नमस्कार मायबोलीकर्स..
ध्वनी प्रदुषणामुळे होणार्या त्रासाबद्दल सल्ला हवा आहे.
माझा एक शेजारी आहे, तो वारकरी आहे. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण तो डोक्याने बर्यापैकी सरकलेला आहे.
तो आणि त्याचे कुटुंबीय सकाळी ४ ते ७ आणि रात्री २-३ तास (वेळ ठरलेली नसते पण ६ ते १० ह्या वेळेत कधीही) जोरजोरात टाळ वाजवुन 'इठ्ठला'ची भक्ती करत असतात. शिवाय दिवसाही जर वेळ मिळाला तरी कधीही टाळ वाजु शकतात.
एक दोन वेळेस समजाउन सांगितल की बाबारे घरी आइ आजारी असते, माझी लहान मुलगी ह्या आवाजाने झोपु शकत नाही, शिवाय शेजरी एक मुलगी ह्या वर्षी दहावी ला आहे, ह्यानंतर थोडे दिवस त्रास कमी झाला परंतु आता पुन्हा नव्या जोमाने टाळ कुटणे सुरु झाले आहे. ह्या वारकर्याच्या फेबु वर मेसेज केला की मी पोलिसात तक्रार करेन म्हणुन पण काही फायदा झाला नाही.
माझे काही प्रश्न आहेत.
१. ही तक्रार पोलिसात करता येइल का? पोलिस दखल घेतिल का? (घेतिल असे वाटत नाही कारण त्यांच्याकडे इतर भरपुर महत्वाच्या केसेस असताना ह्या किरकोळ गोष्टीसाठी वेळ देणे अवघड आहे)
२. पोलिसांशिवाय इतर ठिकाणी ही तक्रार करता येइल काय? जसे की मनपाचे पर्यावरण अधिकारी?
२. तो त्याच्या घरात टाळ वाजवत असतो, ह्याला मी आक्षेप घेउ शकतो का? कायदा ह्या बाबतीत काय सांगतो हे माहित करुन घ्यायला आवडेल.
३. कायदेशीर बाबीत गुंतणे आणि तेवढा वेळ देणे आर्थिकदृष्ट्या आणि वेळेबाबत किती महागात पडेल?
४. टाळाचा आवाज बर्यापैकी जास्त आहे (तो बहुतेक मोठे टाळ वाजवत असावा) परंतु कदाचित कायदेशिर डेसिबल लिमिटमध्येच असावा, डेसिबल मोजण्याचा प्रयत्न डिबी मिटर अभावे अजुन तरी केलेला नाही.
५. ह्या कृत्या मध्ये त्या घरच्या स्त्रियाही असतात त्यामुळे हाणामारी करुन शकत नाही.
मायबोलीकरांना योग्य सल्ला आणि उपाय सुचवण्याची नम्र विनंती
रश्मीताई म्हटल्या तसा झांजा
रश्मीताई म्हटल्या तसा झांजा वाजवणे हा उत्तम उपाय दिसतोय. पण त्यासाठी भांडणे करावी लागतील.
ऑनेस्टली. मलाही प्रचण्ड त्रास होतो आवाजाचा. हे उपाय करता येतात का बघा:
१.
आपोआप टाळ कुटणे कमी होईल.
त्यांच्या घरच्यांना हळूहळू भीती दाखवणे सुरू करा, की ह्याची देवभक्ती फारच वाढू लागलेली आहे, कधीतरी विरक्ती येऊन संन्यास घेऊन जाईल घर सोडून.. त्या बाबालाही एन्करेज करा जरा संन्यास घेण्यासाठी.
२.
दुसरा काहीही इलाज चालला नाही, तर "आवाजाने वेड लागायची पाळी आली आहे. या वेडाच्या भरात मी तुमच्या दारासमोर आत्मदहन करणार, अन चिठ्ठीत तुमचे नांव लिहून जाणार." असा एक फ्लेक्स छापून दारासमोर लावा. आषाढी येतेच आहे, तो मूहूर्त ठेवा. जवळपासच्या पत्रकार लोकांना इंटीमेशन देऊन ठेवा.
नाहीच ऐकले तर त्यान्च्या
नाहीच ऐकले तर त्यान्च्या कानाखाली ध्वनी प्रदुषण करा आता.
नाहीच ऐकले तर त्यान्च्या
नाहीच ऐकले तर त्यान्च्या कानाखाली ध्वनी प्रदुषण करा आता.
>>
अहो तुमचे नाव काय . शरीरयष्टी काय अन तुम्ही सल्ला काय देताय ? ::फिदी:
शरीरयष्टी ? त्याचा नावाशि काय
शरीरयष्टी ? त्याचा नावाशि काय सम्बन्ध?
खरंतर भजनवाल्यांनीच त्यांच्या
खरंतर भजनवाल्यांनीच त्यांच्या घराची दारे-खिडक्या soundproof करायला हवीत व त्या बंद ठेऊन भजनं करायला हवीत.
शुभेच्छा.
Pages