तडका - विकास

Submitted by vishal maske on 25 June, 2015 - 22:31

विकास

विकास करणारांकडूनच
कधी विकासालाच ठेंगा आहे
ज्याच्या-त्याच्या डोक्यामध्ये
भ्रष्टाचाराचा भुंगा आहे

दारिद्रयाचा फापट-पसारा
जसाच्या तसा रखडला जातोय
भ्रष्टाचाराच्या या शिलेदारांकडून
इथे विकास पोखरला जातोय

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users