जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १२

Submitted by मार्गी on 10 August, 2015 - 07:16

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)

जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ८
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ९
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १०
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ११

सैदपोरामध्ये आरोग्य कँप

१५ ऑक्टोबरच्या सकाळी कालच्या प्रोपोझल्सवर चर्चा झाली. काही करेक्शन्स करून दादाजींनी ते मेलवर पाठवले. व्हिडिओसाठी लिहिलेला मजकूरसुद्धा दादाजींनी बघितला. त्यांनी बघितल्यावर सांगितलं की, वाईट वाटून नको घेऊस, पण ह्यामध्ये अजून खूप काही करावं लागेल. एक पद्धत असते गोष्टी प्लेन प्रकारे थेट सांगण्याची. त्यातून माहिती पोहचते; पण सांगितलेली जाणारी गोष्ट जीवंत होत नाही. दुसरी पद्धत म्हणजे त्या गोष्टीला जीवंत करून सांगायचं. त्यांनी त्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे प्रस्तुतीकरणासाठी वापरण्यात येणारी शैली लहान मुलांचं पुस्तक- चांदोबाप्रमाणे असली पाहिजे. त्यामध्ये वाचणा-यासाठी इंटरेस्ट निर्माण होतो. दादाजींनी पुढे सांगितलं की, अजिबात घाई नाही, वेळ घेतला तरी चालेल; आरामात हा मजकूर लिही. मग त्यांनी सेवा भारतीचे काही व्हिडिओजसुद्धा दाखवले. एकल विद्यालय अभियानाचा 'दस्तक' नावाचा एक व्हिडिओ खूप छान होता. संस्थेच्या कश्मीरमधल्या कामावरही एक व्हिडिओ आहे. एक व्हिडिओ संस्थेने लेहमध्ये ऑगस्ट २०१० मध्ये केलेल्या मदतकार्याचासुद्धा आहे. एक अन्य व्हिडिओ अमरनाथ श्राईन आंदोलनावरचा आहे; तोसुद्धा खूप रंजक आहे. वेळेअभावी तो बघता आला नाही. दादाजींनी म्हंटलं की, मी डॉक्युमेंटेशनसोबत डॉक्युमेंटरीसुद्धा करू शकतो. हे माझ्यासाठी नवीन डॉमेन असेल. त्यांचं‌ मार्गदर्शन खूप महत्त्वाचं वाटलं.

दादाजी आणि अन्य कार्यकर्ते आज परत जात आहेत. सुरेंद्रजींनी शिबिराच्या माहितीचं रोजचं‌ रिपोर्टिंग कसं करायचं ते सांगितलं. आजपासून आम्हांला तो मेंटेन करावा लागेल. आजसुद्धा पवनजी फॉगिंगसाठी जातील. त्यांनी सांगितलं की, काल ते जिथे गेले होते; तिथल्या सरकारी ऑफिसांची अवस्था वाईट होती. प्रचंड चिखल आणि कचरा अजूनही तिथे आहे. दुर्गंध असलेल्या ऑफिसातच अधिकारी लोक काम करतात व त्यामुळे त्यांना चक्कर येते. आणि जे अनुभव आरोग्य शिबिरांमध्ये येत आहेत; तसेच तिथेसुद्धा आले. सरकारी अधिका-यांनी त्यांना अनेक ठिकाणी फॉगिंग करायला सांगितलं. त्यातले काही तर त्यांच्या नातेवाईकांची घरं होती. घरोघरी जाऊन टॉयलेट व अन्य ठिकाणी त्यांना फॉगिंग करावं लागलं. ते थोडे नाराजसुद्धा होते; पण दादाजींनी त्यांना समजावलं आणि आज ते परत फॉगिंगसाठी तयार आहेत.

सकाळचं आश्रमातलं शिबिर नेहमीप्रमाणे झालं. कार्यकर्ते नाही आहेत; पण आता त्यांची आवश्यकता भासत नाही. सर्व योग्य प्रकारे मॅनेज होत आहे. तिथे पोहचल्यावर तिथले चाचाजी स्वागत करतात. मध्ये मध्ये चहाही पाजतात. आता हळु हळु कोणत्या रोगासाठी काय औषध द्यायचं हेसुद्धा लक्षात राहतं आहे! एक पोलिस रुग्ण आला होता. त्याला कोणीतरी क्रूर प्रकारे मारहाण केली होती. पोलिसही माणूस असतात हे जाणवलं. त्यांना मुका मार लागला होता; ज्यासाठी डॉक्टर सरांनी औषध दिलं. बाहेर रस्त्यावर लोक घोषणा देत जात आहेत; पण शिबिर चालू राहिलं. अपेक्षेप्रमाणे लोक शेवटपर्यंत येतच राहिले आणि कसंबसं वेळ संपल्यावर शिबिर बंद करावं लागलं. तोपर्यंत ८३ रुग्ण झाले.

आज दुसरं शिबिर पुलवामा जिल्ह्यातल्या सैदपोरा गावामध्ये होईल. त्यासाठी हिलाल भाई, फयाज़ भाई, नज़ीर भाई इत्यादी कार्यकर्तेसुद्धा सोबत असतील. आणि दादाजी आज जम्मूला जात आहेत. म्हणजेच आजपासून कार्यालय एकदम शांत होणार. दादाजींच्या उपस्थितीमुळेसुद्धा छान कामाचं वातावरण बनायचं.

सैदपोरा गावात पोहचेपर्यंत दुपारचे चार वाजले. हे शिबिर मोकळ्या जागेत घेण्याऐवजी खोलीमध्ये घ्यावं असा विचार आहे ज्यामुळे गर्दी होणार नाही आणि एका वेळी एकच रुग्ण बघितला जाईल. गर्दी होणार नाही, असं कार्यकर्त्यांनी विश्वासाने सांगितलं. एका मोठ्या घराच्या खोलीत शिबिर सुरू झालं. बाहेर गेटवर बॅनर लावलं आहे ज्यामुळे लोकांना सुरू झाल्याचं कळेल. एक गोष्ट अशी आहे की, गावामध्ये ह्याची माहिती फार पूर्वी देता आली‌ नाही. कारण कार्यकर्त्यांचं प्लॅनिंग त्याच दिवशी होतं; एक दिवस आधी होत नाही. त्यांनाही अनेक कामं असतात आणि अनेक गोष्टी बघायच्या असतात. तरीही एकदा शिबिर झाल्यावर लोक न थांबता येऊ लागले. पूर्वी जेव्हा अनेक शिबिर एका वेळी व्हायचे आणि अनेक डॉक्टर शिबिर घ्यायचे, तेव्हा मस्जीदमध्ये मस्जीद कमिटींच्या द्वारे शिबिराची घोषणा केली जायची. इथे गावांमध्ये आणखी एक गोष्ट विशेष होती ती म्हणजे ग्राम पंचायतचे लेटरहेड इंग्रजीत आहेत! लोकांना हिंदी चांगली समजते. आम्हांला कश्मिरी थोडीफार कळते.

आधीच्या शिबिरापेक्षा हे शिबिर जास्त शांततेत सुरू आहे. तरीही गर्दी झालीच. जवळ जवळ ८३ रुग्ण झाल्यावर नोंदणी बंद केली. तरीही लोक येतच राहिले. अंधार पड़ल्यावर थांबावं लागलं. रुग्ण थांबत नाहीत हे बघून हळु हळु औषधं एम्ब्युलन्समध्ये परत ठेवली. तरीही लोक ऐकत नव्हते. आता कार्यकर्ते आणि पवनजींना लाईटसच्या वितरणाची काळजी आहे. त्यांना ह्याच गावातल्या एका मोहल्ल्यामध्ये- खोमेनी मोहल्लामध्ये वितरण करायचे आहे. ती जागा इथून दूर नाही.

आता रस्ते सुनसान झाले आहेत आणि वितरणाचं काम सुरू होणार आहे. पण आज बहुतेक अजून वेळ लागेल. कारण जसे त्या मोहल्ल्यामध्ये पोहचलो, तसे अनेक लोक समोर आले आणि कार्यकर्त्यांकडे मागणी करायला लागले. ह्या गावातल्या दुस-या वार्डातल्या लोकांनासुद्धा लाईटस आणि ब्लँकेटस पाहिजेत. आता काय करावं? हे ठरवण्यामध्येच खूप वेळ गेला. एम्ब्युलन्स एका बाजूला उभी करून ठेवली गेली आहे. कार्यकर्त्यांचंही नक्की ठरत नाहीय. काही जण म्हणत आहेत की, काही गोंधळ होण्याची शक्यता असेल तर वितरण पुढे ढकलूया. अन्य काही म्हणत आहेत की, काही गडबड गोंधळ होणार नाही, आजच वितरण करू. वितरणाचं काम खूप ट्रिकी आहे; निसरडं आहे. कार्यकर्त्यांमध्ये एक जण ह्याच मोहल्ल्यातले पंच आहेत. ते म्हणत आहेत की, काही अडचण नाही; वितरण करू. जर आता वितरण केलं नाही तर लोक नाराज होतील आणि मग गडबड गोंधळ होऊ शकेल. त्यामुळे काही वेळ थोडा तणाव होता. बराच विचार करून ठरवलं गेलं की, लाईटस आणि ब्लँकेटसचं वितरण करून घेऊ.

परत एक छोटी मीटिंग झाली. फोटो घेतले गेले. लोक येत राहिले आणि काही लोकांनी तक्रारही केली. वितरणाच्या कामात खूप वेळ गेला. डॉक्टरही इथे आहेत हे लोकांना कळल्यावर अचानक लोक आजारी पडून औषधं मागायला लागले! निघतानासुद्धा काही लोकांना औषधं द्यावी लागली. लोकांना अनेक औषधं हवे होते. डॉक्टर सरांनी नम्र भाषेत त्यांना समजावलं. जाताना जास्तीचे लाईटससुद्धा द्यावे लागले. पवनजी त्यामुळे काळजीत होते. कश्मीरच्या परिस्थितीबद्दल काहीच माहिती नसताना त्यांना कंपनीकडून इथे पाठवलं गेलं होतं. रस्त्यावर अजूनही तुंबलेलं पाणी बघितल्यानंतरच त्यांना इथे पूर आला होता, हे कळालं. डॉक्टर सरसुद्धा म्हणत आहेत की, इथून पुढे लाईट वितरणाचं काम आरोग्य शिबिरापेक्षा वेगळं ठेवलं पाहिजे. त्यावेळी हेच वाटलं की, कंपनी सेवा भारतीसोबत भागीदारी करून खूप नफा कमवत आहे. जम्मूपासून श्रीनगरपर्यंट लाईटस आणणे, इथल्या गावामध्ये जाऊन त्यांचं वितरण करणे; कंपनीच्या ड्युटीवर असलेल्या माणसाचा राहण्या- खाण्याचा खर्च इत्यादी पैसे कंपनीने छान प्रकारे वाचवले. अर्थात् दादाजींना हे सगळं माहिती आहे. त्यांची बघण्याची दृष्टी थोडी वेगळी आहे. पण आता त्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगावं लागेल की, वितरण शिबिरापेक्षा वेगळंच ठेवावं.

रात्री गावातले रस्ते शांत झाले आहेत. श्रीनगरसुद्धा हळु हळु शांत होत आहे. दादाजी श्रीनगरमधून निघाले होते; पण काही काम बाकी राहिल्यामुळे थांबले असं कळालं. अजून एक दिवस त्यांच्याजवळ शिकायला मिळेल हे कळून बरं वाटलं. आज रात्रीचं जेवण मयूरजींनी बनवलं आहे. महाराष्ट्रीयन पिठलं! आणि जेवण मस्त तिखट झालं आहे ज्यामुळे थोडा वेळ थंडीपासून सुटका झाली! जेवण चालू असतानाच गोळ्यांचा आवाज येतो आहे असं मयूरजी म्हणाले. इथे श्रीनगरमध्ये ही नेहमीची गोष्ट आहे. आज सीआरपीएफच्या शिबिरावरही लोकांनी घोषणाबाजी केली. त्याच वेळी कळालं की, आज काही सरकारी अधिकारी इथल्या कार्यालयात औषधं नेण्यासाठी आले होते. दादाजींनी त्यांना समजावलं आणि थांबवलं. दादाजींना गावातला अनुभव सांगितला. डॉक्टर सरांनी वितरण वेगळं करण्याबद्दल सांगितलं व ते त्यांनाही पटलं. दादाजींसोबत इतकं बोलूनसुद्धा त्या अनुभवामुळे आलेला सूक्ष्म ताण दूर झाला. हिलाल भाईंचे वडील अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत; त्यांना डिस्चार्ज मिळालेला नाही. आज हिलाल भाईंचे काही नातेवाईक आणि अन्य कार्यकर्ते कार्यालयातच थांबतील. थंडी इतकी जोरदार आहे की, लगेच ब्लँकेटमध्ये गुडूप होऊन जावसं वाटत आहे.


पुरामुळे झालेल्या जखमा अजूनही ताज्या आहेत


गावाकडचा पक्का रस्ता- कश्मीरच्या समृद्ध ग्रामीण जीवनाची झलक

पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १३

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ७
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ८
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ९
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १०
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ११
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय.

हे मदतकार्य म्हणजे जिवावर बेतणारे कार्य आहे. पवनजींचा अनुभव वाचुन वाटतेय की लोकांना कोणी मदत करायला गेले तर लोक बिनपगारी नोकर आला असल्यासारखे त्याच्याशी वागतात.

जिथे फुकट वस्तु वाटायच्या आहेत तिथे किती गोंधळ होऊ शकत असेल याच्या झलक्या इथे मुंबईतही खुप पाहिल्यात. ज्यांच्याकडे सगळे असु शकते, विकत घेता येऊ शकते ते सुखवस्तु लोकही वस्तु फुकट मिळतेय म्हटल्यावर चेंगराचेंगरी करतात, मग भले ती वस्तु १ रुपयाची का होईना. मग जिथे पुरामुळे किंवा अन्य काही कारणाने सगळे उध्वस्त झालेय तिथे लोक कसे वागत असतील?

कुठेतरी वाईट वाटते या परिस्थितीबद्दल. आपण नीट रांगेत राहुन अशा वस्तु नाही का घेऊ शकत? ज्यांना जास्त गरज आहे त्यांना आधी का नाही घेऊ देत?

खरच हे मदतकार्याच काम अवघड आहे
स्थानिक लोकांकडून असे विचित्र अनुभव येत असूनही तुम्ही लोकांनी तुमच काम नेटाने केलत

प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! Happy

@ साधना जी, हो; आपण म्हणता आहात ते अगदी खरं आहे. लोकांच्या स्वार्थी स्वभावाचा खूप अनुभव येतो. परिस्थिती खूप वेगळी असते. पण अशा वेळेस लोकांच्या माणुसकीचाही थोडा तरी अनुभव नक्की येतो. मदतकार्यामधल्या असंख्य गुंतागुंतीमध्येही माणुसकीचे चेहरे नक्की दिसतात. पुढच्या भागात असा अनुभव शेअर करत आहे. पुनश्च धन्यवाद.

खरच हे मदतकार्याच काम अवघड आहे
स्थानिक लोकांकडून असे विचित्र अनुभव येत असूनही तुम्ही लोकांनी तुमच काम नेटाने केलंत >>>>> +१००००