पुणे ए.वे.ए.ठी.... नाही नाही जीटीजी वृत्तांत.. :)
मायबोली वरच्या सिध्दहस्त लेखिका आणि एक ज्ये. आणि जा. व्यक्तिमत्त्व शोनू ह्यांचं पुण्यनगरीत आगनम होणार होतं आणि त्यानिमित्ताने gtg होणार असं ऐकलं होतं.. पण शोनू येऊन परत जायची वेळ आली तरी काही हालचाल दिसेना...मग अचानक एकदा चिनुक्स ने gtg ची दवंडी गडावर आणि वाड्यावर पिटली...
चिनूक्स आणि शोनू एकमेकांच्या संपर्कात होते आणि चिनूक्स इतरांना अपडेट्स देत होता... संध्याकाळी ६:३० ची वेळ ठरलेली होती आणि १२:३० ला हाती आलेल्या वृत्तानुसार शोनू मुंबईतच होती... त्यामूळे gtg चं कसं होणार असी भयंकर काळजी वैनींना (आयडी नससेल्या) लागली होती...
(नेहमीप्रमाणेच) प्रमुख आयोजक म्हणजे चिनूक्स आणि प्रमुख पाहूणे शोनू हे उशिरा पोचले आणि बाकीचेच उत्साही लोकं तिथे अगोदर जाऊन बसलेले.. शोनू चा एक पार जुना फोटो फक्त लोकांनी पाहिला होता.. त्यामूळे तिला ओळखायचं कसं? हा प्रश्ण उपस्थित उत्साहींना पडला होता... (तो पाहिलेला फोटो शोनू चा तरूणपणीचा होता हे नंतर समजले.. )
शोनू तिथे आधि पोचल्यावर ..मयुरेश, अरूण, आरभाट आणि श्री. आणि सौ. दिपुर्झा तिथे असल्याने ४ पुरुष आणि एक बाई असा ग्रुप ज्या टेबलवर बसलेला असेल तिथे जाऊन "तुम्ही मायबोलीकर का?" असं विचार असा practicle सल्ला चिनूक्स ने शोनूला देऊन टाकला....त्यात पूनम ही तिथे पोचली नव्हती त्यामूळे आवाजाचा माग कढत माबोकरांना शोधणं ही शक्य नव्हतं.. शोनू ने चिनूक्स चा सल्ला तंतोतंत पाळून मायबोलीकरांन्ना शोधून काढलचं आणि "भरत भेट" झाली...
ह्यानंतर पूनम, नचिकेत, साजिरा, चिनूक्स आणि नंतर मी अश्या सगळ्यांचं आगमन झालं...
वाहिनींच्या टोमण्यांमधून बिचारा नचिकेतही सुटत नव्हता हो.. !!
नंतर ओळखीपाळखीचा कार्यक्रम झाला...
त्याच वेळी साजिरा नी चिनूक्स च्या नावचा उच्चार नक्की कसा करायचा ह्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातला.. बरीच चर्चा होऊन शेवटी चिनूक्स मधला "क्स" सायलेंट आहे हे सर्वानुमते मान्य झालं.. तेव्हा पासून साजिरा आणि इतर मंडळी चिनूक्स हे चिनू(क्स), चिनू-क्स, चिनू क्स किंवा अगदी स्पष्ट पणे चिनूक्स (क्स सायलेंट) असं लिहायला लागले... ज्यांना माहित नव्हतं त्यांच्या साठी साजिर्याने ह्या मागची पार्श्वभूमी आणि घटना "कोण बरे रोमातून.. हळूच पाही डोकावून" ह्या ओळींच्या अधारे समजावून सांगितली...
ही चर्चा संपता एका मायबोलीकरणीने एकदम आवेशात एंट्री मारली... तिचा एकंदर आवेश बघून कोणीही तिला ह्या आधी पाहिलेलं नसूनही सगळ्यांनी ती आशू_डी आहे हे लगेच ओळखलं.. आशू येऊन स्थिरस्थावर होतं असतानाच वेटर चं आमच्या टोळक्याकडे लक्ष गेलं.. तितक्यात पूनम ने नचिकेत ला "तू मोसंबी ज्यूस पिणारेस ना??????????" असं तिच्या खर्ड्या आवाजात विचारलं.. ते बहूधा किचन पर्यंत ऐकू गेलं असणार... त्यामूळेच तो वेटर आमच्याकडे येता येता अर्ध्या रस्त्यातून परत गेला आणि एका मिनीटाच्या आत ज्सूस घेऊन परत आला.. (ह्याला म्हणतात दरारा)
तितक्यात आरभटाने गुलाबज्याम चा बॉक्स काढला.. त्याचं कारण त्याला काकू विरहीत बीबी आणि स्वतःची बीबी दोन्ही मिळालं असं होतं हे नंतर कळलं.. ! अर्थात तो काकू विरहीत बीबी नक्की कोणता हे त्याने अजूनही आम्हाला सांगितलेलं नाही.. !!! तो गुलाबज्याम चा बॉक्स फिरून फिरून सारखा माझ्या समोर येत होता.. !! आणि आरभाट च्या विनंतीला मान देऊन मी प्रत्येक वेळी एक एक गुलाबज्याम फस्त करत होतो.. त्या जिटीजी नंतर माझं वजन किमान २ किलो ने तरी वाढलं असणार..
पण गुलाबजाम मात्र बेस्ट होते !!!!
नंतर केपीकाकांनी एंट्री मारली... मागे आशू, केपी समजून दुसर्याच कोणाला तरी भेटली होती... त्यामूळे खर्या केपी ला बघून आशूने "कोण आहे मग तो तोतया केपी ज्याला मी मागच्या वेळी भेटले होते???????" अशी आवेशपूर्ण गर्जना केली आणि सगळ्यांचे चेहेरे तपासायला सुरूवात केली.... सुदैवाने तो तोतया केपी तिथे हजर नव्हता.. नाहितर बिचारा आशूच्या आवेशात होरपळून गेला असता..
दरम्यान खाणं आलं.. मी आणि पूनम नी मागवेलेलं पसरट्टं की काहितरी फारस पसरट नव्हतं आणि खूप तिखट पण होतं... त्यामूळे आमचा जरा अपेक्षाभंगच झाला... खाताना शोनू, केपी, मयूरेश आणि अरूण मुंबई पुण्याच्या शाळा कॉलेज... कोण मुळचं कुठलं अश्या (बोर) विषयांवर गप्पा मारत होते.. तर पूनम आशूला काहितरी फंडे देत होती... किती कप चहा आणि किती कप कॉफी हे भयंकर गोंधळं होऊन शेवटी एकदाचं ठरलं.. ह्या कामात मयुरेश चा कार्याध्यक्ष पदाचा अनुभव विषेश कामी आला..
वेळं अगदी संध्याकाळची होती.. त्यामूळे हॉटेल मधे गर्दी फार होती.. आणि तितक्यात कोणीतरी फार गुदमरतय.. नीट श्वास नीट घेता येत नाहिये... असं काहिसं बोललं.. ह्यावर साजिर्याने* "इथल्या श्वासाचं काय घेऊन बसलात??? हल्ली मायबोलीवर ही गड, वाडा, पार्ले आश्या 'प्रतिष्ठीत' आणि 'प्रस्थापीत' बीबीं वर लोकांना मोकळा श्वास घेता येत नाही" असे कहिसे म्हणत एका ज्वलंत समस्येला हात घातला... !! त्यावर मी "ज्यांना मोकळे श्वास घेता येत नाही ते CT सारख्या बीबीं वर का जात नाहित?? असे बीबी generally मोकळेच असतात.." असे म्हणतं फाको करायचा प्रयत्न केला.. पण सगळ्यांनी त्या फाकोचा सपशेल अनुल्लेख करत चर्चा तशीच पुढे चालू ठेवली... अखेर उपस्थितांच्या डोक्यात आलेले कोणतेच उपाय मोकळ्या श्वासासाठी उपयोगी पडणार नाहित हे लक्षात आल्यावर ही चर्चा अर्धवटच राहिली...
मी आणलेली चॉकलेट इतका वेळ द्यायची राहूनच गेली होती.. ती काढताच शोनूच्या लक्षात आलं की ती चॉकलेट आणायला विसरलीये.. पण मी आणलेली चॉकलेट ही आमच्याच देशातून, आमच्याच किनार्यातून, आमच्याच पार्ले बीबी वरून आले आहेत.. असे बरेच कॉमन फॅक्टर शोधून तिने त्याच चॉकलेटांना "मम" म्हणून घेतलं.. आणि सगळ्यांना आग्रह पण केला..
पूनम ने शोनूला तिच्या गणेशोत्सवातल्या गोष्टी खूप छान होत्या असं सांगताच तीने अगदी politely "छे छे त्या तर फक्त 'पाडलेल्या' गोष्टी होत्या" असं सांगितलं.. मग पुढे गोष्टी सोडून अजून कोणते साहित्यप्रकार "पाडता" येतील ह्यावर रंजक चर्चा झाली... पण मग "जेणू काम तेणू.... " का काय ते म्हणतात त्याप्रमाणे ती पाडापाडी पाडणार्या पाडसांवरच सोडून देण्यात आली... कथांचा विषय निघाला आणि शोनू अगदी समोरच होती.. त्यामूळे मी लगेच संधी साधून शोनूला एका वर्षाची कथा पूर्ण करा अशी आठवण माझ्यातर्फे आणि रूनी आणि सिंडी तर्फे करून घेतली... बघू आता शोनू ही कथा कधी पूर्ण करत्ये...
पार्ल्यातलं "काकूपणा" ला जागून शोनू ने पैठण्यांचा विषय काढला.. पण तो शिताफीने बदलण्यात आम्हला यश मिळालं.....
नंतर नचिकेत कंटाळल्यामुळे पूनम ने निघायची तयारी चालू झाली.. हळूहळू सगळेच निघाले.. मी, चिनू(क्स), शोनू, आरभाट आणि शोनूची बहिण असे सगळे नंतर बराच वेळ गप्पा मारत उभे होतो...
अशा रीतीने पूण्याच्या जिटीजीच्या साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण..
त.टी.
१. वरचा सगळ्या वृत्तांतातल्या घटना खर्या असल्या तरी तपशील मजेत लिहीला आहे.. तेव्हा उल्लेख झालेल्या आणि न झालेल्या सगळ्या मायबोलीकरांनी दिवे घ्यावे... ज्यांचा उल्लेख इथे झालेला नाही, त्यांचा उल्लेख प्रत्यक्ष जिटीजी झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण प्राप्त परीस्थित सग़ळे details इथे देणं शक्य नाही...
२. ह्या जीटीजी मधे चिनूक्स ने हेमलकसा आणि सुपंथ ह्याबद्दल पण माहिती आणि कशाप्रकारे मदत करता येईल हे ही सांगितले पण ते त्याने वेगवेगळ्या बीबींवर आगोदर लिहिल्याने ह्यात परत लिहिलं नाहिये. आधिक माहिती साठी त्याच्याशी तसेच सुपंथ च्या मेंबर्स शी संपर्क साधू शकता...
३. सर्व प्रश्णचिन्हे अरूण कडून साभार..
मस्तच
मस्तच "पाडला" आहेस वृतांत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
CT सारख्या बीबीं वर का जात नाहित?? असे बीबी generally मोकळेच असतात >>> आता ये तर खरी तु आमच्या बाफवर पोस्टायला
बाकी, आजच्या दिवशी तरी तुमच्या पेक्षा जास्तच पोष्टी आहेत हो ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शोनुने गोष्ट पूर्ण केली की तिला हार/तुरे/खण/नारळ/टॉवेल/टोपी द्यायचे आहे ते (माझ्या आणि रुनीतर्फे) तु देशीलच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे
मस्त आहे वृत्तांत
जीटीजेचे फोटो वगैरे हल्ली कुणीच टाकत नाही. त्याशिवाय जीटीजीचे चित्र डोळ्यासमोर येत नाही ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ब्येस!! CT
ब्येस!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो की नै सिंडे?
CT सारख्या बीबीं वर का जात नाहित?? असे बीबी generally मोकळेच असतात >> हो, निखळ मोकळ्या मनाने (अन श्वासाने) घरगुती गप्पा चालतात. अन आमच्या CT बीबीवर गटबाजी पण चालत नाही
नै तर काय
नै तर काय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान
छान लिहिलंय रे अडमा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'चिनू(क्स)' कथेवरून पुपु बाफवरील पोस्टं आठवली...
अगदी अगदी
अगदी अगदी सिंडी आणि पन्ना..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
धन्यावाद बी आणि सँटीनो...
ऍडमा : छान
ऍडमा : छान लिहिला आहेस रे वृतांत. एकदम मोजक्या शब्दात .........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्याकडची प्रश्नचिन्ह अजून थोडे दिवस तुझ्याकडेच ठेवून घे. पुर्व किनार्यावरचं एक दिग्गज व्यक्तिमत्व थोड्याच दिवसात पुण्यात येत आहे, त्यांना भेटल्यावर परत एकदा वृतांत लिहिताना, उपयोगी पडतील ..........
या जीटीजी ला मी काही फोटो काढले होते. सगळ्यांची (म्हणजे जीटीजी ला उपस्थित असणार्यांची) परवानगी असेल, तर ते मी इथे टाकू शकेन.
~~~~~~~~~~~~~~
शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक, घडू नये ते घडले
मस्तच रे
मस्तच रे अडमा! अगदी तेव्हाची सगळी मजा आठवली.
का ही ही! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुदैवाने तो तोतया केपी तिथे हजर नव्हता.. नाहितर बिचारा आशूच्या आवेशात होरपळून गेला असता..
>>
अ.आ. टाका की १-२ फोटो! बिनधास्त.. म्हणजे पुढच्या वेळेला एकमेकांना चेहर्यावरून पण ओळखता येईल.
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
आदमा, मस्त
आदमा, मस्त लिहिलायंस वृ! तपशील बरेच ठिकाणी चुकलेत, पण ते जाऊदे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एक महत्त्वाचं नाहीच सांगितलंस- मी शोनूला तीनदा हाक मारूनही तिला ऐकायला गेले नाही! - आणि याला साक्षीदार आहेत!! यावरूनच माझा आवाज किती मोठा आहे हे समजले असेल
या जीटीजी ला मी काही फोटो काढले होते>>>>
अ आ, किती खोटं बोलता हो उतारवयात?????????????? तुम्ही कधी काढले हो फोटो????????
------------------------------------------
A good listener is not only popular everywhere, but after a while he knows something.
यावरूनच
यावरूनच माझा आवाज किती मोठा आहे हे समजले असेल >>> छे छे.. तो शोनूच्या ऐकण्याचा प्रॉब्लेम होता..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तुझ्या आवाजासाठी वेटरचा किस्सा पुरेसा आहे की..
आडमा, मी
आडमा, मी सर्वांत आधी हजर होतो तिथे, सांगून ठेवतो.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझा आवाज लहान आहे, म्हणून लक्षात आले नसेल, त्याला मी काय करू? नंतर जे मोठ्या आवाजात आरडाओरडा करीत, आजूबाजूच्यांना घाबरवीत आले त्यांच्यासोबत मी नव्हतो हां!
नंतर, दहशत बसून मी अन अरभाटानं कुजबूजत्या आवाजात बर्याच गप्पा मारल्या, पण त्या कुठे टाकाव्यात कळत नाही..
--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!
कुजबूजत्य
कुजबूजत्या आवाजात बर्याच गप्पा मारल्या, पण त्या कुठे टाकाव्यात कळत नाही.. >>>> त्याचा ड्राफ्ट हह ला पाठवून दे.. म्हणजे ती त्यावर कुजबूज लिहिल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
***
The Truth Shall Make Ye Fret. - The Truth, Terry Pratchett
वा वा.. एकदम
वा वा.. एकदम भारी वृ...
मी उगाचच मिस केला जीटीजी...
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो
तो
तो शोनूच्या ऐकण्याचा प्रॉब्लेम होता >>>>> अनुमोदक रे ऍडमा ...........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही कधी काढले हो फोटो???????? >>>>> वैनी : माझीच प्रश्नचिन्ह वापरून मलाच प्रश्न ?????????![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~~~~~~
शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक, घडू नये ते घडले
खाताना
खाताना शोनू, केपी, मयूरेश आणि अरूण मुंबई पुण्याच्या शाळा कॉलेज... कोण मुळचं कुठलं अश्या (बोर) विषयांवर गप्पा मारत होते... >>>> अरे आदमा,मी आणि केपी फक्त मुक साक्षीदार होतो रे.... :(.... बोलत फक्त शोनू आणि अ.आ होते एकमेकांशी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाकी वृत्तांत एकदम फक्कड...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बोलत फक्त
बोलत फक्त शोनू आणि अ.आ होते एकमेकांशी >>>>
हो, हो! अगदी बरोब्बर. अन अ.आ. तर आवरतच नव्हते. चौफेर फटकेबाजी चालली होती अगदी. म्हणजे पंचवीसेक जीटीजीमध्ये सगळ्यांमिळून जेवढं बोलणं होत असेल, तेवढं ते एकटेच बोलले त्यादिवशी!
अक्षरशः पूनम पण अवाक झाली, इतकं बोलणं ऐकून घ्यायला लागल्यामूळे..! काय सांगावे आता!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!
अन त्यात
अन त्यात पुन्हा माझ्या बहिणी ने स्केटिंग चा बादरायण संबंध जोडलाच की अ आंशी बोलताना. तिला कुठे म्हणजे कुठ्ठे न्यायची सोय नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्स सायलंट बद्दलची चर्चा मी मिस केली.
मिल्याचा फोन आला होता.. काहीतरी तेव्हडीच माझी थोडावेळ सुटका अशा अर्थाचं बोलला तो.:फिदी:
अ आंचा कॅमेरा होता येवढं नक्की . फोटो टाकायला माझी हरकत नाही, नाहितरी अडमा ने सुरवातीलाच ज्ये म्हणून टाकलाय अन शिवाय ऑरकूट वरचा फोटो 'पार' जुना म्हटलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॄ मस्तच पण.
ए.वे.ए.ठिचं
ए.वे.ए.ठिचं ठिकाण आणि वेळ ठरल्यावर शोनूला कळवायला मी विसरलो होतो. त्या दिवशी दुपारी मला आठवलं आणि मग मी तिला फोन करून सांगितलं.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
चांगला
चांगला वृत्तांत्.च्यायला मी पुण्यात आल्यावर असे गेटु का भरवत नाही??
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
चिन्या, तू
चिन्या,
तू पुण्यात आला आहेस के कळलं तर काही ठरवता येईल.. डिसेंबरात आलास तेव्हा तू कळवलं नाहीस..
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
अडमा
अडमा वृत्तांत मस्त.
ए.वे.ए.ठिचं ठिकाण आणि वेळ ठरल्यावर शोनूला कळवायला मी विसरलो होतो. त्या दिवशी दुपारी मला आठवलं आणि मग मी तिला फोन करून सांगितलं. >>>> चिनूक्स हे सगळ्यात भारी.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
डिसेंबरात
डिसेंबरात आलास तेव्हा तू कळवलं नाहीस
हम्म्म्........मुद्दा बरोबर आहे
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
फोटू
फोटू टाकायची अनुमती मिळाली आहे तेंव्हा फोटो पण टाका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अ आ,
अ आ, फोटोखाली योग्य ते क्रेडीट द्या, काय?
फोटो २-३ दिवस ठेवून मग काढून टाकावेत अशी माझी उपसूचना.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळ्यांचं अनुमोदन असेलच
------------------------------------------
मर जावां... तेरे इश्कमें मर जावां...
अदमा : मस्त
अदमा : मस्त वृ.. मी मिस केला जीटीजी...
शोनू : बाकीचे बोललेले सोडून तुला तो सुटका शब्द तेवढा बरोबर लक्षात राहिला ना?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोन करायची सुद्धा चोरी आता
एक अनाहूत सुचना... हे खुले संकेतस्थळ असल्याने इकडे छायाचित्रे टाकू नका... मेल वर पाठवा एकमेकांना
================
मी असा ठिपक्यात होतो विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता
वृत्तांत
वृत्तांत भारी हं ऍड्मा. माझ्या सारख्या जीटीजी मिसलेल्या लोकांना झलक तरी दिसली. अ.आ. फोटो येऊ द्यात आता..
मिल्यादा
मिल्यादा अनुमोदन.
वेटरचा किस्सा... ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाकी लिहिलय छानच
अरे वा!!
अरे वा!! फक्कड वृत्तांत अगदी....
वाड्यावर झालेल्या चर्चेप्रमाणे तुम्ही लोक शोनू आल्यावर 'पालेभाज्या फेस्टीवल' करणार होतात, त्याचे काय झाले??
बाकी शोनू, तू मुंबईत आली आहेस हे कळवलं असतंस तर आम्ही मुंबईकर वेळात वेळ काढून तुला भेटलो असतो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ए, हो.. फोटो
ए, हो.. फोटो नका टाकू.
तू मुंबईत आली आहेस हे कळवलं असतंस तर आम्ही मुंबईकर वेळात वेळ काढून तुला भेटलो असतो..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>> कळाला ना मुंबईकर आणि पुणेकरांमधला फरक?
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है
Pages