जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १५

Submitted by मार्गी on 13 August, 2015 - 04:58

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)

जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ८
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ९
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १०
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ११
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १२
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १४

मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस

१८ ऑक्टोबरची थंड पहाट! शंकराचार्य मंदीर बघण्यासाठी पहाटे लवकर उठून सव्वा पाचला बाहेर पडलो. डॉ. देसाई सरांसोबत पायी पायी निघालो. इथून सुमारे तीन किलोमीटरवर दल लेकजवळ शंकराचार्य मंदीराचा डोंगर सुरू होतो. तो साडेपाच किलोमीटरचा छोटा घाट आहे. अर्थात् एकूण अंतर आठ किलोमीटर असेल. जायला सुमारे दोन- अडीच तास वेळ लागेल. चार तासांमध्ये परत येऊन नऊ नंतर आश्रमाच्या शिबिरासाठी तयार राहायचं‌ आहे. हा प्रवास एकदम सुंदर झाला. पहाटे पूर्ण अंधारात टॉर्च घेऊन निघालो. रस्ता माहित झालेला आहे. सकाळी‌ ट्रॅफिक अगदी विरळ आहे.

अंधारात मंदीरातला मोठा दिवा इथपर्यंत प्रकाश देतोय आणि दिशा देतो आहे. दल लेकला पोहचेपर्यंत उजाडलं नाही. सुमारे सव्वा सहाला मंदीराकडे जाणा-या रस्त्यावर पोहचलो. मंदीर ह्या टेकडीवर आहे आणि सुरक्षा कारणांमुळे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तिथे जाऊ दिलं जात नाही. म्हणून सकाळी लवकर जायचं ठरवलं. हळु हळु उजाडतं आहे. तिथे सीआरपीएफची एक पोस्ट आहे. तिथल्या जवानाने आत जाण्याची अनुमती दिली नाही. म्हणाला की, साडेसहानंतर या. मिलिटरीवाल्यांसोबत वाद घालायचा नसतो; पण बोलून गेलो की, आरती तर पहाटेपासून सुरू आहे, मग का जाऊ देत नाही? त्यावर त्याने अगदी प्रेमाने सांगितलं की, आरती तर संध्याकाळीसुद्धा सुरू असते, पण तेव्हाही‌ आम्ही कोणालाही तिथे जाऊ देत जात नाही!

थोडा वेळ दल लेकच्या किना-याजवळ फिरलो. अजूनही तसा अंधारच आहे; त्यामुळे लेक बघता येणार नाही. अर्थात् तिथे असण्याचा अनुभवसुद्धा रोमांचक आहे. स्ट्रीट लाईटच्या उजेडात एक बॅनर दिसलं- सेव्ह गाजा. काही वेळ तिथे थांबून पुढे निघालो. साडेसहा वाजता पुढे जायची अनुमती मिळाली. आणि जाण्यापासून का थांबवलं होतं, हे पुढे गेल्यावर लगेचच कळालं.

पुढे रस्ता जंगलातूनच जात होता. हळु हळु दल लेक आणि श्रीनगर खाली राहून गेलं. मंदीर परिसरातले दोन वॉचमन वर जात होते; त्यांनी आम्हांला बघून लगेच विचारलं कि कॅमेरा आहे का? पहिले मनात शंका आली की हे कॅमेरा काढून तर घेणार नाहीत? कारण वर मंदीरात मोबाईलसुद्धा नेण्याची अनुमती नाही. अर्थात् मंदीर अजून खूप वर आहे. प्रत्यक्षात त्यांनी एक अस्वल बघितलं होतं. आणि थोड्याच वेळात ते आम्हांलाही दिसलं! एका जागी रस्ता ओलांडून ते जंगलात निघून गेलं. ह्या वॉचमनसोबत चार मोठे कुत्रेसुद्धा आहेत. त्यांनी आम्हांला त्यांच्यासोबतच चला असं सांगितलं. नंतर रस्त्यावर अस्वलाने केलेली मोठी विष्ठासुद्धा दिसली. तेव्हा कळालं की ह्या कारणामुळेच त्या जवानाने आम्हांला उजाडण्याआधी पुढे येऊ दिलं नाही.

रस्ता एकदम उत्तम आहे. पण त्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एका जागी पक्का रस्ता सोडून शॉर्ट कट घेतला. ही एकदम जंगलातून आणि सरळ वर जाणारी पायवाट आहे. पण त्यामुळे आमचं अंतर कमी झालं आणि वेळही वाचला. सुमारे पंधरा मिनिट ह्या तीव्र चढाच्या वाटेवरून गेल्यावर परत पक्का रस्ता आला. आता खाली काहीही दिसत नाहीय. नंतर एका जागेवरून सुंदर नजारा दिसला. दूर पीरपंजालमध्ये बर्फ दिसतो आहे. लवकरच मंदिरात पोहचलो. तिथे मोबाईल्स ठेवून पुढे जावं लागलं. मंदिराला २५० पाय-या आहेत. मंदीर खूप शांत आहे. तिथे शंकराचार्यांची साधना गुफासुद्धा आहे. वरून फारच रमणीय नजारा दिसतो आहे. संपूर्ण कश्मीर व्हॅलीचंच दर्शन झालं. एका बाजूला पीरपंजालची बर्फाच्छादित शिखरं तर दुसरीकडे सोनामार्गच्या बाजूलासुद्धा धवल शिखर दिसत आहेत. दक्षिणेलाही बर्फ दिसत आहे. अत्यंत रोमांचक दृश्य आहे हे! मोबाईल ठेवल्यामुळे फोटो घेता आले नाहीत.

येतानासुद्धा रस्त्यावर दाट धुकं होतं. नंतर परत शॉर्ट कट घेतला. तीव्र उतारावर उतरणं थोडं अवघड आहे; पण तरी उतरलो. अगदी खाली आल्यानंतरच धुकं गेलं आणि मग दल लेकचं मनोहारी दर्शन झालं. खरोखर हे लेक नसून दरिया आहे! शिबिराला उशीर होण्याची शक्यता बघून दल लेकपासून काही अंतर चालल्यानंतर ऑटो घेतली. उतरताना गुडघा मुरगळला आहे; त्यामुळे चालताना थोडा त्रास होतो आहे. असो.

आज शेवटचं शिबिर आहे. कारण उद्या सकाळी श्रीनगरहून निघायचं आहे. डॉक्टर सर म्हणत आहेत की, मी गेल्यानंतर ते हे शिबिर एकटेसुद्धा घेऊ शकतील. ते घेऊ तर शकतील; पण त्याला वेळ लागेल. कारण ते जेव्हा रुग्णाला तपासतात व औषध सांगतात; तेव्हा आम्ही लगेच औषध काढून ठेवतो. त्यामुळे माझ्या जागी त्यांच्यासोबत कोणी कार्यकर्ता असला पाहिजे. शिबिर नेहमीसारखं झालं. इतक्या दिवसांमध्ये शिबिरामध्ये ठराविक रोगांचेच रुग्ण येत आहेत. पूरामुळे काही लोकांच्या त्वचेवर किंवा चेह-यावर डाग येतात. अंगदुखी होते. एक- दोन जणांना डॉक्टर सरांनी इंजेक्शनसुद्धा दिलं; पण ते रुग्णाने स्वत: आणलेलं होतं. आज सत्तर रुग्ण आले. अनेक दिवस इथे येत राहिल्यामुळे ह्या जागेबद्दल आपुलकी वाटत आहे. चिनारचा हा विशाल वृक्ष! पण आता निघायचं आहे.

परत जाताना गुडघा बराच दुखतोय. चालता येत होतं; पण गती एकदम कमी झाली आहे. आणि ६४ वय असलेले डॉक्टर सर एकदम फिट आहेत! त्यांचे पाय अजिबात दुखत नाही आहेत! असो. दुपारी थोडा वेळ पायांना आराम दिला. थोडा आराम पडल्यावर डॉक्टर सरांसोबत औषधं लावून ठेवली. कार्यकर्त्यांसोबत गप्पाही सुरू आहेत. आज डॉक्टर सर गांदरबलला जातील. उद्या सकाळी त्यांचं तिथेच शिबिर होईल. आणि पवनजी कालच गेले आहेत. म्हणजे आज इथे आम्ही फक्त तिघे जण असू. संध्याकाळपर्यंत शिबिरांचं थोडक्यात रिपोर्टिंग करून झालं. पुढे डॉक्टर सर ते मेंटेन करतील.

संध्याकाळी कार्यकर्त्यांसोबत भेटी गाठी झाल्या. नज़ीर भाई, फयाज़ भाई, हिलाल भाई, बिलाल भाई, जावेद भाई आदि सर्वांसोबत एकदा भेट झाली. जावेद भाईंचं तर गाणंसुद्धा रेकॉर्ड केलं आहे! खरोखर त्यांच्या गाण्यामध्ये एक भाव आहे. काही दिवसांमध्येच हे लोक मित्र बनले होते. अनेक दिवस सोबत राहिलो. सोबत काम केलं आणि चांगला वेळ सोबत घालवला. . .

सगळे गेल्यानंतर कार्यालय एकदम शांत झालं आहे. परत परत कालची चर्चा आठवते आहे. अंकलजी आणि एका कार्यकर्त्याने सांगितलेल्या काही गोष्टी आठवत आहेत. एका कार्यकर्त्याने म्हंटले होते की, सर्व स्थानिक कार्यकर्ते इथे थांबतात; इथे जेवण करतात; इथेच झोपतात; पण ते त्यांच्या गाद्या- पांघरूण कधीच आवरून ठेवणार नाहीत; इथलं काम करणार नाहीत. बाकी गोष्टी सर्व ठीक आहेत; पण इथून बाहेर गेल्यावर आम्हांला त्यांच्यापासून आपोआप वेगळे असल्याचं जाणवतं. श्रीनगरमध्ये आल्या आल्या ऑटोवाल्याने पहिले हेच विचारलं होतं- मुसलमान की हिंदु? इथे दादाजी गोड बोलून सगळ्यांकडून काम करून घेतात; पण जेव्हा ते इथे नसतात; तेव्हा ह्यांचा व्यवहारही ढिला दिसतो. नक्कीच ह्यामध्ये थोडं सत्य आहे. पण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जायचं आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं म्हणजे तारेवरची कसरत आहे. अनेक वेळेस तर असं होतं की, काही कार्यकर्ते काही गोष्टींमध्ये खूप चांगले असतात; मध्यरात्री हाक मारली तरी तयार असतात; पण त्यांच्या काही सवयी आपल्यासाठी अडचणीच्या असतात. हे द्वंद्व तर असणारच आणि त्यातूनच मार्ग शोधावा लागतो.

एक गोष्ट वारंवार मनात येते आहे. इथे ज्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या; जे वेगवेगळे विचार समोर आले; ते सर्व खूप मानवी आहेत; स्वाभाविक आहेत. व्यक्ती- विशिष्ट नसून परिस्थिती विशिष्ट आहेत. जर अशा एखाद्या परिस्थितीमध्ये अमुक व्यक्तीला टाकलं तर वीसपैकी एकोणीस वेळेस ती व्यक्ती अशीच वागेल. त्यामुळे ह्या प्रतिक्रियांकडे किंवा मतभेदांकडे व्यक्तिगत दृष्टीने बघून चालणार नाही. जसा तणाव ही‌ एक सार्वजनिक गोष्ट आहे; तो व्यक्ती विशिष्ट असू शकत नाही. तशाच ह्या सर्व प्रतिक्रिया व मतभेदही सार्वजनिक आहेत; individual नसून universal आहेत| दुसरी गोष्ट परत परत आठवत होती ती म्हणजे ज्या भिन्नता आहेत; जे मतभेद आहेत; जे बघण्याचे वेगळे वेगळे दृष्टीकोन आहेत; त्यासंदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. जे काही‌ विचार असतील, जे जे विभिन्न दृष्टीकोन असतील; त्यांना ते आहेत तसेच बघितले पाहिजेत. अनेक वेळेस आपण दुस-याचं मत बदलण्याचा प्रयत्न करतो; दुस-यांच्या भिन्न विचारांना स्वीकारू शकत नाही. पण असं करायला नको. प्रत्येक दृष्टीकोनाचा स्वीकार आणि आदर असायला पाहिजे. दुस-याच्या मताला बदलवण्याचा किंवा एखाद्या गोष्टीबद्दल convince करण्याचा प्रयत्न एक प्रकारच्या असुरक्षिततेतून येतो. एक सुंदर हिंदी गाणं आहे- समझनेवाले समझ रहे हैं; नासमझें है वो अनाड़ी हैं. जे लोक बघू‌ शकतात; समजू शकतात ते समजू शकतील आणि जे बघू शकत नाहीत; ते नंतरही बघू शकणार नाहीत. म्हणून कशाबद्दल वादविवाद करायचा किंवा भांडायचं? प्रत्येक दृष्टीकोन महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये थोडं सत्य आहे. इतकं समजणंही पुरेसं आहे. असो.

संध्याकाळी डॉक्टर सर आणि अन्य कार्यकर्ते निघाले. डॉक्टर सरांचं वय जास्त असूनही थोड्या दिवसांमध्ये त्यांच्यासोबत चांगली मैत्री झाली होती. ते आपल्या कामाबद्दल एकदम कठोर होते. गोव्यामध्ये त्यांचं नर्सिंग होम आहे. तिथे ते आता तरूण डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्याची संधी देतात. गोव्याला यायचं हार्दिक आमंत्रण त्यांनी दिलं. आज रात्री मी, मयूरभाई आणि अंकलजी हे तिघंच आहोत. उद्या पहाटे लवकर निघायचं आहे. उद्या रात्री जम्मूला थांबून दादाजींना भेटून पुढे जायचं आहे. संध्याकाळी सगळ्यांनी मिळून जेवण केलं. थंडीत खाली जाऊन पाणी आणतानाही खूप मजा आली. बस आता उद्या निघायचं आहे. . .


शॉर्ट कट


खाली ढगांचा समुद्र आणि सुदूर पीरपंजालमधले बर्फाच्छादित शिखर


दल लेकचा नजारा


परत उभे राहिलेले शिकारे


दरिया ए जेलम आणि एक मंदीर

पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १६ (अंतिम)

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ७
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ८
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ९
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १०
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ११
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १२
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्वल हा अतिशय विचित्र प्राणी आहे - कधी अंगावर चालून येईल सांगता येत नाही ...

बाकी सारा भाग वाचून अनेकविध गोष्टी उलगडत गेल्या - मानवी मन, मानवी स्वभाव या समजायला सगळ्यात कठीण गोष्टी आहेत - जिथे निसर्गमान देखील प्रचंड लहरी आहे तिथे तरी आपण तितकेच नम्र व्हायला पाहिजे, समजूतदार व्हायला पाहिजे - पण खरंच, अहंकार कुठे कधी जागा होईल सांगता येत नाही - (इतरांचा कशाला म्हणू - माझीही तीच अवस्था आहे की .... Happy )

आदि शंकराचार्यांच्या काळात तर किती निबिड अरण्य असेल तिथे - कसे काय आचार्य तिथे पोहोचले असतील ???