Submitted by मॅगी on 4 August, 2015 - 10:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो गूळ
५-६ टीस्पू मोहरी
२-३ टीस्पू मेथी दाणे
१०-१२ काळी मिरी दाणे
१ छोटा तुकडा दालचिनी
१ टेस्पू तेल
४ टीस्पू लाल तिखट
१ टीस्पू हळद
१ कप लिंबाचा रस
क्रमवार पाककृती:
१. पाव किलो गूळ थोडयाश्या पाण्यात विरघळवून थोडं घट्ट सिरप करा.
२. मोहरी आणि मेथी दाणे थोडे भाजून त्यात दालचिनी, मिरी दाणे घालून अग्गदी बारीक पावडर करा.
३. एका लहान कढईत तेल गरम करुन त्यात हळद आणि तिखट घाला, लगेच गॅस बंद करा (जळू नये म्हणून)
४. एका पातेल्यात लिंबाचा रस घेउन त्यात गुळाचं सिरप नीट ढवळून मग मसाला पावडर आणि फोडणी दोन्ही हळूहळू मिसळा.
५. एक छोटी बाटली रसलिंबू तयार होईल, ते कोरडया बाटलीत भरून एक आठवडा मुरु दया.
मग काय खायला सुरूवात पोळीबरोबर किंवा बोटं चाटून.. :p
वि. सू. आईची रेसिपी आहे आणि फक्त खायचा अनुभव आहे.
बात कुछ बन ही गयी!!
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टीना, कोपरापासून नमस्कार.काय
टीना, कोपरापासून नमस्कार.काय तो उरक आणि उत्साह! अशीच रहा.
टीना, कमाल आहे बाई तुझ्या
टीना, कमाल आहे बाई तुझ्या उरक्याची आणि उत्साहाची.
सही दिसतय़
टीना, फोटो मस्त!!
टीना, फोटो मस्त!!
सर्वांचे आभार.. आणि आत्मधून ,
सर्वांचे आभार..
आणि आत्मधून , तुझे विशेष आभार
आभार कसले, तूच एवढे प्रयत्न
आभार कसले, तूच एवढे प्रयत्न घेऊन तयार केलंस गं..
तोपसु.
तोपसु.
हा माझा झब्बु, खास नाही आलाय
हा माझा झब्बु, खास नाही आलाय पण रेसीपी टेस्टी असणार..

सेम पिंच सायली मस्त दिसत
सेम पिंच सायली
मस्त दिसत आहे.. मला आणखी जरा गुळ टाकावा लागणारे..डायरेक्ट टाकु कि गुळवणी करुन टाकु ?
गुळवणी करुन टाक, कंसीस्टंसी
गुळवणी करुन टाक, कंसीस्टंसी साठी..
माझी छान आलीये, मधा सारखी..:)
टीना, मला वाटतं गूळ हातानी
टीना, मला वाटतं गूळ हातानी कुस्करून टाक, मेल्ट होइल सहज. अजून पाणी घातलं तर जास्त पातळ होईल..
सायली, मस्तं दिसतोय फोटो, आता मलापण केलंच पाहिजे रसलिंबू :p
हं .. पातळ नै झालय गड्यांनो
हं .. पातळ नै झालय गड्यांनो गुळ कमी झाला म्हणतेय मी फक्त
आयला.. बाटली लय आवडली आत्मा
आयला..

बाटली लय आवडली आत्मा
कसलीए नेमकी ? बाटली ?
चला पाकृ ओनर च्या जवळपास (पदार्थाच्या रंगरुपाला म्हणतेय) झाली म्हणायची मेरीबी डीश / बाटली
मस्त.. आले का
मस्त.. आले का फोटो..
रंगरुपाला पदार्थ काही चिकणा नाहीये,
म्हणजेच चव भन्नाट असणार.. लाळ काढणारी
आत्मा मत कहो ना!! अमानवीय
आत्मा मत कहो ना!! अमानवीय धाग्यावरून नाही आले मी
तीला झाकण नसल्याने लाकडी बुच लावलंय.. शेप आवडतो म्हणून रीयूज..
बाटली अमूल कूल ची आहे
ऋन्मेष, करेक्टे.. लुक बोअर आहे पण चव बरीच चांगली आहे..
Pages