कथाकोलाज ( सादरकर्ते : चिन्मय मांडलेकर, मृणाल दुसानीस, सीमा देशमुख आणि जितेंद्र जोशी )
कार्यक्रमाची सुरवात झाली सीमा देशमुख यांच्या गणेशस्तवन गायनानी, किती मल्टीटॅलेंटेड असतात लोक.. सीमा देशमुख उत्तम कथ्थक डान्सर, अभिनेत्री आहे माहित होतं , इतकी सुरेख गाते हे माहित नवह्तं !
कथाकथन किंवा नाट्यवाचन प्रोग्रॅम्स बघून खरच जमाना झाला, अनेक वर्षांनंतर असा आगळा वेगळा प्रोग्रॅम ऐकला !
सगळ्यांचच कथा वाचन आवडलं , प्रत्येक कथेचा वेगळा मुड वेगळा होता आणि विशेष म्हणजे यातल्या कुठल्याही कथा अगदी पु.लं ची कथा देखील माहित नव्हती म्हणून ऐकताना जास्तं मला आली.
सादर झालेल्या ४ कथा :
पायरी ( मंगला गोडबोले) - सादरकर्ती सीमा देशमुख
आमच्यावर कोण प्रेम करणार ( विजय तेंडुलकर) सादरकर्ती मृणाल दुसानीस
हरुन अल् रशिद ( पु.ल . देशपांडे) सादरकर्ता चिन्मय मांडलेकर
आता आमोद सुनासि आले ( दि.बा. मोकाशी) सादरकर्ता जितेंद्र जोशी
( मी ही सगळी नावं कार्यक्रम संपल्यानंतर विसरून गेले होते, ही माहिती नंतर बद्दल जितेंद्र जोशी कडून घेतली, त्या बद्दल त्यांचे आभार .)
सीमा देशमुख आणि मृणाल च्या काहीशा गंभीर कथां नंतर प्रेक्षकांना हशा पिकवणारी चिन्मय ने सादर केलेली पु. लं ची 'हरुन अल् रशिद ऐकायला मिळाली , कथा आणि चिन्मयच्या धमाल वाचनाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला पण मला सर्वात जास्तं आवडलं ते जितेंद्र जोशीचं कथावाचन !
नेहेमी कॉमेडी साठी प्रसिध्द असलेल्या जितुकडून अशीच एखादी लाइट ह्युमर कथा ऐकायला मिळेल असं वाटलं होतं पण सर्वात गंभीर आणि इंटेन्स वातावरण निर्मिती घडवून आणणारी कथा त्यानीच सादर केली !
त्याची कथा सुरु होण्यापूर्वी जरा प्रेक्षकात चुळबुळ हालचाल सुरु झाली कारण दुसर्या ठिकाणी होणारी आनंदगंधर्वांची मैफिल लंच टाइम लांबल्याने अता ओव्हरलॅप होउ लागली होती आणि काही लोक याच सभागृहात पुढच्या कार्यक्रमाची म्हणजे हर्ष भोगले शो ची वेळ झाली म्हणून आत येउ लागले.. जितु जाम डिस्टर्ब झाला, प्रेक्षकांनी पिनड्रॉप सायलेन्स पाळे पर्यन्त मी वाचणार नाही, कथा अतिशय गंभीर आहे, ज्यांना जायचय त्यांनी प्लिज लवकरात लवकर वेळ न घेता जा , असं जाहिर केल्यावर कुठे प्रेक्षक शान्त झाले :).
पण जशी कथा सुरु झाली, तशी ती संपे पर्यंत पिनड्रॉप सायलेन्स... जितु खरच उत्तम नरेटर आहे.. सॉल्लिड वातावरण निर्मिती केली त्यानी , मला सर्वात आवडलेलं कथावाचन !
असो, कथां बद्दल डिटेल्स लिहिणे योग्य नाही, रसिकांनी वाचा किंवा संधी मिळेल तेंव्हा प्रोग्रॅम जरुर पहा !
कथा सुंदर होत्या, सादर उत्तम झाल्या हे आहेच पण असं ऐकत रहावं असं मराठी ऐकणे ही सुध्दा एक ट्रिट होती माझ्यासाठी !
४ तारखेच्या दुपारी झालेला कथा
४ तारखेच्या दुपारी झालेला कथा कोलाज हा एक अतिशय सुंदर कार्यक्रम होता. साधा कथावाचनाचा कार्यक्रम. पण सादरकर्त्यांनी इतक्या सुरेख वाचल्या की कार्यक्रम अर्धा तास लांबला तरी जाणवलं नाही. रमून जायला झालं. इतकंच कशाला, लोकांनी मधे ब्रेकही घेऊ दिला नाही. चिन्मय मांडलेकरने पुलंची एक कथा वाचली (या कथेचं नाव लक्षात नाही. कोणाला आठवलं तर अपडेट करा प्लीज). सीमा देशमुखने मंगला गोडबोलेंची 'पायरी' वाचली. मृणाल दुसानीसने तेंडुलकरांची एक कथा वाचली (हिचंही नाव आठवत नाहीये) आणि जितेंद्र जोशी ने दि. बा. मोकाशी यांची 'आता आमोद सुनासि आले' वाचली. सलग अडीच तास या लोकांनी खिळवून ठेवलं खुर्चीला.
या कार्यक्रमातल्या प्रत्येकाची दोनेक मिनीटांची क्लिप घेऊ शकले त्यांच्या या लिंक्स -
कथाकोलाज : ओम नमोजी
कथाकोलाज : आता आमोद सुनासि आले
कथाकोलाज : आमच्यावर कोण प्रेम करणार
कथाकोलाज : हरुन अल् रशिद
कथाकोलाज : जितेंद्र - कविता
कथाकोलाज : पायरी
आता आमोद सुनासि आले पुस्तक मी
आता आमोद सुनासि आले पुस्तक मी कधीपासून शोधतेय. मिळत नाहीये.
जितेंद्रची कविता खूप छान!
जितेंद्रची कविता खूप छान!
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/interview/mrunal-dusanis/articles...
आता आमोद सुनासी आले ही कथा
आता आमोद सुनासी आले ही कथा 'दि.बा.मोकाशी यांच्या निवडक कथा' या त्यांच्या पुस्तकात आहे. अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा आहे. खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक कार्यक्रम यायचा ज्यात प्रसिद्ध कथांवर आधारित भाग असायचे त्यात ही कथाही होती. तो भागही अतिशय उत्तम झाला होता.
बाकीच्या तिन्ही कथा वाचलेल्या नाहीत, आता मिळवून वाचीन.
अरे हारून अल रशीद (बहुधा ते
अरे हारून अल रशीद (बहुधा ते "मी - हारून अल रशीद" आहे) इतक्या लोकांनी वाचलेली नाही? कसली धमाल आहे ती. बहुधा "खिल्ली" मधे आहे.