देशप्रेम?

Submitted by अभिजित चोथे on 16 August, 2015 - 02:54

मित्रानो थोडा वेळ काढून नक्की वाचा आणि पटले तर शेअर करा.

मला हक्क नाही तरी तुमच्या साठी माज्याकडे काही प्रश्न आहेत.
आज तुमचा व्होट्स अप स्टेटस काय आहे? तुमचा प्रोफाईल फोटो कोणता आहे? कदाचित काल होता तोच असेलच असे नाही आणि तोच असावा अशी माझी इच्छाही नाही. कारण त्यावरून तुमचे देशप्रेम सिद्ध होत नाही.

मग दुसरी गोष्ट.
कुठे आहे कालचा दिमाखात तुमच्या हातात भिरभिरणारा तिरंगा? कुठे आहे काल तुमच्या छातीवर विराजमान असणारा तिरंगी बँज?
आठवतंय का?
नाही आठवत ना? मग का मिरवलत काल हे सगळे?
का प्रदर्शन मांडलत आपल्या देशभक्तीचे?

सोशल साईट वर स्टेटस टाकणे, शुभेच्छांचे फोटो टाकणे, गाड्यांवर तिरंगा लाऊन उगाच हॉर्नचा मोठ मोठा आवाज करत फिरणे, पांढरे शुभ्र कपडे घालून कार्यक्रमात फिरणे, काहीतरी हेतू ठेऊन या दिवशी मोफत वस्तूंचे वाटप करणे. याला म्हणतात का देशप्रेम?
कोणाही सामन्याला असा प्रश्न केला तर त्याचे एकाच उत्तर असेल,
नाही!
मग कशाला म्हणायचे देशप्रेम?
वर्षातील प्रत्तेक दिवशी तिरंग्याचा आदर करणे याला म्हणतात देशप्रेम.
तुम्ही करतो म्हणाल मग कुठे आहे कालचा तिरंगा
काहीना आठवत असेल काहीना नसेल आठवत.
काहींनी तो घरातही ठेवला असेल पण तो नक्कीच आज सापडत नसेल कारण तो अडगळीत किंवा पेपरच्या रद्दीतच असेल.

कायम राष्ट्रगीताचा आदर करणे याला म्हणतात देशप्रेम.
काल देशप्रेम म्हणून केला असेल आदर पण टीवीवर प्रो कबड्डी वेळी राष्ट्रगीत सुरु असताना घरात राहता का उभे? कसे राहणार तिथ कोण असतंय बघायला . नाही उभा राहिले तर कोण विचारणारे आहे.

सार्वजनिक नियमांचे पालन करणे याला म्हणतात देशप्रेम.
आठवतोय का ट्रँफिक सिग्नल, आठवतेय का थुंकताना गलिच्छ करणारे एखादे स्टेशन .

भ्रष्टाचाराला प्रोत्साहन न देणे याला म्हणतात देशप्रेम.
कचरता का एकाद्या अधिकार्याला लाच देताना?

जास्त काही नाही हो आपल्या देशाला सुंदर बनवेल, आपल्या देशाचे शासन नीट चालेल अश्या सर्व गोष्टी करण्याची तयारी असणे याला म्हणतात देशप्रेम.

करतो का आपण या गोष्टी?
खरे उत्तर द्यायचे झाले तर काही चांगल्या गोष्टी आपण करतोही पण तेवढ्याने आज च्या युगात भागणार नाही.त्या काहीची जागा सर्वने घेणे गरजेचे आहे तरच आपण पुढे जाऊ कारण आज जग चंद्रावर पोहोचले आहे आणि आपण एवढी प्रगती (फ़क्त भौतिक मानसिक न्हवे ) करून अजून डोंगरावरच आहोत.
मी लिहिले आहे म्हणजे मी वेगळा आहे असे नाही मीही तुमच्यातलाच एक आहे. बदल तुमच्यात माझ्यात सर्वांच्यात गरजेचा आहे.
जय हिंद जय भारत.

आपलाच - अभिजित चोथे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहमत तुमच्या विचारांशी.

आजच आमच्या सोसायटीच्या आवारात काही चुरगळलेले, फाटलेले झेंडे मिळाले जे काल मोठ्या दिमाखात हौशी देशप्रेमींनी लावलेले होते. Sad

आमच्या ऑफिसला सालाबादाप्रमाणे १४ ऑगस्टला १५ ऑगस्ट साजरा केला गेला. अर्थातच झेंडा नाही फडकवला कारण तो मान १५ ऑगस्टसाठी राखून ठेवला.

सर्वांना आपल्या शर्टावर लावायला झेंडावाटप करण्यात आलेले.
पण मी मात्र तो झेंडा नाही घेतला, नाही लावला.

कारण असे दिले, की "मी धांदरट आहे, आणि मला तो नंतर सांभाळता येणार नाही .. कुठेतरी गहाळ होईल माझ्याच्याने आणि तो राष्ट्रध्वजाचा अपमान होईल ..

सगळे माझ्याकडे `हा नेहमी काहीतरी वेगळा फंडा मारत स्वतःला शहाणा दाखवयाचा प्रयत्न करतो' अश्या नजरेने बघायला लागले. Happy

>>मी धांदरट आहे, आणि मला तो नंतर सांभाळता येणार नाही<<
अरे काय हे, तुमच्या सारख्या तरुणांना एक झेंडा सांभाळता येत नाहि मग तुम्हि देश कसा सांभाळणार? Wink Light 1

"जि"

Runmesh 15 aug ani 26 jan anya diwashi sajara karane kitpat yogya vatate.

अभिजित, "पण आपल्याला त्याचे काय...."
गफ्रे मिळाली, १ तार्खेला दक्षीणा मिळाली कि आपण भले नी आपले धागे भले. देश आणि सामाजीक भान गेले खड्ड्यात.

आम्ही कॉलेज मधे असताना चार मित्रच मिळून एक काम करायचो, १५ ऑगस्ट अन २६ जानेवारी नंतर जितके फाटके रस्त्यात पडलेले कागदी प्लास्टिक दोन्ही चे झेंडे मिळत ते आम्ही पुढचे १५ दिवस आमच्यापरीने होतील तितके जमा करायचो, त्यांचे काय करावे हे कळत नसे मग त्याचे अतिशय चांगल्यप्रकारे दहन करुन रक्षा नदीत वगैरे सोडायला सुरुवात केली होती मग ते सुद्धा मनाला पटेना तेव्हा हा कार्यक्रम सोडुन दिला अन नुसतेच जमा करत असू, आज वाटते असे झेंडे (कागदी) जमा करुन जर एखाद्या रीसायकल पेपर तयार करणाऱ्या NGO किंवा लघु उद्योगाला दिल्यास त्याचा उत्तम विनिमय होऊ शकतो. आम्हाला काही कळत नसल्याने आम्ही दहन करत असू पण ती एक घोड़चुक होतीच् त्यात वाद नाही

अवातराबद्दल क्षमस्व अभिजित चोथे-

मायबोलीवर काहीजणंना ऋन्मेषफोबिया झाला आहे हे पटले.
गफ्रे मिळाली, १ तार्खेला दक्षीणा मिळाली कि आपण भले नी आपले धागे भले. देश आणि सामाजीक भान गेले खड्ड्यात.>> हे वाक्य याच फोबियामधुन आलेले दिसतेय. गफ्रे, पगार या त्याच्या वैयक्तीक बाबी आहेत. त्यावरुन त्याचे सामाजिक भान, देशप्रेम यांचे मोजमाप कसे होऊ शकते?? पण ऋन्मेषने लिहिलंय ना, मग ठोकाच ही स्वतळ्मधिल विकृती तपासुन पाहिली तर बरी.

राष्ट्रध्वजाचा चुकुनही आपल्याकडुन अनमान होऊ नये यासाठी मी तो शर्टवर लावला नाही हे तो सांगतोय, तरी त्याला नसते सल्ले देण्याचे कारण?? की आपण 'उजवे' आहोत म्हणुन देशभक्ती आम्हालाच ठाउक आहे असा गैरसमज? चोथेंनी वर लेखात लिहिलंय त्याप्रमाणे तो (किंवा अन्य कोणिही) वागत असेल आणि १४ ऑगष्टला ऑफिसात साजरा करण्यात आलेल्या समारंभात तो सहभगी झाला की त्याचे माप काढायचे?? get well soon. असो.

१४ ऑगष्टला ऑफिसात साजरा करण्यात आलेल्या समारंभात तो सहभगी झाला की त्याचे माप काढायचे?? >> ते माप १४ साजर करतो म्हणून नाही तर "अभिजीत, ते ठाऊक आहे सर्वांनाच. पण आपल्याला त्याचे काय.." या अरोगन्ट + ईग्नोरन्स मुळे काढले गेले आहे याची कृपया नोंद घ्यावी मि. डुआय.

अ‍ॅरोगन्स आणि अ‍ॅटीट्यूड माझ्यात कमालीचा भरलाय, आफ्टरऑल शाहरूखचा पंखा आहे Happy

पण वरील आपल्याला त्याचे काय याचा अर्थ चुकीचा लावण्यात आला आहे.

१४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे त्याचे आपल्याला काय करायचेय. आय मीन आपल्या सेलिब्रेशनशी त्याचा काय संबंध? आपण कशाला दुखवटा पाळायचा? तुम्हाला अखंड भारत व्हावा अशी इच्छा असेल तर मग येस्स, हा दिवस दुखवटा पाळायचा असू शकतो.