तुला कापते रे तुला कापते
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
18
(ग दि मा, राजाभाऊ आणि बाबुजींची क्षमा मागून 'तुला पाहते रे तुला पाहते' ह्या अजरामर गीतचे स्वैर विडंबन लिहीण्याचा प्रयत्न )
तुला कापते रे तुला कापते
तुझी पर्स माझ्या मनी राहते
जरी साधीभोळी तुला कापते
तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे
तुझ्या मिळकतीने मनी खर्च जागे
तुझ्या कार्डने मी मॉल नाहते
किती भाग्य थोर ह्या साधेपणीही
दिसे वस्तू निद्रेत जागेपणीही
उगी का वाण्याचे बील वाढते
कधी बोका पाहतो का बडग्याला
पती न्याहळी का कधी शेजारणीला
लाटणे घेऊनी मी सदा राहते
(चू भू द्या घ्या )
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त...
मस्त...
केदार, स्वानुभव नाही ना?
विनय
केदारा
केदारा ..मस्तच रे ....
लाटणे से बचके रहना रे बाबा
मस्त रे
मस्त रे केदार...
मला
मला शीर्षकावरुन विडंबन भाजीपाल्यासंबंधी असेल असे वाटले होते.
केदार
केदार पहिली दोन कडवी मस्त झाली आहेत. तिसरे तेवढेच बघितले (किंवा विडंबनाचा विषय तो असता ) तर चांगले आहे, पण तुझा विषय बायकोचे खर्च करणे हा असल्याने विसंगत वाटते.
खुSSSSप छान
खुSSSSप छान विडंबन!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
केदार छान
केदार छान विडंबन.. कुणीतरी बरच कापलेलं दिसतय!
धन्यवाद
धन्यवाद विनय, अथक, सँटीनो, रुनी, अमोल, नयना, भावना और बाकी सब पढने वाले (ऑल इंडीया रेडीयो सटाईल)
विनयदा : स्वानूभव नाय
अथक : आज्ञा प्रमाण गुरुजी
मला
मला शीर्षकावरुन विडंबन भाजीपाल्यासंबंधी असेल असे वाटले होते. >>> मला मासे आठवले

चांगलं आहे विडंबन... कितिला कापलं मग ?
डॅफ पक्की
डॅफ
पक्की मासेखाऊ वाटत 

अजून कापणारी नाय्ये
केदार,
केदार, धम्माल लिहिलयस
*
मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर - "माझं एक स्वप्न आहे की, एक दिवस माझी चार छोटी मुलं अशा राष्ट्रांत राहतील की जिथे कातडीच्या रंगावरुन नाही तर शीलसंपदेवरुन त्यांची पारख केली जाईल."
झक्कास रे
झक्कास रे केदार!
मस्त!
ही लोक स्वानुभव का स्वानुभव का असे का विचारतात?????
सरळ सरळ सान्गाव की माणसान, आपण समदु:खी आहोत म्हणून!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
एक नंबर
एक नंबर केदारा, मजा आली रे!!
(मुळ गाणं माझं फार्फार आवडतं, त्यामूळे मी चालीत पण म्हणलं रे.. :))
सरळ सरळ सान्गाव की माणसान, आपण समदु:खी आहोत म्हणून! >>>
--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!
लिंबूदा
लिंबूदा

धन्यवाद लिंबूदा साजीरा आणि अश्विनी
मस्त.. पण
मस्त..

पण अमोलशी सहमत.. कडव तेही जमलयं, पण कवितेत विसंगत वाटतेय.. ह्यावर दुसरे होऊन जाऊ दे.. विडंबन रे..
धन्यवाद
धन्यवाद अनघा
केदार,
केदार, क्लासच...
अजुन काही येऊ दे.
----------------------------------------------------------------
है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
धन्यवाद
धन्यवाद अनघा

दूसर लिहीलय ना भोंडला