ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई

Submitted by Mandar Katre on 24 July, 2015 - 06:41

http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia

नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि आशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली .

परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !>>>>असूनही का म्हणूनच Wink

@ साती >> Lol

कोहीनुर हीरा खरा आहे का? म्हणजे लहान्पणापासुन ऐकत आलेय की आपला कोहीनुर हीरा राणीकडे आहे म्हणुन.

परराषट्रमंत्री असाताना हे का नाही सुचल?
शाम्पेन पार्टी रंगात आल्यावर अश्या गोश्टी
सूचतात हो !
आपन मनावर घ्यायच नसत.

ब्रिटिशांवर टिका योग्य आहे.मात्र ब्रिटिश राजवटित ज्या सामाजिक सुधारणा आपण करु शकलो त्या पेशवाई किंवा इतर राजांच्या राजवटित करण्याचा विचारही आपण करू शकलो नसतो.

बंगालमधे दुष्काळ पडला असताना ब्रिटिशांनी दुर्लक्ष केले नाही. चर्चिल हा माणूस भारताशी अत्यंत वाईट वागला आहे. त्यावेळी तो पंतप्रधान होता. तो इतका हलकट होता की वॅव्हेल हा एक मोठा भारतातला अधिकारी जो नंतर व्हाईसरॉय झाला त्याने बोट भरून अन्न मिळवले ते चर्चिलच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेकडे वळवले जिथे ना दुष्काळ होता ना दुर्भिक्ष. चर्चिल बाकी कितीही थोर असला तरी भारताकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन अत्यंत तुच्छतेचा, वर्णद्वेष्टा आणि घृणास्पद होता हे आपण विसरू नये. बंगालच्या लोकांना दुष्काळाची सवयच आहे. त्यापेक्षा ग्रीसला वाचवणे महत्त्वाचे आहे असे अत्यंत अश्लाघ्य समर्थन त्याने केले.
१९४३ च्या दुष्काळाकरताच एक मोठी भरपाई व माफीनामा ब्रिटनने देणे आवश्यक आहे. बाकी गोष्टी आणखी वेगळ्या. ढाक्याची मलमल प्रसिद्ध होती तिच्याशी स्पर्धा जमणार नाही म्हणून इंग्रजांनी तिथल्या अनेक कारागिरांचे अंगठे छाटले असेही ऐकले आहे. बंगालवर हा विशेष लोभ का हे अनाकलनीय आहे.

<<आहेतच ते धाडसी!
सुनंदा थरूरचं प्रकरण अजून संपलं नाही तरी मस्तं बिनधास्तं फिरतात.>>

------ अभिनेता सलमान याने दारुच्या धुन्दित (४-५ फुटपाथवर झोपलेल्या) काही लोकान्ना तुडवले... त्यात त्यान्चा अन्त झाला.... अपघातग्रस्ताना वैद्यकीय मदत न देताच आमचा हिरो तेथुन पळुन जातो... तक्रार नोन्दवलेल्या पोलिसावर दबाव आणतो... त्याची नोकरी घालवतो, कालान्तराने त्या तरुण तडफदार पोलिसाचा अन्त होतो :अरेरे:... अनेक अनेक कसरती करत स्वतःची गुन्हेगारी लपवतो, अमाप पैशाच्या जोरावर कायद्याला चकवतो....

बॉलीवुडचे झाडुन सर्व अभिनेते, अभिनेत्री, निर्माते... बाजारबुणगे सलमान दोषी नसल्याबद्दल किव्वा त्याच्या सान्तवनासाठी फुलान्चा बुके घेऊन रान्गेत उभे. जसा काही सिमेवर लढुन आला होता....

सामान्यलोक अशा मनोवृत्तीचा जोरदार निषेध करतात... पण सलमान्चा चित्रपट आल्यावर पहाण्यासाठी रान्गेत पुढे... दोन आठवड्यात चित्रपटाचा ३०० कोटीचा बिझीनेस. आमही त्याचे चित्रपट पहातो कारण चित्रपट त्याचा एकट्याचा नसतो अशी मखलाशी.

तोच न्याय थरुर यान्ना मिळायला हवा... दोषी असतील, आढळल्यास... कायद्याच्या चौकटीत शिक्षा करा.

मला थरुर यान्चे भाषण आवडले...

त्याबद्दल संपूर्ण देशात
थरूरजी
यांचे कौतुक होत असून
ठळक केलेल्या शब्दाची अंमळ गंमतच वाटली बाकी काही नाही,
कोहिनूर किंवा स्यमंतक हिर्या बद्दल बोलायचे झाले तर तो हीरा दळभद्री आहे शब्दशः, त्याचा इतिहास (पौराणिक दृष्टया) हा की तो हिरा कृष्ण भगवानाच्या हाती आला तर त्यांचा अवतार संपला, यादव वंशी लोक प्रभासक्षेत्री डोकी फोडून चचले, द्वारका नगरी समिंदराने गिळंकृत केली , मोगलांकड़े जाता त्यांच्या सगळ्यां डुया चचल्या राज्य उसवले , लेटर मुग़ल तर उपाशी ही राहिले, त्यानंतर फ्रांस मार्गे बहुतेक इंग्लॅण्ड ला गेला अन स्थिरावला कारण तो मणि फ़क्त बाईच्या हाती टिकतो! काय करायची असली पनवती माघारी आणून असू देत तिकडच!!!

(हिर्या बद्दल ऐकिव माहिती, चुभुदेघे)

दुष्काळाकडे दुर्लक्ष केले नाही ह्याचा अर्थ बंगालच्या लोकांच्या हालअपेष्टांची पूर्ण जाणीव असून जाणीवपूर्वक मदत देण्याचे टाळले. निव्वळ अंदाधुंदीपाई मदत न मिळणे आणि उघडउघड मदत नाकारणे ह्यातला फरक अधोरेखित करणे हा उद्देश होता.

उदय, आम्ही सलमानचा निषेधच केला आहे.
हम दिल दे चुके सनम नंतर सलमानचा एकही चित्रपट पाहिलेला नाही.
अगदी हल्ली आलेले दबंग किंवा इतरही नाही.

<<उदय, आम्ही सलमानचा निषेधच केला आहे.>>
----- दुरान्वयेही तुमच्या बद्दल नाही, कृपया गैरसमज नको... सार्वत्रिक आढळणारा दुट्टप्पी मनुष्यस्वभाव ज्याचा मी पण एक भाग आहे...

माझ्या माहितीप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटनकडून भारताला £२८० मिलिअन मद्त मिळत होती. ही मदत २०१५ पासून बंद करण्यात आलेली आहे.

भारताला अनेकांनी इतक्या वेळा लुटलेय की कोणकोणत्या देशांकडुन नुकसान भरपाई मागायची?
अब्दाली, महंमद गझनी, नादिरशाह किती मोठी जंत्री होईल.

आता सध्या देशात राहुन देशाचा पैसा लुटणार्‍यांना जेरबंद करा. तो स्विस बँकेतुन काळा पैसा आणा, मग नुकसान भरपाई मागा.

माझ्या माहितीप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटनकडून भारताला £२८० मिलिअन मद्त मिळत होती. ही मदत २०१५ पासून बंद करण्यात आलेली आहे.
------ हे बरोबर आहे. प्रणव मुखर्जी अर्थमन्त्री असताना त्यान्नी भारताला आता तुमच्या £££ मदतीची गरज नसल्याचे कळवले होते.

भारत चान्द्रयान, मन्गलयान सारखे खडतर आणि आव्हानात्मक कार्यक्रम राबवतो आणि यशस्वी करतो तर अशा तुटपुन्ज्या मदतीची गरजच काय ?

बैल गेला झोपा केला!
काय अपेक्षा होती ब्रिटिशांकडून? नि का?
जेंव्हा मूठभर लोक दूरवरून येतात नि तुमचेच लोक त्यांना मदत करून खुश्शाल लुटू देतात तेंव्हा तुम्ही झोपा काढल्या ना? मग आता का रडता?
कित्येक राजे महाराजांनी वैयक्तिक स्वार्थासाठी भारतातली संपत्ती ब्रिटिशांना भेट म्हणून दिली!! कुणि त्याचा हिशेब ठेवला आहे?

ब्रिटिशांनी भारताचे जे केले ते फार वाईट झाले यात शंका नाही पण त्यांनी चांगले करावे म्हणून का तुम्ही त्यांना मदत केली? बेअक्कलपणे, क्षुद्र स्वार्थापायी त्यांना खुश्शाल राज्य दिले. भो आ क फ.

भारतातले लोक तरी काय करत होते? नागपूरचे भोसले नि पुण्याचे नानासाहेब पेशवे यांनी बंगालमधे लढाई करून लुटालूट केली. आता बंगालने महाराष्ट्राकडे पैसे मागावे का?

म्हणे तीनदा सांगूनहि सूरतच्या लोकांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना कर भरला नाही म्हणून त्यांनी सूरत लुटले. कुणि कागदोपत्री हिशेब ठेवला होता का? काही कायदा होता का की कर नाही दिला तर अमुक एक रक्कम कर व शिक्षा म्हणून द्यायचे?

१. आज जे भारताचे घटक आहेत त्यांनी पूर्वी लुटालूट केली असेल तर ती क्षम्य आहे. कारण भारत म्हणून सगळे एक आहेत.
आपलेच दात आणि आपलेच ओठ ही म्हण इथे लागू पडते. ब्रिटनने राज्य करताना आपले वर्णभेदावर आधारित वेगळेपण जपले होते. त्यामुळे आता परतफेडीची वेळ आलेली आहे.
२. शिवाजी महाराज, पेशवे, नादिरशहा, शक, कुशाण, हूण, उच्च जाती ह्यांनी लूट केली होती. पण आज त्यांच्या हातात काहीही सत्ता नाही. त्यांचे सरकार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळणे शक्य नाही.
२. ज्या सार्वभौम ब्रिटनने भारताची लूट केली ते ब्रिटन आज तसेच राष्ट्र म्हणून उभे आहे. त्यांचा सांस्कृतिक वारसा तोच आहे. हे त्यांनाही मान्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडे निदान नुकसानभरपाईची मागणी करणे तरी व्यवहार्य आहे.
३. ज्यू लोक हजारो वर्षापूर्वी त्यांच्या देशातून परागंदा झाले पण जिद्दीने, अनेक वर्षे ती इच्छा जागृत ठेवून शेवटी तिथे हक्काचा देश बनवलाच. तेव्हा गेली दिडशे वर्षे काय झोपा काढत होतात का वगैरे मुद्दे गैरलागू आहेत. जिसकी लाठी उसकी भैस. जेव्हा इंग्रज राज्य करत होता तेव्हा त्याची लाठी होती म्हणून. आज भारत प्रबळ आहे तर त्याने तसे करावे. जगाचा हाच नियम आहे. आज सगळे मानव समान मानले जातात. मग आज भारताला ब्रिटनला जाब विचारण्याचा पुरेपूर हक्क आहे. आणि तो त्यांनी वसूल करावा, सव्याज.

४. क्षुद्र स्वार्थापायी देश इंग्रजांच्या हवाली करणारे राजे नवाब संस्थानिक होते. आज ते जवळपास नामशेष झालेले जवळपास नामशेष झालेले आहेत. आज हा देश लोकांचा आहे. लोकांना मागे झालेल्या अन्यायाची चीड असेल तर ते रास्तच आहे.

ह्यातून काही द्रव्य निष्पन्न होईल असे वाटत नाही. पण आपल्या दुष्कृत्यांबद्दल ब्रिटनने क्षमायाचना, दिलगिरी, पश्चात्ताप व्यक्त केला तरी पुरेसे आहे. अगदी पुन्हा पुन्हा, कंटाळा येईपर्यंत माफी मागितली तरी मला चालेल.

<<पण आपल्या दुष्कृत्यांबद्दल ब्रिटनने क्षमायाचना, दिलगिरी, पश्चात्ताप व्यक्त केला तरी पुरेसे आहे. >>
----- जालियनवाला बाग हत्याकान्ड, बन्गाल दुष्काळ या विषयावर माफी मागणे मला अपेक्षित आहे.

अजून ते भाषण ऐकले नाही. माफीची मागणी योग्य आहे. पण बाकी यातून अजूनही ते कोणीतरी भारी साम्राज्यकर्ते आहेत व भारत कोणीतरी पामर देश असे चित्र निर्माण होईल. जागतिक अर्थव्यवस्थेत, लष्करी बळात ब्रिटन चा किती रिलेव्हन्स आहे आता? याउलट भारताचे स्थानच जास्त बळकट असेल. मला आकडे वगैरे माहीत नाहीत, पण भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनपेक्षा मोठी आहे ना आता?

डाॅ. शशी थरुर यांचं ते इंप्राॅंम्चु भाषण कुठल्याश्या संस्थेच्या डिबेट मध्ये केलेलं आहे, ब्रिटिश पार्लमेंट मध्ये नाहि. या भाषणामुळे भारतावर/ला कुठल्याहि प्रकारचा परिणाम/फायदा होइल याची शक्यता/आशा बाळगणं हे भाबडेपणाचं लक्शण आहे... Happy

पण ते तेथून व्हायरल होउन पब्लिक चर्चेत, मीडिया मधे सगळीकडे आलेले आहे, त्यामुळे हा विषय पुढचे काही दिवस जोरात असणार हे नक्की. परिणाम काय होईल वगैरे माहीत नाही. जालियनवाला वगैरे करता माफी मागणे योग्य होईल. त्यापेक्षा काही होईल असे वाटत नाही. मध्यंतरी कोणीतरी ब्रिटिश सरकार तर्फे आलेला तिकडे जालियनवाला मधे गेला होता असे वाचले. अंधुक लक्षात आहे.

ब्रिटन ह्या देशातिल पुर्विच्या लोकान्नि केलेल्या अत्याचाराबद्द्ल् सध्याच्या पिढितिल जनतेने माफि मागने योग्य वाटते का?

पगारे, तुम्हाला भारतातल्या आजच्या पिढीने त्यांच्या पुर्वजांनी केलेल्या अत्याचाराविष्यी मफी मागावी असे वाटते का?

ब्रिटन ह्या देशातिल पुर्विच्या लोकान्नि केलेल्या अत्याचाराबद्द्ल् सध्याच्या पिढितिल जनतेने माफि मागने योग्य वाटते का?>>

गाडी कुठे वळवायचीय ?
Wink

जलियाँवाला बाग़ बद्दल माफ़ी ची मागणी रास्त आहे कारण जलियाँवाला नंतर जेव्हा डायर ला नोकरी वरुन कमी केले गेले तेव्हा ब्रिटिश ख़ादिम हरामजाद्या जनते ने त्याला मदत म्हणुन आर्थिक वर्गणी काढून त्या हरामखोराला पैश्याची थैली दिलेली होती असे वाचले आहे

>>
ब्रिटन ह्या देशातिल पुर्विच्या लोकान्नि केलेल्या अत्याचाराबद्द्ल् सध्याच्या पिढितिल जनतेने माफि मागने योग्य वाटते का?
<<
एक म्हणजे ही माफी तो देश मागत आहे कुठली व्यक्ती नाही. दुसरे असे की जो देश आपल्या चांगल्या परंपरांचा अभिमान बाळगू शकतो त्या देशाने आपल्या दुष्कृत्यांबद्दल खंत बाळ्गली आणि क्षमा मागितली तर असे काय चूक आहे? जोवर ब्रिटिश हा ब्रिटनला आपला देश मानतो तोवर त्याच्या बर्‍यावाईट गोष्टींनाही त्याने आपले मानलेच पाहिजे. एक देश दुसर्‍या देशाकडून नुकसानभरपाईची वा क्षमायाचनेची रास्त अपेक्षा करत आहे.

आज जे भारताचे घटक आहेत त्यांनी पूर्वी लुटालूट केली असेल तर ती क्षम्य आहे. कारण भारत म्हणून सगळे एक आहेत..

....

अजिबात मान्य नाही.

इंग्रजानी ३५० संस्थानिकी बांडगुळे पाळली व त्या जिवावरच ते जगले.

संस्थानिक दिसायला भारतीय असले तरी मनाने इंग्रजच होते.

त्यानी गिळलेला पैसा हा त्यांची वैअक्तिक झालेला आहे.

त्यामुळे त्यांच्याकडुनही माफी व दंड अपेक्षित आहेच.

Pages