----------- कहाणी,... -----------
त्याच्या थेंब-थेंब बरसण्याने
ती सतत-सतत खुश झाली
पण जेव्हा-जेव्हा तो दुर गेला
ती तेव्हा-तेव्हा बुश झाली
ओलिचिंब भिजायची तेव्हा
ती सुगंध सोडत फुगायची
अवती-भवती तीच्या सारी
ही सृष्टी सदैव फुलायची
पण का कुणास ठाऊक
त्यांचा ब्रेक-अप झाला होता
तीला त्याची आस होती
पण त्याने दगा दिला होता
ती प्रतिक्षा त्याची करत होती
हा विरह मात्र ना सरत होता
तो मात्र दुरून-दुरूनच पाहत
तीच्या अवती-भवती फिरत होता
एकमेकांची गरज असताना जणू
त्यांची नैसर्गिकता संपली होती
त्यांच्या या ब्रेक-अप प्रकरणानं
हि सृष्टीही सारी कंपली होती
दोघांच्या मनी प्रेम असतानाही
का त्यांच्यात अशी तटस्थी झाली
त्यांच्या या ब्रेक-अप प्रकरणात
आम्ही मग कृत्रिम मध्यस्थी केली
आता तो ढगांतुन बरसला होता
ती ही पुरती आनंदी झाली होती
पहा पाऊस आणि धरतीची ही
अशी कहाणी घडली होती,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
सदरील कविता आवडल्यास जरूर शेअर करावी,परंतु कविते खालुन नाव काढू नये,...