वाढदिवसाची आठवण …किल्ले कावनई आणि हर्षगड....!!!

Submitted by नवा भिडू on 24 June, 2015 - 05:50

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी ही वाढदिवस साजरा करण्यासाठी किल्ल्याची निवड करतच होतो. माझ्यासोबत आजवर अनेक वर्षे किल्लेभ्रमंती करत असलेल्या वासुदेव दळवी समोर विषय मांडला व कावनई आणि हर्षगडावर ( हरिहर ) शिक्कामोर्तब करण्यात आली. अगदीच गरजेच्या वस्तू ब्यागेत कोंबून वासू आणि मी ७ जुन २०१५ च्या सकाळी इगतपुरी गाठले. तिथून घोटी आणि घोटी वरून शेअर गाडीने आम्हाला कावनई गावात सोडले . मालवाहतुकीच्या गाड्यांनाच मागे दोन्ही बाजूला लाकडी फळी लावून ह्या गाड्या पुढचा १४ किमीचा खाचखळग्यातला प्रवास करत आपल्याला कावनई गावात सोडतात . कावनई गावातील पाण्याची दुर्दशा बघून लवकरात लवकर पाऊस पडावा हीच प्रार्थना आम्ही करत होतो.

From कावनई आणि हर्षगड....!!!

किल्ल्याची चढाई तशी सोपी आहे. गावातूनच किल्ल्याच्या एका सोंडेवरून रस्ता आहे.

From कावनई आणि हर्षगड....!!!

पूर्वी दरवाजा गाठायला छोट्याश्या चिमणीतून हाताने खोबण्या पकडून पुढे जावे लागत असत पण आता शिडी लावल्यामुळे वाट अजूनच सोपी झाली आहे.

From कावनई आणि हर्षगड....!!!

तासाभरातच आम्ही माथ्यावर पोहचलो. माथ्यावर तळ्यात शेवाळ्याच पाणी उरलेलं आहे.

From कावनई आणि हर्षगड....!!!

From कावनई आणि हर्षगड....!!!

पडक्या बुरुजाचे आणि बाजूच्या वाळलेल्या टाक्यांचे अवशेष बघत पूर्व-पश्चिमे कडील सह्याद्रीच्या रांगा, अप्पर वैतरणा चा पाण्याखालचा परिसर बघत असतानाच वातावरणात अचानक आलेला बदल जाणवायला लागला. कडक उन्हात गारवा जाणवत होता, ढगांची गडगड कानी यायला लागली. निळाशार आकाशातील पांढऱ्या ढगांची जागा आता पावसाला उऱ्हात घेऊन फिरणाऱ्या काळ्या ढगांनी घेतली. हवेतले असे रंग बघत आम्ही गड उतरायला सुरवात केली.

पुढचा दौरा हर्षगडावर.
वाकी फाट्यावर पोहचल्यावर तिथून देवगाव साठी जीप पकडली. पावसाने आपली तारीख चुकवली नाही. हळू हळू पडणारे पावसाचे थेंब आता मुसळधार सरी होऊन कोसळत होते. वायपर नसलेली आणि छप्पर गळत असलेली जीप फक्त रस्त्याचा अंदाज बांधत ड्रायव्हर चालवत होता. देवगावला उतरल्या बरोबरच वाड्यावरून त्रंबक कडे जाणारी ST भेटली. गाडीचा आकार फक्त बदलेला पण परिस्थिती तीच. विजांच्या साथीने धो धो कोसळत असलेल्या पावसात ST ने निरगुड फाट्यापासून २ किमी पुढे टाकेहर्ष गावात आम्हाला उतरवले. पाऊस कमी होण्याची वाट बघत रस्त्याच्या कडेला असलेल्या घराचा आडोसा घेतला. तेवढा वेळ आम्ही विजा आणि ढग ह्यांचा आकाशातील पडद्यावर चाललेल्या चलचित्राचा आणि रंगसंगतीतला देखावा न्याहाळत होतो.

From कावनई आणि हर्षगड....!!!

ढगांची लाट आसपासच्या परिसरावर आरूढ होत होती.

From कावनई आणि हर्षगड....!!!

पावसाचे हे रूप पाहून हर्षगडाच्या पायथाच्या कोटमवाडीतच राहायचा निर्णय घेऊन वाडीतील देऊळ किंवा शाळा शोधायला सुरवात केली.

From कावनई आणि हर्षगड....!!!

कोटमवाडीतील आव्हाटे परिवाराचे वाडीतील सगळ्यात जुने घर. त्यांनीच शाळेची किल्ली देऊन आमच्या रात्रीच्या जेवणाचा पण बंदोबस्त केला. चुलीवरच्या भाजी भाकरी आणि तिथेच पिकवलेल्या भाताचा आस्वाद घेऊन आम्ही निरगुड फाट्यावर रात्रीचा फेरफटका मारायला निघालो. पहिल्या पावसाने शीतनिद्रेतल्या काजव्यांना जाग केल आणि रात्रीची रोशनाई बहरली. सकाळी लवकरच आम्ही हर्षगडाच्या दिशेने निघालो.

From कावनई आणि हर्षगड....!!!

From कावनई आणि हर्षगड....!!!

गावातूनच गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. रस्त्यात मध्ये चकव्याच्या ठिकाणी बाण दाखवले आहेत. पहिल्या टेकडीवर पोहचताच वासूने केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हर्षगडाची ओळख म्हणजे गडाच्या पायऱ्या.

From कावनई आणि हर्षगड....!!!

From कावनई आणि हर्षगड....!!!

अखंड कातळात कोरून काढलेल्या पायऱ्यांवर जागोजागी पकडायला खोबण्या आहेत.

From कावनई आणि हर्षगड....!!!

From कावनई आणि हर्षगड....!!!

From कावनई आणि हर्षगड....!!!

From कावनई आणि हर्षगड....!!!

दरवाज्यात पोहचल्यावर गडाच्या मागील बाजूने हर्षवाडी गावातून गडावर आलेली वाट पाहायला मिळते.

From कावनई आणि हर्षगड....!!!

पायऱ्या चढत असतानाच आकाशात पक्ष्याचा थवा पहिला. अल्प्य संख्याक अशी १३ गिधाड (griffon vulture) एका नजरेत पाहण्याची हि आमची पहिलीच वेळ होती.

From कावनई आणि हर्षगड....!!!

गडाचा माथा तसा लहानच आहे अर्ध्या तासातच गडफेरी आटोपता येते.

From कावनई आणि हर्षगड....!!!

From कावनई आणि हर्षगड....!!!

पण रात्रीच्या पावसाने आकाश स्पष्ट केल होत. १५० ते २०० किमी अंतरावर नजर पोहचत होती. नाशिक जिल्ह्यातील अजंठा- सातमाळ रांग तसच त्रंबक रांगेचे विस्तीर्ण असे दर्शन होत असताना तिथून निघण्याचा मोह आवरत न्हवता .

From कावनई आणि हर्षगड....!!!

गडावर पाण्याची बरीच टाके आहेत पण पिण्यासाठी सध्या एकच वापरात आहे. तिथल्याच एका शेवाळाने भरलेल्या टाक्यात माकड मरून पडले होते. ते आम्ही बाहेर काढून ठेवले. गिधाडांची सोय झाली.

From कावनई आणि हर्षगड....!!!

From कावनई आणि हर्षगड....!!!

गडाच्या बुरुजावरून दिसणारा नयनरम्य परिसर डोळ्यात आणि मनात साठवून आम्ही गड उतरायला सुरवात केली.

From कावनई आणि हर्षगड....!!!

रानखाटिक चे पिल्लू उडण्याचा प्रयत्न करत असताना नजरेस पडले

From कावनई आणि हर्षगड....!!!

वाटेत आंबा,करवंद, जांभूळ ह्या रानमेव्याची मजा घेत आम्ही कोटमवाडीतील शाळेत पोहचलो. आव्हाटे कुटुंबाचे आभार मानून आम्ही परतीची वाट पकडली. निरगुडफाटा - खोडाळे - कसारा - कल्याण असा प्रवास करत सुखरूप घरी पोहचलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, वाढदिवसा च्या शुभेच्छा.. दरवर्षी असाच सुखरूप पार पडू दे, आणी आम्हाला छान छान फोटो पाहायला मिळूदेत.. Happy

फोटो छान आलेत सर्व!!

छानच.

वाढदिवसाच्या शुभेच्छा! छान कल्पना. लेख आणि फोटोही मस्तच.
ही गडांची नावं पहिल्यांदाच ऐकली.
सपोर्टसाठी खोबणी , कातळातल्या पायर्‍या...........जबरदस्तच!

छान लिहिलय... हरिवरुन दिसणार्‍या डोंगररांगा मस्तच.

हरिहरच्या पायर्‍यांवरिल थरार आम्ही मार्च महिन्यातील उन्हात अनुभवला होता.