मेरे पास राधे मॉं है! - दिवस ३ रा

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 August, 2015 - 17:54

सध्या सोशलसाईटसवर राधे मा आणि त्यांचे स्कर्ट घातलेले फोटो हिट ठरताहेत.
आणि त्यावरूनच व्हॉटसपवर एक मेसेज फिरतोय,

व्हाय शूड* बाबाज हॅव ऑल द फन ..
- राधे मा

ज्यांना लगेच विनोद समजत नाही अश्यांना उलगडून देतो. म्हणजे आसारामबापूंसारखे पुरुषच का बाबागिरीच्या आड लाईफ एंजॉय करणार.. आता आमची पाळी आहे Happy

विनोदावर हसलो आणि फॉर्वर्ड केला. मायबोलीवर नव्हता टाकला कारण राधे मा यांचे कोणी भक्त इथे असल्यास भावना दुखवायला नको.

आज मात्र टाकला कारण हा विनोद नव्हताच असा साक्षात्कार मला सोनू निगमच्या लेटेस्ट ट्वीट वरून झाला.
त्याने स्त्री-पुरुष समानतेचा हाच मुद्दा उचलत राधे मा यांच्या बचावासाठी ट्वीट केलेय की जर पुरुष साधू नग्न फिरू शकतात तर राधे मा यांनी स्कर्ट घातले तर बिघडले काय?

मगाशी सविस्तर बातमी पाहिली,
पुढे त्याने जोडले आहे की मी कोणाला मानत वगैरे नाही पण माझा मुद्दा एवढाच आहे की कपड्यांच्या लांबीवरून कोणा स्त्रीचे चारीत्र्य ठरवू नये.
अर्थात, स्वतंत्रपणे हा मुद्दा योग्यच आहे. पण नक्कीच राधे मा प्रकरणात हा आणि एवढाच मुद्दा नसावा.

काही का असेना, आपल्या कडून स्त्री-पुरुष समानता राखली जावी म्हणून पुरुष बाबा बापू महाराजांवर जसे मायबोलीवर आजवर अनेक धागे निघालेत तसा हा एक धागा स्त्री असलेल्या राधे मा के नाम Happy

* शूल्डचे शूड करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.

-----------

राधे मा यांना सुभाष घई यांनी भक्तीपुर्ण पाठिंबा दर्शवला.

Radhe Maa treats me and my wife as her parents: Subhash Ghai

http://www.hindustantimes.com/bollywood/radhe-maa-treats-me-and-my-wife-...

पुरा बॉलीवूड जुट गया है राधे मां को बचाने के लिये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा घरन्गळायला नको इकड-तिकड>>>>> हो ना. जर चर्चेअंती काही निष्पन्न झालंच तर त्या राधेमाँचे शिष्यत्व घेतलेला ऋन्मेष मी इमॅजिनतोय.:P

ऋन्मेऽऽष ,तु चहावाला कशाला मध्ये आणतो आहेस लोक उगाच त्यांच्या इंग्लिश भाषणाच्या लिंका डकवतिल.आणि ती राधे मा अडगळित जावुन पडेल.

>>>मला मराठीत असा एक शब्द सांग ज्यात एखाद्या अक्षराचा उच्चार सायलेंट आहे<<<

ड्यु आय डी - ह्यात 'ड्यु' ह्या अक्षराचा उच्चार सायलेंट आहे.

(शब्दही बराचसा मराठीच आहे)

बनवली कोणी हे मॅटर करत नाही.
तुम्ही वापरता तर ती योग्य आहे की नाही हे बघणे तुमची जबाबदारी आहे.

बनवली कोणी हे मॅटर करतच
आणि तुला जर त्या भाषेचे नियम मान्य नसतील तर तू ती भाषा वापरु नकोस

स्वतःची चूक मान्य करायची नाही म्हणून काय वाटेल ते समर्थन देतोयस

व्हाय शोउल्द बोयस हवे आल थे फुन ?

आणि साहेबाने सांगितली म्हणून कोणी ही भाषा तशी बोलत नाही
तर ती भाषेचे नियम तसे आहेत म्हणून ती तशी बोलली जाते

देवा ,,, मी तरी कोणाला सांगतीये ज्याला अस वाटत की ह्या अख्ख्या जगात हाच एक शहाणा आहे

ऋन्मेऽऽष, चुकीचे म्हणणे लावून धरण्यात काहीच अर्थ नाही ( अर्थात ते चूक आहे असे तुम्हाला वाटतच नाहीये Happy )
मराठी ही phonetic भाषा आहे म्हणजे ती ज्या प्रकारे उच्चारली जाते त्याच प्रकारे लिहिली जाते ( अगदी टिळकांनी तीन प्रकारांनी लिहून दाखवलेले संत, सन्त आणि सन् त सुद्धा उच्चारांना अनुसरुनच लिहिले आहेत वेगवेगळे स्पेलिंग झाले तरी Wink )
तर इंग्लिशमधले काहीच शब्द उच्चारल्याप्रमाणे लिहिले जातात, बाकी ती phonetic भाषा नाही.उदा. read शब्द वर्तमानकाळ - भूतकाळ संदर्भाप्रमाणे अनुक्रमे रीड आणि रेड असा उच्चारला जातो. ough सारखा समूह तर though (like o in go),through (like oo in too),cough (like off in offer),rough (like uff in suffer),plough (like ow in flower),ought (like aw in saw),borough (like a in above / o in go ) अशा सात वेगवेगळ्या प्रकारे उच्चारला जातो. मनातल्या मनात चार इंग्लिश वाक्य बोलून पाहिली तर हे लगेच लक्षात येईल.

थोडक्यात कुठल्याही भाषेतला शब्द देवनागरीत लिहिताना मूळ उच्चाराप्रमाणे लिहिणेच बरोबर आहे कारण बोली भाषा आधी येते आणि लिखित भाषा नंतर. लिपी हे उच्चार समजावण्याचे साधन आहे.

************
राधे मां विषयाला पास !!

अगो , तुम्ही कोणाला समजावताय
हा माणूस स्वतःची चूक कधीच मान्य करणार नाही
दगडावर डोक आपटल तर आपलाच कपाळमोक्ष होतो
दगडावर काही परिणाम होत नाही

चुका कमी करायचा प्रयत्न असतोच, पण ते पुर्णतः शक्य होत नाही, म्हणून केलेल्या चुकांना काही ना काही एक्सक्यूज द्यायची कला अवगत करायचा प्रयत्न करतोय.हे ह्यानीच पूर्वी एके ठिकाणी लिहिलंय
त्यामुळे तुम्ही त्याला कितीही समजावयाचा प्रयत्न केलात तरी तो चूक मान्य करण्या ऐवजी एक्सक्युज देत राहणार

ड्यु आय डी - ह्यात 'ड्यु' ह्या अक्षराचा उच्चार सायलेंट आहे.
>>
ड्यु आयडी असा शब्द कसा असेल? डु आयडी म्हणजे - Du ID म्हणजे Duplicate ID असा आहे ना तो शब्द?
तसाच उच्चारही आहे.

अगो, मस्त पोस्ट
पण त्याला 'समजून' घेण्यात काही इंटरेस्ट असेल असे वाटत नाहीये गं. तो टाईमपास करतोय (आणि म्हणूनच मी पण)

अगो छान पोस्ट .. Happy
हा प्रश्न धागा नसल्याने तारांकीत करायची सोय नाही अन्यथा आपली पोस्ट वर घेतली असती.

शंका समाधान होईपर्यंत वाद संपवू नये असे श्यामची आई म्हणायची ते मी करतो,
तुर्तास शंकासमाधान झाले.

आधीच या धाग्यावर आपण अवतरला असता तर एव्हाना राधे मा देखील अवतरल्या असत्या. Wink

असो, काही हरकत नाही,
आता सर्वांनी राधे मा कडे वळूया..
(दुपारी मी कोणाला तरी माझा मुद्दा पटवायला एक गोष्ट सांगणार होतो ती पुन्हा कधीतरी)

आता विषय पूर्णत: भरकटला आहेच तर इंग्लिश विषयक आणखी एक पोस्ट -

आपण समजतो तितकी काही इंग्लिश विचित्र भाषा नाही खासकरुन उच्चारांच्या बाबतीत. जसे तुम्ही कधी gh यांच्या संयोगाचा उच्चार घ हा शब्दाच्या शेवटी झालेला पाहिला आहे का? कारण ग् व ह् यांच्या व तत्सम गटातल्या वर्णांचा संकर जेव्हा शेवटी होतो तेव्हा उच्चार बदलण्याचा नियम आहे. नाहीतर ghoti चा उच्चार फिश करता येतो (gh = f as in tough, o = i as in women(phonetic wimin) and ti = sh as in action). तशाच एका नियमामुळे जर ou स्वर संयोग आणि कठोर वर्णाच्यामध्ये ल येतो आणि त्याला silent करतात कारण त्यांच्या नैसर्गिक उच्चारात तो आपोआप निसटतो(silent होतो).

आता धागाकर्ता जे करत आहे ते transliteration आहे म्हणजे एका भाषेतल्या शब्दाचा उच्चार दुसऱ्या भाषेच्या लिपित लिहिणे. इथे compulsory तुम्हाला उच्चारण आणि उच्चारणच फॉलो करायचे असते आणि शूल्ड लिहिण्यासाठी दिलेली सर्व कारणे भयंकर आहेत. जर त्यातून विनोदनिर्मिती अपेक्षित होती तर तो प्रयत्न फसलेला आहे, त्यातून चिडचिड निर्मिती मात्र नक्की होत आहे.

ओह हां एक राहिले. आता हे उच्चारण मूळ भाषेबर हुकुम असावे. आता जपानी कधी कधी र चा उच्चार ल करतात. तुमच्या नावाचे transliteration तुम्ही करत आहात तसे जपानी लोकांनी केलेले चालेल काय?

अगो, पायस, पोस्ट छान.
पायस, ते धागाकर्ता मुद्दाम करतो आणि ह्याच नाही तर त्याच्या जवळजवळ सगळ्या धाग्यांवर. जेणेकरून वाद घालण्यात त्याचेच प्रतिसाद जास्त पडून धाग्याची बरकत होईल. आता आणखी काही समजवायला जाऊ नका नाहीतर दोन नवीन बीबी ह्यातून जन्म घेतील.
शूल्ड सारखंच वॉल्क, टॉल्क हे शब्दही नेहमीचे आहेत त्याचे.

धन्यवाद पायस.
या धाग्यावर आपण खरंच इंग्रजी शिकू शकतो. ऋन्मेष तरी पदवीधर असेल, मला लहानपणीच शाळेतून काढल्याने इंग्लीश अत्यंत कच्चं राहीलं आहे. मराठीची पण बोंब आहे आणि हिंदीत तर भयाण विनोद होत असतात. तर इथे एक जरी भाषा राधे मां च्या कृपेने पक्की झाली तरी माझा लाभ होऊ शकतो.क्जय राधे मां !

प्रतिसादात राधे मां चा उल्लेख असल्याने तो अवांतर ठरवता येणार नाही.

धन्यवाद पायस,
आपल्या पोस्ट मोजक्याच असतात पण माहितीपुर्ण असतात. Happy

आता विषय पूर्णत: भरकटला आहेच तर >>>>
अश्या पोस्ट टाकण्यासाठी धागा पुर्णतः भरकटायची वाट बघायची गरज नव्हती. कारण माझा एक फंडा आहे, धागा कुठलाही असो, ज्ञान मिळणे महत्वाचे. Happy

खडीसा,
आपली ईंग्लिश भाषा या धाग्यावर पक्की झाल्यावर सांगा, मी राधे मा बद्दल त्यानंतरच लिहेन.

मला लहानपणीच शाळेतून काढल्याने इंग्लीश अत्यंत कच्चं राहीलं आहे. >>>>>खडीसाखर Lol हसल्याबद्दल सॉरी. पण खरच अस घडले आहे का? की तात्पुरते एक दिवसापुरते होते ते. तुम्ही बरचस छान लिहीता त्यामुळे तसे वाटत नाही.

अगो तुमची पोस्ट वाचून धागाकर्त्याच शंका समाधान झाल
तुमच्याशी त्याने कसलाही वाद घातला नाही ,ह्याबद्दल शाल ,श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन तुमचा सत्कार , कृपया हलके घ्या ...:दिवा:

3210-71549-flower-bouqet.jpgFree-shipping-brand-design-pink-blue-fasion-scarf-100-wool-scarf-women-showl-190cm-x-62cm.jpg_220x220.jpgcoconuts.jpeg

Runmesh tula ha MNC chajob kasa milala? Interview detana pan should would chya aivaji shuld wuld kelet kA??

तू विनोदाचे क्षीण किंवा फसलेले प्रयत्नही समजण्याच्या पलीकडे गेलेली आहेस ऋन्मेषच्या धाग्यामुळे
>>>
हे खरय Proud

जय राधे मां !
रश्मीजी, असं असंबद्ध नाही लिहायचं. प्रत्येक प्रतिसादात राधे मा किंवा स्त्री पुरूष समानता असा उल्लेख आला पाहीजे.

उदा.
खडीसाखर हाहा हसल्याबद्दल सॉरी. पण खरच अस घडले आहे का? की तात्पुरते एक दिवसापुरते होते ते. तुम्ही बरचस छान लिहीता त्यामुळे तसे वाटत नाही. >>> हे खालीलप्रमाणे लिहायचं..

खडीसाखर हाहा राधेमाकृपेने हसल्याबद्दल सॉरी. पण खरच अस घडले आहे का ? की तात्पुरते एक दिवसापुरते होते ते. तुम्हीस्त्री पुरूष संबंधावर बरचस छान लिहीता , त्यामुळे राधेमां कृपेने तसे वाटत नाही.

उत्तर : धन्यवाद . स्त्री पुरूष समानता चिरायू होवो. जय राधे मां !

Pages