Submitted by टवाळ - एकमेव on 3 July, 2015 - 05:28
पुर्वी सुगंधीत गुलमोहोराला
हल्ली वास येतोय सडका
जागोजागी नव-कवीने
सांडून ठेवलाय तडका
करावा शब्दखेळ
हा तर कवींच्या हातचा मळ
अपूरे पडता प्रतिभाबळ
नव-कवीस भरला चळ
विशाल असेलही डोह
पण प्रतिभेवाचून कोरडा ठक्क
बहुतांनी समजावले तयाला
नव-कवी मात्र मख्खं
जुन्याच शाल-जोडीतला
हा एक तुकडा धडका
वाचविण्या गुलमोहोर
फिरला टवाळाचा फडका
- कविराज "नम्र टवाळ"
उपरोक्त काव्य ऑडीओ स्वरूपात, व्हिडीओ स्वरूपात ई.ई. नाना स्वरूपात प्राप्त होण्यासाठी आरशासमोर उभे राहावे व मोठमोठ्याने वाचावे. शेजारी (वाचलेच तर) आपला फोटो वर्तमानपत्रात येईल याची तजविज फुकटात करतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टवाळा का न आवडला तडका जो
टवाळा का न आवडला तडका
जो फिरविला त्यावरी फडका?