"रे, तेका ताप इल्लो हा. तुमका चाकरमान्यांक कितेव सांगला तरी आपला ताच खरा? तुझी बायेल मुंबईतसून इल्ली हा, पण तू हयच येद्याचो केदो झालसं मा? तरी जळतो पाय जाळतलय पण मागे घेवचय नाय ह्या कसला म रे तुजा वागणा? अवसेचो चेडवाक घेउन गेल्लस झोळवूंक! आता भायरचा काय तरी बादला मगे रे?" दिगल्याच्या आवशीनं गाळीये घालुक सुरुवात केल्यान. मगे मुंबयकरीण बायलं घाबारली. तेना पण हरीकथा लावल्यान, "अहो ममडीला बराच ताप आहे हो. हे आतलं - बाहेरचं म्हणजे काय? औषध तरी आणा" आता काय सांगुचा? ७६ साल ईला पण अजून रस्त्याक लायटी येवक नाय आसत. वालावलेत कोण मेलो डॉक्टर आणि केमिष्ट? कुडाळाक जावचा लागतला. "गो बायग्या, कुडाळातसून शेणाय मास्तराच्या दुकानातसून गोळीये हाडतय." दिगलो भैणीक हाळी घालून भायर पडलो.
वालावलेतसून ४ वाजतानाचो लाल डब्बो पकडून दिगलो कुडाळात इलो. मगे बांबार्डेकर डॉक्टराकडून चिठ्ठी घेऊन, शेणाय मास्तराच्या दुकानात गेलो. थय औषधा घेई होतो तेवा पबल्या मांजरेकरान धबकल्यान," रे, कधी आयलं?, बायलेक आणि चेडवाक हाडहस मा? तुजा पयलाच चेडू! मावलेक आणि वेतोबाक नेतलस मा?" पबल्यानं जागेवरसूनच हात जोडल्यान. "मेल्या गावाक र्हाउन तुजा जाणा नाय आणि आमका सांगातस?" "तू सोयन बोल हां. न जाईनस, मी आपला माका वाटला ता बोललय. स्टँडवर जातहस मा? चल रे चाय भजी घेवया, मगे जाशीत ७ च्या गाडीयेन" दिगल्यान कायोव बोलुच्या आत पबल्यान तेका भटाच्या दुकानात ढकल्यान. "रे बापूची दोनय पोरा भांडतहत. एकान दुसर्याक घराभायर काढल्यान हा! तेच्या बायलेन तेच्या भावाशीक भायर काढलला मा? आता झील ताच करतहत, आदीनारायण बघता हा" पबल्याने जे गजाली करुक सुरवात केल्यान ते २ कोप चाय आणि २ प्लेटी भज्यां खावन मगच थांबलो. भटाक पैशे देउन स्टँडवर येईपर्यंत ७ ची गाडी गेल्लली आणि नेरुरपार फाट्यावर सोडणार्या गाडीयेत दिगलो चडलो. जळला मेल्या त्या पबल्याचा लक्षण! आता बंगलेर आउस, बायल आणि भैण सगळे मिळान तोंड सोडतले. चेडवाचो विचार ईल्यार तेका अजून वायट वाटला. खय पबलल्याच्या नादान रवलय?!
८ वाजता तिठ्यावर उतरल्यार तेका गावचो काळोख खावक ईलो. न्हानपणापास्ना ऐकलेल्यो भुताचे गजाली, देवचाराचो मार्ग आणि कसले कसले बिलमती तेका आठवूक लागले. डोळ्यात ब्वॉट घातल्यार पण दोन पावलापुढचो रस्तो दिसेनासो झाल्ललो. पण चेडवाचो चेहरो समोर हाडल्यान, नारयणाचा नाव घेतल्यान आणि दिगल्यान वालवलेचो रस्तो धरल्यान.
गजलीन घोव खाल्लो! आता ह्या काळोखात चालाक व्हया? सरळ रस्तो बंगलेर जाता. पायाखालचो रस्तो झालो म्हणान काय? अमोशेची रात्र आसा. नुसतो विचार करानच दिगांबराची पावला एकदम जोरात पडूक लागली. मुंबयची प्लॅष्टीकची चप्पल खडियेर "चपाक चपाक" आवाज करी होती. चारी बाजून वाढलली झाडा काळोखात संकासूराचा रूप धरी होती आणि दिगल्याच्या भीतूरचा काळीज सश्यापेक्षाय जोरात उडके मारी होता.
वालावलेची वेस लागली आणि एवढ्यात दिगल्यान आवाज ऐकल्यान "टिकिर.. टिकिर...". तेच्या काळजातल्या सशान कोलांटी मारल्यान! दिगलो थिजान गेलो. चार पावला अजुन हिमतीने टाकल्यान. तेच्या प्रत्येक पावलार मागसून आवाज येई होतो - "टिकिर.. टिकिर..."! दिगल्यान रत्ना भामिणीन माउलीच्या जत्रेत काय मारलली अशी गिरकी मारल्यान. पन्नास पावलावर रस्त्याच्या मधी नुसता एकच जळता बोन्डूक दिगल्याक दिसला. पापणी मिटान परत बगी पर्यंत काय नाय!
दिगल्यान मावलेक गार्हाणा घातल्यान आणि वालावलेच्या दिशेने जोरात गाडी सोडल्यान. मागसून येणारो आवाजय त्याच्या चालीत येवक लागलो. दिगल्याक रात्रौचो घाम फुटलो. परत खांद्यारसून मागे नजर टाकल्यान तर ता अधांतरी तरंगणारा बोंडूक येई होता पण मधीच खुय जाई होता. आता दिगल्याक समोर बघुक पण भय वाटला. चालणा थांबोवन तो मागे वळलो आणि खच्चुन कुकारो घातल्यान, "कुकुsssव... कोण रे तो, मेल्या फुडे ये?"
बोंडुक धागधुग करीत एक्या जागेर थांबला, दिगल्याक जरा धीर ईलो. पण परत बोंडुक चार हात फुडे ईला, त्याच्या वांगड्यान "टिकिर.. टिकिर..."!"दिगल्याच्या कमरेरची पँट गळान जावक लागली. खुय डोक्या चालवलय आणि हाळी घातलय? पळून जावचा म्हटला तरी पावला जमिनीक खिळान गेली. बोंडुक आणि दिगल्याच्या मधी पंचवीस पावला रवली असतली आणि आवाज ईलो, "खोतानु" दिगल्यान जागच्या जागी उडकी घातल्यान, "रे, चंद्या म्हाराचो म्हातारो, गणो, काय रे?" "होय, ताता कोंडकराचो झील मा रे? दिगांबर? मुंबैक गेलस तरी माजो आवाज विसरुक नाय हा तुया!"
"तुका हाळी देऊक काय झाला रे? आणि ता बोंडुक कसला घेऊन फिरतस?" दिगल्याचो जीव मोठ्ठ्या कणगेत पडलो. "अमोशेची रात्र आसा, आणि नुसतो "चपाक चपाक" आवाज येता म्हटल्यार मी पण भीयालय, कमरेचा सुटून जावची वेळ ईल्लली, हाळी खुय देतय? आणि मी ईडी पेय होतय ता बोंडुक दिसला असतला" "तुजो तो आवाज आणि ईडी बगुन माका पण भय वाटाला रे" "टिमकी आसा न्हुय?" "रे जमानो काय ईलो, अजुन कसली टिमकी नि काय ता?" "खोतानु, जीत्याची खोड जालल्ली आसा, मेल्यार पण जावची नाय. तातांनी कधी फरक करुक नाय, पण पंचक्रोशीत मी गणोम्हारच आसय. चला, गजाली करत जावया, मीया वांगड्यानं येतयं" दिगल्याक तापान फणफणलला ममडा आठावला आणि त्याची पावला घराच्या दिशेन पडूक लागली.
"गेल्या टायमाक ईल्ललय त्यावेळेक तुका बरा नाय होता मा रे? पोटात दुखी होता?""तशी कोकेणी - चोचेणी होयत रवतत. पण आता कायोव दुखणा जाणवणा नाय" अशे गजाली करत ते क्षेत्रफळाकडे पोचले, दोगांचाय बोलणा कमी झाला. शाळेचा वळण ईल्यार गणो म्हणालो, "मी हयसूनच घराकडे जातय, कोंडकरणीक माजी खुशाली सांग" दिगल्यान "हयसून खुय तुजा घर?" म्हणीपर्यंत गणो काळोखात गेलो पण!
दिगलो घरी जाई पर्यंत ९ वाजलले. आवस सोप्यार बसून वाट बगी होती. "मामा ईलो" म्हणान शकल्यान, तेच्या भाचीयेन आरड मारल्यान. भैणीन पाणी हाडून दिल्यान. "चार तास खुय रवलं?" "औषध आणलत?" "बस चुकली काय रे?" चारी बाजून सगळ्यांनी कालवो केल्यानी "गे जरा राव, सांगतय...." म्हनान दिगल्यान आपला पुराण सांगूक सुरू केल्यान. सगळे हळु हळु गप झाले "तर अश्या रितीन गाडी चुकली तरी गण्याच्या वांगड्यान शाळेपर्यंत ईलय. गे, असा भुत बगल्यासरका काय बगतास?"
"दिगल्या, भूत तुया बगलं म रे! गणो म्हार दिवाळेतच खपलो, तेका काय तरी पोटाचा दुकणा झाल्लला. आणि शाळेच्या बाजूक स्मशान आसा न्हुय रे? तेच्या नव्या घराकडे गेल्लो रे तो! दिगल्या?"
भैणीचा बोलून होईपर्यंत दिगल्यान जमीन चाटलल्यान!
जबरदस्त..
जबरदस्त..:)
Pages