सुप्रीम कोर्टानेही ABC या बलात्काराच्या आरोपीला याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री , भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.
१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी.
2. या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.
३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून कोर्टात आला होता . आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. साथीदारा ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने साथीदार बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.
४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले XYZ ,ABC आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. . अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.
५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.
७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी एक्सवायझेड ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा.
* हा धागा रूढार्थाने विडम्बन म्हणून नाही ,
तरीही प्रेरणा -http://www.maayboli.com/node/54741
उडन खटोला, विकुंचा धागा आला
उडन खटोला,
विकुंचा धागा आला तेव्हाच मलाही असेच वाटले होते. की बलात्कारासंदर्भात फाशीबाबतची मते काय असतील, काय असावीत वगैरे! मग प्रश्न पडला की नेमकी कशी तुलना करावी दोन आरोपांची? एक आहे देशावरील हल्ला आणि दुसरा व्यक्तीगत असला तरी तितकाच भीषण!
मी तुलना फक्त शिक्षेचीच करू शकलो. दोन्ही गुन्ह्यांसाठी एकच शिक्षा असावी असा निष्कर्ष काढू शकलो होतो.
इथे खरोखरच चर्चा व्हावी असे वाटत आहे, फाशी केव्हा अपरिहार्य मानली जाते ह्याचे जे काही निकष असतील त्यांच्यातील काही निकष देशावरील हल्ला आणि व्यक्तीवरील बलात्कार ह्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये समान निघतील अशी अपेक्षा आहे. आणि नाही निघाले तर असे चर्चेचा निष्कर्ष निदान असा तरी असावा की दोन्ही गुन्ह्यांसाठीच्या शिक्षेचे निकष समान अजिबात नाहीत, पण तरीसुद्धा शिक्षा समानच असावी.
ज्या मुलीवर स्त्रीवर बलात्कार
ज्या मुलीवर स्त्रीवर बलात्कार झाला असेल तिणे व तिच्या घरच्यांने बलत्कार्यास माफ केले करुशकले
तर त्याला माफ करुन सुधारण्याची संधी द्यावी. नाही तर सरळ फाशी.
माफी नाही शिक्षाच मिळाली
माफी नाही शिक्षाच मिळाली पाहिजे
कारण मुलीने माफ़ी दिल्यावर सुटका होणार असेल तर माफी मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातील गुन्हेगार
माफ़ी देण्यासाठी मुलीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला जाऊ शकतो
त्यामुळे माफी बीफी काही नाही शिक्षाच झाली पाहिजे गुन्हेगारांना
बेफी नामक आयडी एके ठिकाणी
बेफी नामक आयडी एके ठिकाणी विडंबन धागा चुकीचा कसा हे ओरडून सांगत होता
इथे मात्र प्रोत्साहन देतोय
आनंद जाहला
विनंती आहे की कृपया दिशाभूल
विनंती आहे की कृपया दिशाभूल केली जाऊ नये. विडंबनांना इतिहास आहे. उख ह्यांनी लिंक वगैरे दिलेली दिसली नाही. स्वतंत्रपणे चर्चा नक्की होऊ शकते. चर्चा बिघडू नये ह्याची काळजी कृपया सर्वांनी घ्यावी.
विडंबनाच आहे एकीकडे भोकाड
विडंबनाच आहे एकीकडे भोकाड पसरून रडणे तर दुसरीकडे पाठींबा देणे हे काहींचे मायबोलीवर धंदे झाले आहे
बेफिकीर्, एक अनाहूत सल्ला -
बेफिकीर्,
एक अनाहूत सल्ला - Ignorance is bliss!!
विडंबनाच आहे एकीकडे भोकाड
विडंबनाच आहे एकीकडे भोकाड पसरून रडणे तर दुसरीकडे पाठींबा देणे हे काहींचे मायबोलीवर धंदे झाले आहे
हे कोणासंदर्भात आहे ?
दिल्लीतील निर्भया बलात्कार
दिल्लीतील निर्भया बलात्कार केस मधल्या आरोपींची, फाशीची तारिख जाहीर झाल्यावर, 'दिल्लीतील निर्भया बलात्कार केस मधले आरोपी कसे निर्दोष आहेत' व त्यांना फासावर चढवु नये यावर "याकुबची फाशी" याप्रमाणे एकादा धागा येईलच तेंव्हा काळजी नसावी.
दिल्लीतील निर्भया बलात्कार
दिल्लीतील निर्भया बलात्कार केस मधल्या आरोपींची, फाशीची तारिख जाहीर झाल्यावर, 'दिल्लीतील निर्भया बलात्कार केस मधले आरोपी कसे निर्दोष आहेत' व त्यांना फासावर चढवु नये यावर "याकुबची फाशी" याप्रमाणे एकादा धागा येईलच तेंव्हा काळजी नसावी.>>>>>
कधी फाशी जाहिर होणार ते पाहुयात आधी. ३ वर्षे होउन गेलीत. बहोत हुआ नारी पे अत्याचार, अबकी बार .... म्हणुनहि १.५ वर्ष झाले.
"तिकडे" तावातावाने भान्डणारे
"तिकडे" तावातावाने भान्डणारे इकडे गप्प का बरें ?
कारण त्यांना हा आजचा बर्निंग
कारण त्यांना हा आजचा बर्निंग टॉपिक वाटत नाही आहे.
न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या
न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेची सरकारकडून वेळेत अमलबजावणी न झाल्याने पुण्यातल्या गहुंजे बलात्कार खून प्रकरणातील गुन्हेगारांची फाशीची शिक्षा रद्द झाली आणि फडणवीस म्हणतात मला राखी पाठवा. कशाला? बलात्कारी खुन्यांना पाठीशी घालायला?
नथुराम ते कसाब , काँग्रेसने
नथुराम ते कसाब , काँग्रेसने मात्र इतक्या फाश्या यशस्वीरीत्या दिल्या