भावपूर्ण श्रद्धांजली………..
डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम गेले. सारा देश हळहळला. नवीन नवीन बाजू मांडल्या. एक दोन दिवसांसाठी व्होट्स अप वरचे, फेसबुक वरचे प्रोफाइल फोटोस बदलले. मिसाइल म्यानला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. मुसलमानांवर आम्ही प्रेम करतो खर तर हिंदू मुसलमान किंवा इतर कुठलाच जातीय भेदभाव नाही असा उदो उदो करण्यात आला... काही महाभाग तर लगेच एका बाजूला कलाम तर एका बाजूला याकुब असा काही तारतम्य नसलेला फोटो फिरवायला लागले. एकंदर बाजारीकरण, जाहिरातीकरण भरपूर झाल. न्युज च्यानेल, वर्तमानपत्र सगळ्यांना काही दिवस ताज्या बातम्या झळकावता आल्या. देशप्रेमी खरतर विश्वप्रेमी मागे पडला आणि एक देशद्रोही गाजू लागला.
खर तर कलाम यांच्या मृत्यनंतर आम्ही त्यांच कार्य आमच्या पर्सनल अकौंट वरील पोस्ट मधून खूप पसरवलं. कधी कधी मेसेज वाचण्याआधी शेअर केले... पण त्यानंतर झालेल्या घडामोडींमधून मात्र आमच खोट प्रेम दाखवण्याच नाटक संपल ... आमच म्हणजे व्यावसायिकांपासून ते अगदी माझ्या सारख्या साध्या व्यक्तिपर्यन्तच. अहो कलाम यांच्या मृत्युनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता हो... २७ जुलै २०१५ पासून २ ऑगस्ट २०१५ पर्यंत. पण ते सगळ दुखवटा वगैरे विसरून आम्ही आमचा झाकलेला मुखवटा काल काढून फेकून दिला हो... निम्मित्त होत ... फ्रेन्डशिप डेचं... न विसरता अगदी ADVANCE म्हणून आम्ही शनिवारी रात्रीपासूनच सगळ्यांना शुभेच्छा देत होतो. अगदी सेलिब्रेशन ला उधाण आल होत.
एक अद्भुत व्यक्तिमत्त्व गेल, एक युग संपल्यासारख वाटल. (हे सगळ बातम्यांमधून कळाल) पण आमच आयुष्य, आमच सेलिब्रेशन ते थांबवण किंबहुना एक दिवस तरी पुढे ढकलण आम्हाला नाही सुचल. त्याची गरज भासली नाही किंवा निकड जाणवली नाही. राष्ट्राने ध्वज अर्ध्यावर आणून मानवंदना दिली आम्हीही श्रद्धांजली वाहिली. अजून काय करणार सामान्य माणूस.
आम्ही सामान्य जनता. आमच्या एकट्याने निषेध करून किंवा गप्प बसून काय होणार ... ? तेव्हा नेहमी प्रमाणेच आम्ही वाहत्या पाण्याबरोबर वाहत राहिलो. चालायचंच. स्वतःच्या वागण्यावर पांघरूण घालायला आम्ही चांगलेच शिकलो आहोत आणि पुढेही शिकतच राहू. एक मात्र ध्यानात नक्कीच ठेवाव, बर्याचदा काही गोष्टी फक्त बडबडीतून दिसण्यापेक्षा कृतीतून घडून यायला हव्यात.
असो... माझ्याकडूनही तुम्हा सार्यांना ... Belated हैप्पी फ्रेन्डशिप डे.
(या लेखावर टीका करणारा किंवा हळहळ व्यक्त करणारा असा दोन्ही बाजुन्ही आपापली मत व्यक्त करणारा गट असेलच. पण मी फक्त माझ मत मांडल. त्याच समर्थन व्हायलाच हव अशी अपेक्षा बिलकुल नाही. पटल तरी ठीक नाही पटल तरी ठीक. कारण या देशात व्यक्तीस्वातंत्र्य हा प्रकार अस्तित्वात आहे आणि त्याचा फायदा आपण सगळेच घेतो... नेहमीच. )
मयुरी चवाथे - शिंदे.
एक मरे दुजा त्याचा शोक
एक मरे दुजा त्याचा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
आपल्या लेखाशी सहमत, एक सच्चा शिक्षक हरपला :(.
आम्ही whats App चे फोटो बदलले, आमच स्टेटस बदललं, आलेले msgs पुढे ढकलले (वाचता /न वाचता )इतकं केलं कि. फार तर फार एक दोन पुस्तकही वाचू.
पुढच्या वर्षी परत ह्या सगळ्यांचा पूर येईल(च).
यालाच दुनियादारी म्हणावे का?
यालाच दुनियादारी म्हणावे का?
कलाम यांची मालमत्ता:पुस्तके व
कलाम यांची मालमत्ता:पुस्तके व 64 कोटी तरुण!
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5395352495522731993&Se...!
प्रवाहाबरोबर वाहात जायचे.
प्रवाहाबरोबर वाहात जायचे.
टिका कश्याला? उलट हेच लिखाण
टिका कश्याला? उलट हेच लिखाण थोडे शॉर्ट अन सुटसुटीत करून व्हॉटसपवर टाका. मग ती पोस्ट सुद्धा त्याच लोकांकडून तितक्याच भक्तीभावाने फॉर्वर्ड होईल
@ राष्ट्रीय दुखवटा आणि फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन,
मला कल्पना नाही म्हणून विचारतोय, राष्ट्रीय दुखवटा काळात सामान्यजणांनी काय करावे आणि काय करू नये असे अपेक्षित असते. उदाहरणार्थ या काळात गणपती वा दिवाळी असे मोठे सणा असते तर ते देखील साजरे करताना काही लागू झाले असते का?
मुळात काय करायचं आणि काय करू
मुळात काय करायचं आणि काय करू नये... अशा काही अटीच नसाव्यात असतील तरी कोणी पाळत नसाव.. मलाही कल्पना नाही... पण सण आणि कुठल्यातरी "डे" च सेलिब्रेशन यात फरक आहे. मुळात तुलनाच नाही.
मी लिहील ते फक्त खोटा प्रचार करणार्यांसाठी ... वैयक्तिक अस काहीच नाही... फक्त माझ मत मांडल