छत्रपति शिवाजीराजे यांना माझे काही प्रश्न....???
जय शिवराय !
शिवभक्तांनो,
छत्रपति शिवाजीराजे यांना माझे काही प्रश्न ....
राजे तुमचा राज्याभिषेक कधी करावा ?
राजे तुमची जयंती कधी करावी ? म्हणजे तिथीनुसार की आग्लं तारखेप्रमाणे ?
तुम्हीचं ते का नाही कोठे लिहून ठेवले नाही ?
बघा ना केवढे वाद होत आहेत ?
जो तो एकमेकांच्या उरांवर चढून आमचंच बरोबर कसे, असं म्हणू लागला आहे .
राजे तुमचा इतिहास आम्ही कसा मानू ?
तुमच्या हिरोजी इंदूलकरांनी जगदिश्वराच्या नगारखानाच्या बाजूला लावलेल्या शिलालेखात तिथी मांडली आहे ती मानू ? की हेन्री ऑक्झिँडनने लिहिलेली डायरीची पानं महत्वाची मानू ? हिरोजीने जेजे त्या शिलालेखात लिहिलं आहे तेते सत्य मानावे ? की आजच्या नविन इतिहासाकारांनी तुमचा इतिहास त्यांना हवा तसा लिहिला हे सत्य मानू ?
राज्याभिषेकाचा वाद नविन म्हणजे आता गेले चार पाच वर्षापासून चालू झाला आहे,
यात मी पडावे की त्रयस्थ राहून तुमच्या नावाने चाललेलं हे घाणेरडे राजकारण बघत बसू ?
राजे, तुमच्या जयंती आणि राज्याभिषेकालाच वाद का होतो ?
की तो जाणूनबजून केला जातोय ?
कारण तुमच्या आणि शंभूराजेंच्या पुण्यतिथीला वाद होत नाही .
राजे , असं तर नाही ना , की जयंती आणि राज्याभिषेकाला धांगडधिँगा करायला मिळतो , हवं तसं वागता येतं आणि हो वर्गणी काढून पैसे गोळा करता येतात ?
राजे, आता तुम्हीच मला मी काय करु ?
तुमच्या नावाने चालत असलेलं राजकारण उघड्या डोळ्याने पाहत राहू ? की याला विरोध करु ?
शिवभक्ती करत असताना कोणती तरी एक बाजू पकडलीच पाहिजे काय ?
राजे , आता मात्र तुम्ही मला सामोरे येऊन माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजे !!
राजे, मी वाट पाहतोय.....!!
आपला शिवभक्त
शिव-दुर्गप्रेमी वांद्रे
ह्म्म्म, काही उपयोग नाही हो,
ह्म्म्म, काही उपयोग नाही हो, चांगले विचार, कार्य, इ. करण्याऐवजी दुष्ट निच हालकट राजकारण, स्वार्थकारण करण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत.
सच्च्या शिवभाक्तांनी
सच्च्या शिवभाक्तांनी स्वता:शोध घेऊन या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे .
अर्धी उत्तरे तुमच्या प्र्श्नांतच आहेत.
सुरेख१ +१
सुरेख१ +१
सर्व महापुरुषांच्या जयंत्या /
सर्व महापुरुषांच्या जयंत्या / पुण्यतिथ्या फक्त आणि फक्त स्वच्छता दिन म्हनुन साजर्या करा. नो मिरवणुका नो धांगड्धिण्गाना. मग ऐकाच महापुरुषाच्या हवे तेव्हड्या वेळा साजर्या करा. तिथीप्रमाणे करा, इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे करा आणि हवे असल्यास अजुन मायन कॅलेंडरप्रमाणेपण करा....
गुड आयडीया सुशांत
गुड आयडीया सुशांत
गणेश जी, मुळात असे प्रश्न
गणेश जी,
मुळात असे प्रश्न महाराजांना करणेच चुकीचे आहे हे सर्व प्रथम नमूद करावे वाटते.
तुम्हीचं ते का नाही कोठे लिहून ठेवले नाही ? >> कारण त्यांना ह्याची गरजच वाटत नव्हती, आणि ज्याची गरज होती ती आज्ञापत्र (सामान्य रयतेच्या काळजी पोटी) त्यांनी लिहिली, किती लोकांनी ती वाचली आणि त्याचा पालन करतात. घराच्या दिवाणखाण्यामध्ये, दुकानामध्ये, सरकारी कार्यालयात हे भले मोठे छायाचित्र लावला कि झाला अस नाही ना. पण एकदा का एखाद्याला देवपण दिले कि सांगायला सोपा जाता 'अवतारी पुरुष होते म्हणून जमलं, आपल्याला नाही जमणार अस काही करायला आपण साधी माणसं'.
बाकी शिव प्रेमाची आठवण फक्त 'जयंती, पुण्यतिथी किवा राज्याभिषेक दिनालाचा' का येते?
वर्गणी काढून पैसे गोळा करता येतात ? 'वर्गणी' हा फार साधा शब्द वापरला 'खंडणी' म्हणा हव तर अश्या स्वरात मागतात, अर्धा तास काहीतरी कार्यक्रम करतात मग देशी/विदेशी लाऊन पडतात.
तारीख आणि तिथी चा वाद सोडा हो … विचार करायचा तर त्यांच्या आणि ज्ञात -अज्ञात शूर वीरांच्या पराक्रमाचा करा, दूरदृष्टी चा करा, नाविन्यचा करा, शुद्ध चारित्र्याचा करा, त्यांच्या सारखा निर्व्यसनी आणि सुदृढ शरीराचा करा, जाती पातीच्या उच्चाटनाचा करा ह्या वर वाद -विवाद करा.
बघा जमता का , महाराजांना कुठे तरी बर वाटेल.
सर्व महापुरुषांच्या जयंत्या /
सर्व महापुरुषांच्या जयंत्या / पुण्यतिथ्या फक्त आणि फक्त स्वच्छता दिन म्हनुन साजर्या करा. नो मिरवणुका नो धांगड्धिण्गाना. मग ऐकाच महापुरुषाच्या हवे तेव्हड्या वेळा साजर्या करा. तिथीप्रमाणे करा, इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे करा आणि हवे असल्यास अजुन मायन कॅलेंडरप्रमाणेपण करा ++++११११११११११११
हे राजांना विचारण्यापेक्षा
हे राजांना विचारण्यापेक्षा त्यांच्या सो कॉल्ड कार्यकर्त्यांना विचारा ना....
नुसते गाडीवर मागे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या चे स्टीकर लावायचे, नुसते भगवे झेंडे घेऊन नाचायचे, येता जाता जय जिजाऊ, जय शिवराय म्हणत रहायचे आणि शिवभक्तीच्या नावाखाली माजोरीपणा करायचा हीच दुर्दैवाने आजच्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. महाराजांचा अपमान जितका हे लोक करत असतील तितके अजून कुणीही करत असेल असे मला वाटत नाही.
पावले तुमच्या सारखा सक्रिय
पावले तुमच्या सारखा सक्रिय शिवभक्ति आजच्या काळात विरळाच.. तुमची कळकळ लक्षात येतेय ..
बऱ्याच अशा गोष्टी आज आपल्या समाजात आहेत ज्याला आपल्या सारख्या सामान्य माणसाकड़े पर्याय नाही .. त्या सोडून देणे आणि आपल्या परीने जे जे योग्य आणि समाजोपयोगी वाटते ते ते करणे इतकेच आपण करु शकतो नाही का ..
आणि समजा राजे असते तर त्यांना या तारखांच्या गोंधळाचे फारसे वाइट वाटले नसते पण त्या तारखांवर जो गोंधळ घातला जातो त्याबद्दल नक्कीच वाइट वाटले असते ..
त्यामुळे तारखांच्या गोंधळात पडण्यापेक्षा काय उपयुक्त उपक्रम राबवता येतील जे पाहून महाराजांना बऱ वाटेल याचा विचार व्हावा असे मनापासून वाटते ...
सुशांत +१
सुशांत , आशु आपला प्रतिसाद
सुशांत , आशु आपला प्रतिसाद आवडला.
गाडीवरच काय हातावर, कुठे छातीवर 'क्षत्रियकुलावतंस' 'सिहासनाधीश्वर' असे काय काय लिहितात, बर ह्या शब्दांचा नीट उच्चार हि करता येत नाही, हि भली मोठी राजमुद्रा कोरतात आणि वाचायच्या नावा ने शिमगा. हा त्यांचा वयक्तीक मुद्दा जरी असला तरी असले बह्द्दार पब/बार अजून कुठे कुठे जाताना बर महाराजांचा अपमान होत नाही का ह्यांचा हातून (सर्वजण जात नसतील हि पण काही 'हिरे' जातात).
इतक्या आवेशाने वर्गणी मागता, जयंती/पुण्यतिथी/राज्याभिषेक करता, तितक्या आवेशाने गड-किल्यानासाठी का नाही लढत, आवाज उठवत. महाराजांची खर प्रेम केल केला ह्या गड-किल्ल्यांवर, त्यांची आजची अवस्था बघून नाही भांडणार, तेव्हा नाही म्हणणार कि तिथी किवा तारीख काही असू एखाद्या किल्ल्यावर जाऊ श्रमदान करून काही तरी करू, गरज पडल्यास दोन्ही वेळी जाऊ. का फक्त शिवनेरी आणि रायगड केला कि झाला? नुसता बाजार आणि कचरा मग प्रश्न पडतो कि हे शिवतीर्थ / उर्जातीर्थ/पावनतीर्थ आहे कि कचराकुंडी. मी मी म्हणणारे कार्यकर्ते कचरा करताना दिसतात गडावर ह्याचा वाईट वाटत.
नुसता घोषा लावायचा 'जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी' अरे हे लोक आहेतच वंदनीय. नाव घेऊन काय होणार आहे? संभाजी महाराजांसारखी तब्येत करा न, शिवाजी महाराजांसारखा अष्टपैलूपणा दाखवा न, जिजाऊ मासाहेबासारखा सारखा आपल्या घरातील आई/बहिण/मुलगी ह्यांना तयार करा न . इथे नाही वाद घालणार ……… वाद काय तर तारीख कि तिथी
..
..
मुस्लिम वस्तीत राहत नसलो तरी
मुस्लिम वस्तीत राहत नसलो तरी या सगळ्या काळात काय होतं हे अनेकवेळा मुस्लिम एरीयातून गेल्यामुळे जवळून पाहिलेलं आहे.
नो मिरवणुका नो
नो मिरवणुका नो धांगड्धिण्गाना.
हे राजकारण्यांना सांगता? कैच्च्या कैच्च!!
त्यांना वाटले तर ते लूट भरलेल्या कुत्र्याइतकी लायकी नसलेल्या गुंडाचा वाढदिवस म्हणून खंडणी गोळा करणे, दंगा करणे असे करतील.
शिवाजीचे नाव घेऊन खंडणी वसूल करणार्या, लोकांना उपद्रव देणार्यांना माझा एकच सल्ला आहे.
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे मुस्लिम मुलुखात जाऊन खंडणी गोळा करा, तिथे मिरवणूक काढा.
आता उरलेल्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी लोकांनी यांना धरून भर मुस्लिम वस्तीत नेऊन तिथे मिरवणूक काढायला लावा, कमीत कमी १०, ००० रु. खंडणी गोळा केल्याशिवाय बाहेर येऊ देऊ नका.
अहो हे पुचाट षंढ लोक. हे कसले शिवाजी प्रेमी?
शिवाजी महाराजांना कसले प्रश्न
शिवाजी महाराजांना कसले प्रश्न विचारता?
तत्कालीनच काय तर आजच्या काळाला लागु पडतील अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी देऊन ठेवली आहे.
शिवशक त्यांनी सुरु केले आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर सुरु झालेले भारतीय सौर दिनांक कशाला आहे ?
जयंत्यांच्या तारखांचे वाद राजकारणी लोक मुद्दाम सुरु करतात. आपली पोळी भाजायला.
सर्वांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवा.
मित्रहो, सध्याची माझी बौद्धिक
मित्रहो,
सध्याची माझी बौद्धिक परिस्थिती फारच द्विधा मनस्थितीत आहे.
काय आहे ना…. कि राजेंना आपल सर्वस्व मानले….
तर जीव तीळ तीळ तुटतो सध्याची परिस्थिती पाहून
काही ढोंगी वृत्तीचे लोक
राजांना जातीत विभागून… आपापला स्वार्थ सांभाळून व्यावसायिकपणा जोपासत आहेत
हे पाहिलं कि तळपायाची आग मस्तकात जाते
तारीख तिथीला कधीच विरोध नाही
अवश्य…. सोहळे साजरे करा. पण संस्कृतीच रक्षण करूनच…
म्हणे बाप माझा वसे पंढरीत
आई राहते नित्य तुळजापुरात
तया दर्शनाशी आसुसलेला
मराठा म्हणावे अशा वाघराला
सर्वप्रथम महाराजांना देव
सर्वप्रथम महाराजांना देव बनवायचं सोडा. एकाने कोणीतरी आरती पण रचली आहे आणि तुम्हीही ती अगदी हिरीरीने म्हणत असणार याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
एका धाग्यावर मी तुम्हाला पेब वर झालेल्या अतिक्रमणाबद्दल विचारले होते होते त्यावेळी काहीही उत्तर दिले नाहीत. कारण तुम्हाला अभिप्रेत असलेल्या किल्ले संवर्धन अंतर्गत अशीच अतिक्रमणे अभिप्रेत आहेत अस दिसतंय.
पेब वर झालेल्या
पेब वर झालेल्या अतिक्रमणाबद्दल ???????
अतिक्रमणाविरोधात सर्वांनी एकजुटीने उभे राहणे गरजेचे आहे… भविष्यात हे असच सुरु राहील
सर्वप्रथम महाराजांना देव
सर्वप्रथम महाराजांना देव बनवायचं सोडा....
+१११११११
त्यांना ऐकदाच देव बनवल की आपण मोकळे हव तस वागायला.
गुन्हा करणा-याबरोबर गुन्हा
गुन्हा करणा-याबरोबर गुन्हा पाहणारा आणि सोसणारा हाही तितकाच दोषी असतो.
अशा खंडणी मागत फिरणा-या कार्यकर्यांना हाकलून द्या, थोडा त्रास होईल पण तेवढे कराच..
मात्र काही ठिकाणी अशा जयंत्या साज-या करताना काही सामाजिक कार्ये केली जातात.मिरवणूक काढणे, जयंती साजरी करणे यात गैर काहीच नाही. त्यात ढोल ताशांचा गजर असावा , डीजेचा फालतूपणा नको. महाराजांचे किंवा इतर महापुरुषांचे विचार आत्मसात न करता या गोष्टी करणे चूकीचेच.
किरण जी, ताज उदाहरण देतो १४
किरण जी,
ताज उदाहरण देतो १४ मे ला संभाजी महाराज जयंती च्या आधी ३०-४० जनाचा एक टोळक आमच्या इथे आला.
एक जण - पट्टी द्या ५०१/-
आम्ही - कसली पट्टी ??
एक जण - (वरच्या स्वरात ) माहित नाही का संभाजी जयंती आहे
आम्ही - ठीक आहे पण ५०१/- खूप आहे.
एक जण - मग काय ? महागाई खूप झाली आहे खूप खर्च असतो.
आम्ही - ५०१ नाही १००१ देतो, जरा संभाजी महारान्जाविषयी थोडी माहिती द्याना. बर मागच्या वर्षीचा काही ताळेबंद आहे का? तुम्ही घेऊन जाणार परत तिथी वाले येणार, आम्ही काय तुमचे च खिसे भरायचे का?
काही न बोलता हि मंडळी निघून गेली (मिरवणुकीत बघून घेऊ असा दम देत)
गणेश पूर्वी जी राजेशाही होती
गणेश पूर्वी जी राजेशाही होती त्यात 'बळी तो कान पिळी' हे स्पष्ट होते. शिवाजी महाराज पराक्रमी होते, मुत्सद्दी होते त्यांनी बलाढ्य अशा मुघल सेनेला टक्कर देवून स्वराज्य स्थापन केले हा इतिहास जवळपास सारेच जण जाणतात.शाळेत इतिहासात महाराजांबद्दल सविस्तर लिहिलेले आहे.
बर्याच जणांना इतिहासातील वरवरची माहिती असते मीही त्यातीलच एक तुम्ही इतिहासाचे जाणकार आहात तुम्ही महाराजांनी स्वराज्य स्थापन झाल्यावर जनतेला सुखी ठेवण्यासाठी काय केले, महाराष्ट्राचा कश्या प्रकारे विकास केला, रस्ते, दळणवळण सुविधा, व्यापार, व्यवसायवृद्धी ह्यासाठी काय काय पावले उचलली, त्यांच्या काळात लोकांच्या जीवनमानात कसा आमुलाग्र बदल घडून आला, ग्रामविकास त्यांनी कसा राबवला ह्या विषयीची काही माहिती आपण दिली तर आमच्या सारख्या अज्ञानी लोकांना महाराजांचे खरे कर्तुत्व खर्या अर्थाने कळून येईल ह्याबद्दल आशा वाटते
सचिन पगारे .. जी नक्कीच
सचिन पगारे .. जी
नक्कीच प्रयत्न करीन....
पगारे>> +१
पगारे>> +१
पगारे बुवा - अहो आश्चर्यम् !
पगारे बुवा - अहो आश्चर्यम् ! आपल्या मताशी आम्ही १०१% सहमत !
सूनटून्या जी आपण शिवाजी
सूनटून्या जी आपण
शिवाजी महाराजांच्या "जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया" या आरती बद्दल बोलत असाल तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली आहे. आणि ती अगदी समर्पक आहे.
पगारे>> +१
पगारे>> +१
तोफखाना यांच्या प्रतिसादाशी
तोफखाना यांच्या प्रतिसादाशी ,(विशेषतः पहिला) सहमत.
मुळात असे प्रश्न महाराजांना करणेच चुकीचे आहे हे सर्व प्रथम नमूद करावे वाटते. >>> मनातलं बोललात.