Submitted by विदेश on 25 May, 2015 - 03:10
आमचा पिंटू चित्रकार छान
चित्र काढताना पाठीची कमान ..
जिराफाला असते गेंड्याची मान
उंटाला दिसती हत्तीचे कान ..
भूभूचे शेपूट सरळ असते
हम्माचे शेपूट वाकडे दिसते ..
मोरपिसारा कोंबड्याला असतो
कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो ..
झुरळ असते काढलेले हातभर
मिशा त्याच्या फक्त चिमूटभर ..
इवल्याशा सशाला पाय कावळ्याचे
सिंहाला नेमके पाय बगळ्याचे ..
मुंगीचा डोळा वाघाला दिसतो
घुबडाचा डोळा चिमणीला असतो ..
चित्र रंगवताना डोलावतो मान
म्हणतो स्वत:च "वा वा छान"..
चित्रात भरताना विविध रंग
स्वत:चे भरतो रंगाने अंग
आमचा पिंटू चित्रकार छान
मोठ्ठा झाल्यावर होणार महान .. !
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम गोड कविता आहे. छान.
एकदम गोड कविता आहे. छान.
मंजूषा .. आभारी आहे !
मंजूषा ..
आभारी आहे !
मस्तच!
मस्तच!
सुरेख ...
सुरेख ...
मस्तच...
मस्तच...
चित्रकार पिंटू आवडला!!!
चित्रकार पिंटू आवडला!!!:)
चंबू, पुरंदरे शशांक, सृष्टी,
चंबू, पुरंदरे शशांक, सृष्टी, नरेश माने ...
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार !
मी जेव्हा केव्हा धागा बघतोय
मी जेव्हा केव्हा धागा बघतोय तेव्हा.. पत्रकार चिंटू असंच वाचतोय... चिंटू ची सवय इतकी झाली आहे की पिंटू वाचायला कष्ट पडताहेत..
मस्तय छोटुकली कविता.
मस्तय छोटुकली कविता.
हिम्सकूल, रश्मी.. धन्यवाद .
हिम्सकूल, रश्मी..
धन्यवाद .