सध्या वेगवेगळ्या प्रसंगांवरून माणसाची संवेदनाशीलता कशी कमी होत चाललिये, अपघातचं चित्रण करणारे प्रत्यक्ष मदतीला कसे पुढे येत नाहीत यावर चर्चा सुरू आहे. त्यामानाने कमी त्रासदायक पण तरीही विचार करायला लावणारा अनुभव काही दिवसांपूर्वी आला. आणि असे अनुभव हल्ली सर्रास येऊ लागले आहेत मग ते पूणे असो की मुंबई.
पुण्यात असताना परवा सहकुटुंब "किल्ला" बघायचा ठरलं आणि मंगला थियेटरला आम्ही शो टायमिंगला हजर झालो. थिएटर अर्थातच फूल होतं. चित्रपट सुरू झाल्यावर साधारण २ ते ५ वर्षे वयोगटातली किमान ८ ते १० मुलं मूव्ही पाहायला आलियेत (अर्थात आणलियेत) हे लक्षात यायला फारसा वेळ गेला नाही.
दुर्दैवाने आमच्या मागच्याच रो मधे बसलेल्या कुटुंबात ३ बायका आपापल्या ३ मुलांना (जेमतेम वयवर्ष २ ते ४) मांडीवर घेऊन बसल्या होत्या. चित्रपट सुरू झाला आणि मुलं पण सुरू झाली.
सुरुवातीला त्यांचा एखादा बोबडा बोल ऐकून मागे वळून एक स्माईल देत परिस्थितीचा अंदाज घेतला. पुढे येणार्या संकटाची चाहूल त्यावेळी लागली नव्हती.
नंतर चित्रपट आपली पकड घेत गेला आणि मुलं अखंड बडबड करत "वात" आणत राहिली.
आता हे कमी होतं म्हणून पहिल्या रांगेत बसलेली एक चिमुरडी स्क्रीन आणि पहिल्या सीटमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत रिंगा रिंगा खेळायला सुरूवात झाली. थोड्याच वेळात तिच्याच वयाचा एक मुलगा तिला जॉईन झाला. आणि त्या दोघांचा पकडापकडीचा खेळ सुरू झाला. आई बाप निवांत स्क्रीनकडे पहात बसले होते.
प्रयत्नपूर्वक चित्रपटात लक्ष घातलं तरी प्रचंड डिस्टर्ब होत राहिलं... कानात मागच्या रांगेतून येणारी बोबडी बडबड आणि स्क्रीन्समोर चाललेला रिंगा रिंगा.
मध्यंतरानंतर कोणाचंतरी एक तान्हं बाळ उठलं असावं आणि भोकाड पसरून रडायला लागलं... पण बापाला चित्रपट पहायची खुमखूमी... आणि आपण आपले पैसे देतो इतरांचे नाही सो त्यांचा विचार का करा हा आविर्भाव.
तो त्या भोकाड पसरलेल्या मुलाला घेऊन बाजुला उभा राहून चित्रपट पाहात होता.
हे झालं एक प्रातिनिधिक उदाहरण पण कमी अधिक प्रमाणात हे हल्ली बर्याचदा व्हायला लागलय.
मुळात ज्या वयातल्या मुलांना खरंच चित्रपट कळू शकत नाही त्यांना असं घेऊन यावंच का??
घरी ठेवणं शक्य नसेल तर इतरांना त्रास होण्यापेक्षा आपण अश्या पद्धतीने चित्रपट पहाणं टाळणं शहाणपणाचं ठरणार नाही का??
बरं समजा नेलं मुलांना बरोबर तर किमानपक्षी मुलांचा त्रास जाणवायला लागल्यावर त्यांना घेऊन थोडा वेळ बाहेर जाणं संयुक्तिक नाही का??
एक दोनदा मुंबईत असे प्रसंग घडलेत जिथे शेवटी आपल्याला सांगावं लागतं किंवा बाजुचा कोणीतरी सांगतो तेंव्हा उपकार केल्यासारखे हे लोक जीवाच्या रामरामीला बाहेर नेणार मुलांना...!!!
म्हटलं तर फुटकळ गोष्ट आहे पण एखाद्या कलाकृतीचा समरस होऊन आस्वाद घेताना जर अश्या प्रकारचा डिस्टर्बन्स येत राहिला तर मग ते मूल लहान असो की मोठं वैताग येतोच.
यात त्या मुलांची चूक काहीच नाही. ते वयाला साजेसंच वागतायत..... पण पालकांना किमान सामाजिक भान ठेवून हे टाळता यायला हवं. कुणी ह्यांना सांगेल का???
कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या पोरीला (पालक)
थियेटरमध्ये आणू नको
रडवू नको तान्ह्या मुला......
कुणी जाल का सांगाल का.... !!!
भुन्ग्या, तुझा स्पेल चेक लै
भुन्ग्या, तुझा स्पेल चेक लै भारी....
क्राय रुमची कल्पना
क्राय रुमची कल्पना छानच.
प्रशांत दामलेच्या नाटकात तो स्वतः निवेदन करत असे आणि त्यावेळी मूल रडायला लागल्यावर बाबांनी त्याला घेऊन बाहेर जावे असे सांगत असे.
ज्यांच्याकडे त्या प्रयोगाचे तिकिट आहे त्यांच्या साठी सी सी टी व्ही वर प्रयोग दाखवायची सोय करणे तितकेसे खर्चिक नसावे. माझ्या डोळ्यासमोर शिवाजी मंदीर आहे, तिथे स्टॉल्स जवळ अशी सोय करता येईल.
मी सहा महिन्यापुर्वी मस्कतमधल्या ऑपरा हाऊस मधे गेले होतो. तिथे तर प्रयोग सुरु असताना प्रेक्षागृहाची दारेच बंद करतात, कुणालाही आत वा बाहेर सोडत नाहीत. शिवाय १० वर्षांखालील मूलांना तिथे प्रवेशच नाही.
साधना नोटेड
साधना नोटेड
प्रबोधनकार ला क्राय रूम आहे.
प्रबोधनकार ला क्राय रूम आहे.
क्राय रूम प्रकार पहिल्यांदा
क्राय रूम प्रकार पहिल्यांदा ऐकला,
भुंग्या... मान्य... एकदम
भुंग्या...
मान्य... एकदम मान्य... पूर्ण सहमत...
आपल्या खिशातले पैसे खर्च करुन, अशा सार्वजनीक ठिकाणी जाऊन मनस्ताप करुन घेणे, आम्हाला (मला आणि बायकोला) खरंच परवडत नाही. 'मराठी चित्रपट/नाटकांचे चांगले दिवस' वगैरे गोष्टी, टिव्ही वरुन(च) ऐकायला (आणि पटायला देखिल...) बर्या वाटतात... त्यावर एकमेव उपाय - काही दिवस थांबा, हे सगळे चांगले सिनेमे काही दिवसांतच टिव्ही वाहिन्यांवरुन घरात शांतपणे बघायला मिळतात...
अजुन एक नविन ट्रेन्ड सुरु झालेला आहे ... अशा सार्वजनीक ठिकाणी शांतपणे बसल्यावर आजु-बाजुला मोबाईल ठणठणल्यावर अक्षरशः ओठांवर हमखास शिवी यायची(च). सध्या त्या पुढची पायरी - शेजारी 'व्हॉट्स-अॅप-ग्रस्त' जर कुणी येऊन बसला की, डोकं अक्षरशः फिरतं... याचा जीवंत अनुभव घेतलाय तो पुण्यात(च). वैभव जोशी आणि दत्तप्रसाद रानडे (आणि त्यांचे सहकारी वादक कलाकार), स्टेजवरून प्रामाणिकपणे त्यांचा 'सोबतीचा करार' सादर करत होते; आणि त्याच वेळी माझ्या आजु-बाजुचे दोन्ही (अनोळखी) इसम 'व्हॉट्स-अॅप' मधे दंग होते... फेसबुक वरुन या घटने बद्दल मी 'एकाच वाक्यात निषेध' नोंदवला होता...
क्राय रूम प्रकार मीही प्रथमच
क्राय रूम प्रकार मीही प्रथमच ऐकला.
मला तर आधी अख्खे जगच क्राय रूम वाटायचे आधी.
राम गणेश गडकरी रन्गायतन
राम गणेश गडकरी रन्गायतन
माझ्या माहितीतले पहिले क्राय रूम असलेले नाट्यग्रूह
क्राय रूम इथे यशवंतरावलाही
क्राय रूम इथे यशवंतरावलाही आहे. प्रेक्षागृहात जाण्यासाठी दरवाजा आहे तिथेच छोटीशी लॉबी आहे. काचेतून स्टेज दिसतं, आवाज ऐकू येतो पण तिथला आवाज आत जात नाही. पण ती बहुतेक मोबाईलवर बोलण्यासाठीची जागा असावी. लहान मुलांसाठी एक बसायला स्टूलही नाही तिथे.
हा खरंतर बेशिस्त वर्तनात लिहायचा अनुभव पण आपल्या इथे लोकांना बंद असलेला दरवाजा आपण उघडला तर तो पुन्हा लावून मग पुढे जावे एवढेही ध्यानात येत नाही. मी त्या दिवशी मोजून सदतीस वेळा प्लीज, दरवाजा ओढून घ्या हे वाक्य बोलले असेन.ग
मुलगी वय ३ वर्ष.. तिला घेउन
मुलगी वय ३ वर्ष..
तिला घेउन कधिच नाही गेलो पिक्चरला..
सरळच आहे.. नाहिच शांत बसु शकत ही मुलं या वयात..
अगदी अगदी . लग्नाच्या अगोदर
अगदी अगदी .
लग्नाच्या अगोदर नियमित चित्रपट ग्रुहात जाउन चित्रपट बघितले आहेत .
हल्ली कमी जातो . पण हा लहान मुलांचा त्रास बर्याच दा अनुभवला आहे .
आम्हि आता बहुतेक रात्री उशीराचे शोज बघतो . एक्दा असच लहान मुलं होती आजूबाजूला म्हणून मी चिड्चिड केली
नवरा म्हणाला , अगं घरी फक्त नवरा बायको असतिल तर या वेळेला मुलांना कुठे ठेउन येणार ? घेउनच याव लागणार . . काही अंशी पटलं .
आम्हीही आमच्या मुलाला गेल्या साडेपाच वर्शात गेल्या महिन्यात पहिल्यान्दा चित्रपट ग्रुहात नेलं
तो नीट बसून पूर्ण चित्रपट बघेल याची खात्री पटल्यावरच.
एक मजेदार किस्सा :
मी आणि माझी बहिण दिचाहै बघायला गेलो होतो . २-३ लहान मुलांचा गोंधळ चालू होता . पायर्यावरून धावण वगैरे . चित्रपट संपताना शेवटी शेवटी एक सीन आहे . जेव्हा सगळे परत गोव्याला आलेले असतात . हे तीघ बोलत असतात त्याच भिन्तीजवळ आणि थोड्या वेळाने प्रीती( की सोनाली ) त्याना हाक मारते खायला . तेव्हा परत येताना आमिर ( की सैफ ) " ओ बेबी बेबी " अस काहीतरी बोलतो . थिएटर्मध्ये एक छोटी ३-३.५ वर्शाची मुलगी अशिच पायर्यावरून खेळत होती . सर्व थिएटर शांत होतं आणि लगेच त्या मुलीने सेम टोनमध्ये सेम वाक्य म्हटलं ,पूर्ण थीएटर मध्ये जो कल्ल्ला झाला !
नाहिच शांत बसु शकत ही मुलं या
नाहिच शांत बसु शकत ही मुलं या वयात.. +१
लेखातली भावना पोचली आणि पटली. माझ्या मुलाला तो साडेतीन वर्षाचा असताना भित भित घेऊन सिनेमा पहायला गेलो होतो. अर्थात ३ वर्षाच्या आत इकडे परवानगीच नाही हे वर दिनेशदांनी लिहिलं आहे. सुदैवाने त्याच्या लाडक्या हिरोचा आणि आवडती गाणी असलेला सिनेमा असल्याने (किक) त्याने न त्रास देता पाहिला. त्या नंतर मात्र नेलं नाही. कारण घरात काही काही 'दृश्य' आली की चॅनल बदलण्याची जी सोय असते, ती थिएटर मधे नसते
Pages