किती जणांनी गेल्या कित्येक दिवसाता वाढत वाढत जाणार्या उष्माघाताच्या बळीची संख्या ऐकली/ वाचली आहे ? काल पर्यंत हि संख्या सुमारे २५०० च्या आसपास होती.
या प्रकारची आकडेवारी गोळा करणे, दररोज ती प्रसिध्द करणे आणि त्यावर काहीच उपायोजना न झाल्याचे दिसणे हा एक चमत्कारीकच प्रकार म्हणावा लागेल.
या आधी ( मी नेहमीच वर्तमानपत्र वाचतो / दुरदर्शनच्या बातम्या पहातो ) अशी आकडेवारी प्रसिध्द झाल्याचे किंवा इतका आकडा गाठल्याचे स्मरणात नाही. या बातमीतला विशेष उल्लेख म्ह्णजे २५०० पैकी किमान १५०० उष्माघाताचे मृत्यु हे आंध्रप्रदेशातील आहेत.
ही आकडेवारी मागील काही वर्षांच्या आकडेवारीशी अजिबात पडताळुन पाहिली जात नाही. फालतु कारणावरुन पेटुन उठणारा मिडीया या बातमीच्या मागे जात नाही. यावरुन तरी बातम्या पॅकेजच्या माध्यमातुन शोधल्या जातात असे दिसते. कशाला जा आंध्रप्रदेशात ? तिथे गेल्याने ना कोणा राजकीय पक्षाचे पॅकेज मिळत ना कोणी इंड्रस्ट्रीयलिस्ट ची लॉबी आहे ज्याच्या वृत्ताकंनामुळे कुणालातरी फायदा होणार आहे ? असा काहीसा पत्रकारांचा दृष्टीकोन असल्याचे भासते.
मला ह्या बातम्या वाचुन दु:ख आणि खेद दोन्ही झाले की आमच्या कडे सामान्य यंत्रणा नाही जी असे मृत्यु टाळु शकेल. चॅनलवर याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार होत नाही की काय काळजी घ्याल. या मृत्युचेकोणलाही सोयर -सुतक नाही इतकी प्रशासकीय दुरावस्था आहे का ?
त्यातले खरे किती उष्माघाताचे
त्यातले खरे किती उष्माघाताचे बळी आहेत याबद्दल शंका आहे.http://indianexpress.com/article/india/weather-india-2/2000-heat-wave-de...
उष्माघात टाळण्यासाठी काय काय
उष्माघात टाळण्यासाठी काय काय करता येईल याचीही चर्चा झाली तर उत्तम.
नितीनचंद्र, तुम्ही म्हणता ते
नितीनचंद्र,
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.
उष्माघात या आजाराला योग्य कवरेज मिळत नाहीये.
(जसं स्वाईन फ्लू ला मिळालं)
कारण बर्याचदा याला बळी पडणारे अर्यंत गरीब लोक असतात.
ही सध्याची हीट वेव्ह जगातल्या इतिहासातली पाचवी आणि भारतातली दुसरी प्रचंड मोठी हीट वेव आहे.
भारतात अजूनही प्रशासकीय पातळीवर 'उष्माघात' असे कॉज ऑफ डेथ ' किंवा 'डाय्ग्नोसिस ऑफ डिसीज' द्यायला का कू केली जाते. (ज्याची कारणे इथे नाही लिहू शकत)
तर, मी तेलंगणाच्या सीमेवरच रहाते आणि इथल्या दोन जिल्ह्यांचा पेशंटचा ड्रेनेज एरिया आमच्या कर्नाटकात येतो.
हे बळी उष्माघाताचेच नाहीत तर सामाजिक विषमतेचे आहेत, आर्थिक माजोरीचे आहेत, अंधश्रद्धांचे आहेत आणि अर्थातच अपूर्या सोयीसुविधांचे आहेत.
पुस्तकात लिहिल्यासारखा टिपीकल उष्माघाताचा पेशंट कदाचीत नाही दिसणार आपल्याला (म्हणूनच हा उष्माघाताचा बळी कशावरून? असे विचारण्याचे धैर्य राजकीय लोक करतील)
मूळात असलेले आजार अधिक घातक होतायत.
अति तापमानामुळे किडनी , लिव्हर आणि ब्रेन यातील रासायनिक घटक योग्य काम करित नाहीत. मग जे अगोदरच यांच्या आजाराने बाधित आहेत ते याहून जास्त सिरीयस होतात.
आज माझ्याकडे अॅडमिट असलेल्या अश्या प्रकारच्या पेशंटसची उदाहरणे देते
-
१. बांधकाम मजूर- उन्हात काम, आधीचाच दमा वाढलाय, इन्फेल्शन, १०४ ताप
२. डायबेटिसचा पेशंट- उन्हात फिरून काम करताना इन्स्युलिनच्या बाटलीतलं इन्स्युलिन डिनेचर झालय, तसंच घेऊन ५५०ब्लड शुगर, ताप १०४. इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स
३. शिक्षक- कुलदेवताच्या पूजेसाठी एक दिवस उपास आणि उन्हातून अनवाणी फिरले, पोटॅशियम अत्यंत कमी होऊन सरळ हृदयावर परिणाम,हातापायांत कणमात्रही शक्ती नाही. (सिवीअर हायपोकॅलेमिया)
आता हे सगळेच पेशंट उष्माघाताचे बळी म्हणून नोंदविले जाणार नाहीत.
(अजून थोड्यावेळाने लिहिते..)
थँक्स साती.. अजुन लिही नक्की.
थँक्स साती.. अजुन लिही नक्की.
सातीजी, धन्यवाद, हा प्रकार
सातीजी,
धन्यवाद,
हा प्रकार म्हणजे मधे सत्तेवर असताना शरद पवार साहेबांनी शेतकर्यांच्या आत्महत्येसंदर्भात केले तसे आहे. पवार साहेब म्हणाले होते की शेतीत अपयश हे एक कारण आहे ज्याच्या बरोबर सामाजीक - कौटुंबीक कारणे सुध्दा आहेत.
उष्माघाताच्या बळीचे असेच आहे हे डॉक्टर म्हणुन आपण उदाहरणासहीत लिहीता आहात. यावर विवीध कारणांनी नियंत्रण साधणे कठीण दिसते. पण २५०० मृत्यु ज्यात अनेक कारणांपैकी उष्माघाताने ही कारणे अॅग्रिव्हेट होतात ही बाब लक्षात घेऊन त्यावर उपाय योजना करणे गरजेचे वाटते.
नितीनजी, उष्णता हेच जर मुख्य
नितीनजी,
उष्णता हेच जर मुख्य कारण असतं तर आखाती देश, वाळवंटे इथे उष्माघाताचे कित्येक पेशंटस पहायला मिळाले असते.
मुख्य कारणे गरिबी आणि सामाजिक विषमता तसेच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ही आहेत.
म्हणजे जिथे मी रहाते तिथे ४५ आणि अबोव्ह तापमान असूनही मला हा त्रास होत नाही आणि बाजूच्याच गरीब मजूराला का होतो?
मी शक्यतो उन्हात बाहेर पडत नाही, दुपारच्या वेळी इनडोअर रहाते.
एसी/कुलर लावते.सतत पाणी पिते.
म़जूराला ज्याने दिवसभराची मजूरी देऊन कामावर ठेवलंय तो काही १२ ते ५ आराम करू देणार नाही, त्याच्या थंडाव्याची सोय करणार नाही. अगदी पाण्याचीही सोय करत नाहीत मालक लोक.
शेतात उन्हाळी कामे करणार्या लोकांना पावसाळा होण्यापूर्वी स्वतःची कामे संपवायचीत त्यामुळे स्वतःच स्व्तःचे मालक असले तरी हे लोक घरी थांबत नाहीत.
बर्याच विकसित देशांत हीट वेव येते तेव्हा वर्किंग अवर्स सक्तीने बदलायला लावतात.
थंडाव्याचे निवारे जागोजागी उभारतात ज्यायोगे ज्यांचे घर थंड राहू शकत नाही ते दुपारच्या काळात तिथे आसरा घेऊ शकतात.
घर थंड ठेवायचे विविध सोपे आणि साधे उपाय अॅडवोकेट करतात.
आपल्या देशात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो पाण्याच्या उपलब्धतेचा.
इतक्या हीटवेवमध्ये योग्य प्रमाणात पाणी आणि क्षार शरीरात जायला हवेत.
पण मुळात उन्हाळ्यात पाणीच उपलब्ध नसते बर्याच ठिकाणी.
असले तरी सगळ्यांना अॅप्रोचेबल नसते.
इकडेही जातीपातीचे बरेच प्रस्थ असल्याने प्रत्येकाला उपलब्ध पाणी घ्यायची परवानगी असेलच असे नाही.
टँकर वगैरे मागवायला गोरगरीबांकडे पैसे नसतात.
बाहेर फिरताना एखादा पैसेवाला सहज पॅकेज्ड ड्रिन्किंग वॉटर विकत घेईल.
गरीबांना पाणपोया शोधत बसाव्या लागतात.
(अजून लिहिते...)
साती, असले काही लिहित जाऊ
साती, असले काही लिहित जाऊ नकोस काळजाला घर पडतात.
आपण काहिच करु शकत नाही याची तिव्र वैष्यम वाटते.
बापरे ! औघड परीस्थिती आहे हि
बापरे ! औघड परीस्थिती आहे हि ...
वाईट वाटतय वाचून
तिथल्या राज्य सरकारांनी काहीच केलं नाही का अजून .?
आपण काही करू शकतो का.?
सुरेख१ +१
सुरेख१ +१
राज्यशासनाचा एक भारी उपाय
राज्यशासनाचा एक भारी उपाय आहे.

सरकारी ऑफिसेसची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन करतात.
त्यामुळे दोन वाजता तळतळत्या उन्हात गावोगावच्या लोकांना घरी परतावे लागते.
टँकरने पाणीपुरवठा थोडाफार करतात.
पण जे स्वतःहून , गरिबीपायी उन्हात तडफडत काम करतात त्यांच्यासाठी सरकार काय करू शकेल असे वाटत नाही.
पुन्हा लोकांचे देवदेव, लग्नंकार्यं भर उन्हात असतात.
त्याला लोक उघड्या टेंपो, ट्रकातून फिरतात आणि उष्माघाताचे बळी होतात.
भर मांडवातून नववधू डायरेक्ट हॉस्पिटलात तापाने फणफणत येतायत.
प्रबोधन करून काही फरक पडेल
प्रबोधन करून काही फरक पडेल का? वगैरे लिहिणार होतो पण विफल / निराश / हताश वाटल्याने काहीच लिहित नाहीये.
सुरेख१ यांच्या लिखाणाशी (व्याकरण सोडून) सहमत
साती, योग्य माहिती. उन्हाचा
साती, योग्य माहिती.
उन्हाचा तडका वाढलाय हे खरे आहे पण त्यापासून बचाव करण्याचे पारंपरीक उपायही केले जात नाहीत. ( डोक्यावर मुंडासे, त्यात कांदे ठेवणे, ताकाचा वापर वगैरे )
आखाती प्रदेशात असे उपाय तर आहेतच पण सततच्या ऊष्म्याने त्यांची शरीरेही त्याला सरावलीत.
आजही तिथले भारतीय कामगार अनेक उपचार करताना दिसतात ( जिर्याचे पाणी, ताक वगैरे सतत पिणे ) आणि सहसा या त्रासापासून स्वतःचा बचाव करतात. असे उपाय करत राहिले तर तिथे वावरणे फारसे त्रासदायक होत नाही, हे मी माझ्या अनुभवावरुन सांगू शकतो.
साती यांनी अत्यंत उपयुक्त
साती यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे.
<<<<उष्णता हेच जर मुख्य कारण असतं तर आखाती देश, वाळवंटे इथे उष्माघाताचे कित्येक पेशंटस पहायला मिळाले असते. मुख्य कारणे गरिबी आणि सामाजिक विषमता तसेच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ही आहेत.>>>>>> हे एकदम शंभर टक्के खरं आहे.
उष्माघाताला आपल्या इथे अत्यंत सामान्य गोष्ट का समजली जाते तेच काही कळत नाही. एवढे बळी जात आहेत तरी फक्त बळींची आकडेवारी प्रसिध्द करण्याशिवाय बाकी काहीच वाचायला मिळत नाही. उष्माघातापासून लोकांच्या संरक्षणासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याची जनजागृती व्यवस्थित केली जाते की नाही हे पाहणे सर्वात महत्वाचे आहे. आणि प्रसिध्दीमाध्यमांनी ती प्रकाशित करणे अपेक्षित आहे पण प्रत्यक्षात मात्र तिथे शुकशुकाट दिसून येतो आहे.
नितिनचंद्र, तुम्ही दिलेली आकडेवारी जर सरकारी असेल तर खरी आकडेवारी याहून जास्त असण्याचीच शक्यता आहे.
नरेश, खरी आकडेवारी याहून खरेच
नरेश, खरी आकडेवारी याहून खरेच खूप जास्त आहे.
कारण मी वर लिहिल्याप्रमाणे इतर छोटासा आजार बळावून त्याने जीव गेला/नुकसान झाले असे बर्याचवेळा भासते.
असो.
आज आणि काल आमच्या भागात बराच पाऊस झालाय.
आणि पुढचे पाच दिवस पावसाचे फोरकास्ट आहे.
बहुदा उष्माघाताचे यावेळचे बळी आता बंद होतील.
साती, उत्तम प्रतिसाद. <<हे
साती, उत्तम प्रतिसाद.
<<हे बळी उष्माघाताचेच नाहीत तर सामाजिक विषमतेचे आहेत, आर्थिक माजोरीचे आहेत, अंधश्रद्धांचे आहेत आणि अर्थातच अपूर्या सोयीसुविधांचे आहेत.>> दुर्दैवी सत्य.
आमच्या लहानपणी ख्रिश्चन
आमच्या लहानपणी ख्रिश्चन मिशनरी चे लोक गोर-गरिब वस्त्या मधुन खेड्या-पाड्यातुन फुकट हातपंप (हापसा)
मारुन द्यायचे त्यातले कितितरी अजुनही चालु आहेत.
हापसा मारायची त्यांच्या संस्थेचिच गाडी असायची.
पण त्या लोकांनाही इथल्या गुंडागर्दी करणार्या लोकांनी हकलुन दिल.
<<हे बळी उष्माघाताचेच नाहीत
<<हे बळी उष्माघाताचेच नाहीत तर सामाजिक विषमतेचे आहेत, आर्थिक माजोरीचे आहेत, अंधश्रद्धांचे आहेत आणि अर्थातच अपूर्या सोयीसुविधांचे आहेत.>> दुर्दैवी सत्य
आमच्या कडे धर्म समजावा म्हणुन वेद्/पुराणे/.उपनिषदे/ दर्शने आहेत पण याच्या मुळाशी असलेली मानवता समजु नये हे किती वाईट आहे. ना संस्क्रुती काम करत ना कल्याणकारी राज्याची संकल्पना असलेले सरकार काम करत. आस्मानी आणि सुलतानी एकत्रच येते म्हणायची.
भारतात मानवी आयुष्याला काहीही किंमत नाही.
नितीनचंद्र, अगदी योग्य धागा
नितीनचंद्र,
अगदी योग्य धागा काढलात !!
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षाचा काळ लोटलाय ,
संपुर्ण भारतीय सामान्य जनतेला वर्षभर पिण्याच पाणी मिळाण्याची सोय झालीय ना टॉयलेटची सोय आहे. भर उन्हाळ्यात पाण्याच अगदीच दुर्भिक्ष झाल तर मग टँकरने पाणी पुरवठा सुरु होतो.
बर सरकार तरी भर उन्हाळ्यात पाणी कुठुन आणणार ?
एक उदाहरण, आता नीट आठवत नाही.
८-१० वर्षांपुर्वी सांगलीच्या कलेक्टर बाईंनी गावा गावात पुर्वी असलेली तळी पुन्हा खणुन काढण्याची नविन योजना राबवली होती. गावा गावात पुर्वापार असलेली ही तळी काळाच्या ओघात आणी सरकारी दुर्लक्षामुळे बुजुन गेलेली होती, ती परत खणुन काढल्याने त्यातले पाण्याचे पाझर परत सुरु झाले, आणी पावसात ही तळी भरुन
वर्षभराची पाण्याची बेगमी झाली, अतिशय यशस्वी झालेल्या ह्या प्रयोगाच पुढे काय झाल हे मात्र कळल नाही,
सरकारी आणी लोकांची अनास्था हेच कारण आहे आपल्या अवस्थेसाठी !!
आपण तहान लागल्यावरच विहीर खणायला सुरु करतो !!