उगाचच एकमेकांचे कपल ठरणे अधेमध्ये

Submitted by बेफ़िकीर on 20 May, 2015 - 13:07

उगाचच एकमेकांचे कपल ठरणे अधेमध्ये
किती डसते तुझी माझी सहल ठरणे अधेमध्ये

तुझ्यावाचून जगताना किती सातत्य दाखवले
कसे मंजूर व्हावे.. 'मी सफल ठरणे'.... अधेमध्ये

नसावा हा जमाना तो जिथे ते लोक होते जे
कधीकाळी बदलणे हा बदल ठरणे अधेमध्ये

सदा ह्या उत्तरांना येत पारंब्या सवालांच्या
चुकुन कोडीच कोड्यांची उकल ठरणे......अधेमध्ये

कवी नसतोच मी तर मग तुला जमले कसे असते
सदोदित गद्य असताना गझल ठरणे अधेमध्ये

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवी नसतोच मी तर मग तुला जमले कसे असते
सदोदित गद्य असताना गझल ठरणे अधेमध्ये
>>> हाहाहा... हा बेस्ट आहे Happy

पण कपल, सहल, गझल हेच काफिये असलेली तुमची दुसरी गझल अधिक आवडली...
केतनने त्याला चाल दिली आहे ती...

Happy

केवढे चालणे हे मजल दरमजल....

ही ती गझल आहे.

शेवटचा शेर मजेदार.. Happy

>>कवी नसतोच मी तर मग तुला जमले कसे असते
सदोदित गद्य असताना गझल ठरणे अधेमध्ये<<

हे जाम आवडले बेफी !!

नाही डॉक...

स्वप्न पडले की सफल होते असे नाही
शब्द आले की गझल होते असे नाही

खूप आनंदात दोघे चालले होते
पण तरीही ते कपल होते असे नाही

--------

-'बेफिकीर'!

http://www.maayboli.com/node/29950

ही आहे ती गझल. Happy

correct,,

सदा ह्या उत्तरांना येत पारंब्या सवालांच्या
चुकुन कोडीच कोड्यांची उकल ठरणे......अधेमध्ये

बहोत खूब!!!