविन्य असेल
वाचली. काहीतरी नाविन्य असेल या आशेत शेवटपर्यंत वाचली. पण असो. सुरवातीची कथा म्हणुन ठिकठाक आहे. पुढील लेखणास शुभेच्छा.
रच्याकने, ते पश्चाताप असे लिहा, पश्चात्ताप नाही.
छाने.. तित्तकीशी नै
छाने..
तित्तकीशी नै आवडली..
तुमच्या आधीच्या लेखनावरुन तुम्ही आणखी छान लिहु शकता अस वाटत..पुलेशु
मस्त...
मस्त...
हि घटना खरी घड्ली आहे. फक्त
हि घटना खरी घड्ली आहे. फक्त नावे बद्लुन सादर केली आहे बहुतेक.
सादरीकरण जमले आहे. छान !!! आवडली.
नंदिनी : प्रेमात पडल्यावर कस्ले लॉजिक न काय...
प्रेमात पडल्यावर लॉजिक
प्रेमात पडल्यावर लॉजिक नसूदेत, किमान कथेत तरी असायला हवे.