ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो
व
जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....
त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना......
ऋणानुबंधाच्या
मुसळधार पावसासारख्या
ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!!
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना समर्पित कविता
चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ
नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर
अटी-शर्ती काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग
दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर
देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही
मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ
चिंता नकोस करू मित्रा
'अभय'तेने तेव
वादळासंगे लढेन मी
इतका विश्वास ठेव
गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मस्त. मैत्रीदिनाच्या शुभेच्छा
मस्त.
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा
धन्यवाद खडीसाखर
धन्यवाद खडीसाखर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैत्रीदिनाच्या हार्दिक
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
सुंदर!!
विभाग्रज तुम्हासही शुभेच्छा!
विभाग्रज
तुम्हासही शुभेच्छा!
मैत्रीदिनाच्या हार्दिक
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!