Submitted by नवनाथ राऊळ on 16 June, 2015 - 13:34
गा दीनदयाळा । सख्या विठुराया ।
आता भेट द्याया । धांव बापा ॥१॥
स्थिरचर सारे । खिन्नसे भासती
निस्तेज दिसती । चंद्र सूर्य ॥२॥
नको पांहूं अंत । जीव कासावीस ।
व्याकुळ भेटीस । पंचप्राण ॥३॥
नाथ म्हणे प्रभो । येकचि पै आस ।
चित्ती हाचि ध्यास । दर्शनाचा ॥४॥
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती आर्तता भरून राहिलीये
किती आर्तता भरून राहिलीये .......
अशी तळमळ, अशी व्याकुळता पाहिजे ...