मैदा चार वाट्या / कप
बटर अर्धी वाटी / कप
कोमट दूध एक वाटी / कप
मीठ १ टि स्पून
साखर पाव - अर्धा वाटी / कप
ड्राय यिस्ट १ टेबल स्पून
अंडी २ * ( अंडी न खाणारे अंडी वगळू शकता)
केशर (ऐच्छीक)
सारण / फिलिंग
ब्राऊन शुगर पावडर एक वाटी / कप
दालचिनी पावडर १ टेबल स्पून (३ टि स्पून)
मेल्टेड बटर १/३ वाटी / कप
वेलची पावडर (ऐच्छीक)
व्हॅनिला पावडर / इसेन्स (ऐच्छीक)
सजावटीसाठी ग्रॅन्युलेटेड साखर
१) एका भांड्यात मैदा घेवून एका बाजूला यिस्ट व दुसर्या बाजूला मिठ टाकावे व व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे.
२) दुसर्या भांड्यात कोमट दूध, केशर पावडर, बटर, साखर घेऊन बीटर ने एकत्र करून घ्या. * मिश्रण कोमट आहे ह्याची खात्री करून ह्यात व्यवस्थित फेटलेली अंडी घालून परत सगळे मिश्रण परत फेटून घ्या.
३) मैद्यात दुसर्या भांड्यातील मिश्रण ओतून चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यावे (मळायचे नाही) . ते साधारण असे दिसेल.
४) तासभरासाठी हे मिश्रण उबदार जागेत झाकून ठेवावे. त्यानंतर ते असे मस्त फुगून येईल.
५) त्यातली हवा काढून व्यवस्थित फॉईल गुंडाळून ह्याची रवानगी (१ ते ३ दिवसांसाठी) फ्रीज मधे करावी. हवे तेव्हा फ्रीज मधून बाहेर काढावे व साधारण तापमानाला वापरायला घ्यावे.(साधारण अर्ध्या तासाने)
६) फिलिंग / सारणासाठीचे साहित्य एकत्र करुन घ्यावे.
७) क्र. ५ मधील पिठाचे साधारण दोन गोळे करून घ्यावे. एक गोळा / उंडा घेवून लांबसर लाटावे. व त्यावर सारण एकसारखे पसरवून घ्यावे.
८) लांब बाजूने घट्ट गुंडाळी करून घ्यावी व साधारण १ ते दिड इंचावर कापावे.
९) हे रोल साजावटीच्या साखरेत एका बाजूने घोळून बटर पेपर लावलेल्या बेकींग ट्रे मधे एकमेकांपासून जरा अंतरावर ठ्वावे.
१०) रोल्स रेज होण्यासाठी तासभर तरी उबदार जागेत ठेवावेत. मी ओव्हन जरासे गरम करून त्यातच ठेवते.
११) १८० डिग्री तापमानाला साधारण १५-२० मिनिटे ओव्हन मधे बेक करावे.
स्विडन मधे ह्या कानियेल / कानेल बुलार (kanelbullar) च्या नावाने खास एक दिवस साजरा केला जातो. ह्याच्या अनेक रेसेपी युट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहेत.
मी वर दिलेल्या प्रमाणाच्या दुपटीने केले होते. साधारण ५० नग झाले होते.
साखर तसेच दालचिनी पावडर कमी अधिक प्रमाणात वापरता येईल.
फ्रीज बाहेर आठवड्याहून अधिक टिकायला हवेत. माझ्याकडे ३-४ दिवसांहून अधिक शिल्लक राहतच नाहीत.
खाताना असेच थंड किंवा जरासे गरम करून खाऊ शकता.
शेवटचा फोटो वाफाळत्या चहा / कॉफीसोबत काढायचा होता पण रात्री अकरा वाजता केलेला तो चहा ओतून द्यावा लागला असता त्यामूळे तो फोटो काढायचा मोह टाळला.
छाण
छाण
क्या बात! सिनॅबॉनच्या तोंडात
क्या बात! सिनॅबॉनच्या तोंडात मारेल असे फोटो आणि मस्त रेसिपी.
मस्तच! एके काळचा आवड्ता
मस्तच!
एके काळचा आवड्ता पदार्थ.
आता लांबून नमस्कार!
मस्त .. भारतीयीकरण आवडलं ..
मस्त .. भारतीयीकरण आवडलं ..
"आधी फोटो बघताना अंड्यात केशर??" असं वाटलं .. पण सिनॅमन च्या चवीपुढे केशर वेलची ची चव लागते का?
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
मस्तच!
मस्तच!
फोटो सुरेख आलेत,
फोटो सुरेख आलेत,
मस्तच!
मस्तच!
व्वा, अप्रतिम दिसतायंत.
व्वा, अप्रतिम दिसतायंत. फोटोही अगदी प्रोफेशनल. शेवटच्या फोटोतला रोल उचलून खायची भयंकर इच्छा झाली
नलिनी, खुपच छान दिसतायत रोल्स
नलिनी, खुपच छान दिसतायत रोल्स
स्टेप बाय स्टेप फोटोजही मस्त आलेत एकदम.
अप्रतिम ... बघुनच भुक
अप्रतिम ... बघुनच भुक लागली..
कसले यम्मी दिसतायत रोल्स
कसले यम्मी दिसतायत रोल्स
सुरेख !!
सुरेख !!
chaan disatay... mast...
chaan disatay... mast...
वॉव..............नलिनी मस्तय
वॉव..............नलिनी मस्तय हे! करून बघीन नक्की.
फारच सुंदर दिसतंय! अंडं नाही
फारच सुंदर दिसतंय! अंडं नाही घातलं तर आपल्या दिवाळीतला एक पदार्थ म्हणून होईल.
मस्त आहेत दिसायला. करुन
मस्त आहेत दिसायला. करुन पाहण्याजोगे अगदी.
पिठ इतके सैल आहे, फुगल्यावर अजुन सैल होईल. मग ते लाटता येईल? असे फुगायचे पदार्थ बनताना जर पिठ पातळ झाले तर कित्येकदा माझा पदार्थ बिघडतो कारण त्या पातळ झालेल्या पिठाला लाटण्यासाठी साधे पिठ घालुन लाटावे लागते.
फ्रिजमध्ये ठेऊन थोडे थंड करुन वापरल्याने फरक पडेल कदाचित असे वाटते.
वॉव...मस्तं सही दिसताहेत हे
वॉव...मस्तं सही दिसताहेत हे रोल्स.
वॉव.. छान रोल्स.. स्टेपवाइज
वॉव.. छान रोल्स..
स्टेपवाइज फोटोही खूप मस्त.
अगदी प्रोफेशनल जमलेत !
अगदी प्रोफेशनल जमलेत !
अगदी प्रोफेशनल जमलेत !>> अगदी
अगदी प्रोफेशनल जमलेत !>> अगदी खरंय!
मस्तं पाककृती! फोटो खूप सुंदर
मस्तं पाककृती! फोटो खूप सुंदर आहेत.
सर्वांना, मनापासून
सर्वांना, मनापासून धन्यवाद!
पण सिनॅमन च्या चवीपुढे केशर वेलची ची चव लागते का?>> केशर, वेलची किती घालता त्यावर अवलंबून आहे अर्थात दालचिनीची चव अधिक जाणवते. केशरामुळे मस्त रंग येतो.
साधना, हे प्रकरण तितकेसे पातळ होत नाही. अगदी फ्रिजमध्ये नाही ठेवले तरी तासाभराने जरासा मैदा शिवारायचा आणि मळून घेतले की जमते. जरा कमी जाळीदार होतात एवढेच. कमी प्रमाणावर करून बघ.
लवली... वाफाळत्या कॉफी बरोबर
लवली... वाफाळत्या कॉफी बरोबर इमॅजिन केलं, सिंपली यम!!!
सुन्दर....घरचे साहित्य +
सुन्दर....घरचे साहित्य + कौशल्य वापरून केल्यावर सिनॅबॉनच्या तोंडात मारेल असे होणारच!!!
धाकट्या मुलील खूप आवडतात त्यामुळे आमच्या घरी सुध्धा बरेच वेळा होतात, रेसिपी/फोटो टाकायचा आळ्शीपणा!!
अर्थात ह्या स्विडिश रेसिपी प्रमाणे नाही, आमचा आपला Alton Brown झिंदाबाद!!
सुंदर दिसतायत सिनेमन रोल्स.
सुंदर दिसतायत सिनेमन रोल्स. नक्की करुन बघेल.
My favorite winter evening
My favorite winter evening snack with coffee...
पाकृ., फोटु भारी... १० वा फोटो फार आवडला.
सगळेच फोटो फारच छान करण्याची
सगळेच फोटो फारच छान
करण्याची शक्यता अगदीच कमी आहे.
मस्तच ग नलु. बेकिंगची भिती
मस्तच ग नलु.
बेकिंगची भिती वाटते त्यामुळे करण्याची शक्यता नाहीच. धीर गोळा झाल्यास करुन पाहिन.