हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा
प्रचि ०१
प्रचि ०२
(दोन्ही प्रचि पूर्वप्रकाशित)
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे ठिकाण "दक्षिण काशी" म्हणुन ओळखले जाते. एका बाजुला हरिहरेश्वराचा डोंगर तर दुसर्या बाजुला निळाशार समुद्र यामुळे तीर्थाटन आणि पर्यटन असे दोन्हीही होतात. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख 'श्री हरीहरेश्वर माहात्म्य' पोथीमध्ये आहे. हरिहरनावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरुप या दोन्हींचा संगम झाला आहे. मंदिर जरी समुद्र किनार्यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरा वरुन व समुद्रा मधुन आहे. कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान.
सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे.
(साभारः विकिपीडिया)
केळशी-वेळास-बाणकोट मार्गे हरिहरेश्वरला येताना वेसवी गावातुन "जंगल जेट्टीतुन" गाड्या बागमांडला येथे आणाव्या लागतात. तेथुन हरिहरेश्वर केवळ ४-५ किमी अंतरावर आहे.
वेसवी गावातील जेट्टी
प्रचि ०३
प्रचि ०४
बागमांडला जेट्टीवर वाळुने भरलेला ट्रक उतरताना
प्रचि ०५
प्रचि ०६
श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर (मंदिरात व परीसरात फोटो काढण्यास बंदी आहे.)
प्रचि ०७
प्रचि ०८
हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा
प्रचि ०९
प्रदक्षिणा मार्ग. पाणी आणि वार्याच्या मार्याने डोंगरात साकार झालेले विविध मनमोहक आकार.
(प्रदक्षिणा मार्ग अतिशय धोकादायक असल्याने भरती/ओहोटीचे गणित बघुन (स्थानिकांना विचारूनच) जावे.
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
सूर्यास्त
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
कसे जालः
मुंबईहुनः मुंबई - पनवेल - पेण - नागोठणे (वाकण) - कोलाड - माणगाव - लोणेरे फाटा - गोरेगाव - म्हसळा - श्रीवर्धन (२ किमी आधी) - हरीहरेश्वर.
(अंदाजे १८० ते २०० किमी)
पुण्याहुन पुणे - पौड - मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव - लोणेरे फाटा - गोरेगाव - म्हसळा - श्रीवर्धन (२ किमी आधी) - हरीहरेश्वर.
(अंदाजे १७० ते १९० किमी)
नेहेमीप्रमाणे मस्तच!
नेहेमीप्रमाणे मस्तच!
जबराट चित्र
जबराट चित्र
सुखद चित्र. डोळ्याचे पारणे
सुखद चित्र. डोळ्याचे पारणे फिटले. फार गम्मतशीर दिसतात ते खडक.
फोटो छान .. मी फक्त श्री
फोटो छान .. मी फक्त श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर आणि तीर्थ (कोसाची प्रदक्षिणा) केली आहे .. त्यामुळे नोस्टाल्जिक वाटलं बघून ..
शाळामैत्रिणी चं आजोळ हरेश्वरला आहे .. दहावीत श्रीवर्धन-हरेश्वर अशी ट्रिप ठरवली शाळेची तेव्हा आम्ही सर्व खूप खुष झालो होतो तिच्या आजोळी जायला मिळणार म्हणून .. सकाळी पोचल्यावर खमंग कमी सडीचा लाल तांदूळ वापरून केलेला गुरगुट्या भात, चहा असा नाश्ता केला होता .. ही स्पेशल ट्रीट फक्त आमच्या गृप ला अर्थात ..
मग मंदिरात गेलो आणि तिकडून तीर्थावर .. बाकी तिकडे शाळेतल्या ट्रिपच्या गृप पैकी कोणीच फिरकलं नाही .. मैत्रीणीला सर्व ओळखीचं म्हणून आम्ही गेलो .. पण पायर्या उतरून गेल्यावर सगळं भारीच सॉलिटरी, रिमोट, सुन्सान वाटायला लागलं नी थोड्या घाबरलो .. मग पटापट प्रदक्षिणा पूर्ण करून आमच्या बाकीच्या गृपपाशी आल्यावर बरं वाटलं ..
तुझे फोटो बघून जुनी आठवण झाली ..
खूप सुन्दर! धन्यवाद!
खूप सुन्दर! धन्यवाद!
सुंदर
सुंदर
सुर्रेख फोटोज!!!!
सुर्रेख फोटोज!!!!
एकदम नोस्टाल्जिक. लहानपणी
एकदम नोस्टाल्जिक. लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी श्रीवर्धनला. हरेश्वरला जायचं म्हणजे आजोबा आणि आम्ही पोरं सकाळी उठून भरभर आंघोळी उरकून चालत मग तरीतून आणि मग डोंगर ओलांडून जायचो. बाकी मोठी माणसं मग सावकाश एस्टीनी येत. तिकडे दर्शन घेऊन मग प्रदक्षिणा, मग बागमांडला/ दिघी मिळेल त्या गाडीने श्रीवर्धन आणि मग बग्यामामांच्या खानावळीत गरमा गरम आमटी भात आणि ताजं लोणचं असं जेवण.मग दुपारभर पत्ते किंवा व्यापार किंवा खांबखांब काहीच नाही तर झोपळ्यावर घालवून मग सूर्यास्तापर्यंत समुद्र. अधेमधे आंबा पडल्याचा आवाज आला की बाहेर पळणे. रात्री घरी आल्यावर परत गप्पा, भुताच्या गोष्टी आणि झोप. मज्जेचे दिवस.
सुंदर प्रचि... देखणा निसर्ग
सुंदर प्रचि... देखणा निसर्ग
फोटो खतरनाक आलेत!!! सशलची
फोटो खतरनाक आलेत!!! सशलची गोष्ट वाचून काही फोटोंमधला सुनसानपण जास्त जाणवला :).
एकच शंका - दक्षिण काशी म्हणजे कोल्हापूर ना ?
राजे..फोटो. अ प्र ती म
राजे..फोटो. अ प्र ती म
सुपर्ब प्र चि .... केवळ
सुपर्ब प्र चि .... केवळ क्लाऽस ....
सुंदर!!!
सुंदर!!!
सुंदर एका फॅमिली फ्रेन्डसोबत
सुंदर
एका फॅमिली फ्रेन्डसोबत केलेली धमाल ट्रिप आठवली.
श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवेआगार.
भरभरुन दिलय निसर्गानं.
१९ व्या फोटोत आई नी बाळ सील
१९ व्या फोटोत आई नी बाळ सील दिसत आहेत दगडी शिल्पात.
असो......
जिप्सींचे काढलेले फोटो नी त्यांचा कॅमेरा पळवायला मला कोण मदत करायला तयार आहे ?
सुंदर, मी पण थेट रस्त्यानेच
सुंदर, मी पण थेट रस्त्यानेच गेलो होतो.
१ व २ नंबर खूप आवडले. एक
१ व २ नंबर खूप आवडले.
एक धोक्याच्या सुचना:
जे कधीच गेले नाहीयेत त्यांच्यासाठी व इतरांसाठीही. हरीहरेश्वरचा समुद्रकिनारा हा बाहेरुन बघायलाच उत्तम आहे. यात पोहण्याची रिस्क घेऊ नये. त्याकरता जवळचा दिवेआगरचा किनारा सेफ. अर्थात समुद्रात कधीच रिस्क घेउ नये. तर तो प्रदक्षीणा मार्ग तर अत्यंत वाईट. इथे नेहेमी भरती ओहोटी व गावकर्यांचा सल्ला ऐकुनच जावे. कधी लाट येऊन कुणाला घेऊन जाईल सांगता येत नाही. त्यात त्त्या खडकात झालेल्या कपारींमुळे जीव वाचण्याची शक्यता शुन्य. असे अनेक प्रसंत तिथे घडले आहेत.
भन्नाट फोटो आणि माहिती. प्रचि
भन्नाट फोटो आणि माहिती.
प्रचि ८ - साधी नेहमी पाहण्यात असलेली गोष्ट जिप्सीच्या कॅमेरातून अधिक सुंदर कशी दिसू शकते याचं उदाहरण !
जिप्सींचे काढलेले फोटो नी
जिप्सींचे काढलेले फोटो नी त्यांचा कॅमेरा पळवायला मला कोण मदत करायला तयार आहे ?<< जिप्स्यालाच पळवून नेउ या ना !!
प्रची एकदम मस्त
तो जिना उतरल्यावर बाजुला एक खोबण आहे तिथे गोड्या पाण्याचा झरा आहे
जिप्सींचे काढलेले फोटो नी
जिप्सींचे काढलेले फोटो नी त्यांचा कॅमेरा पळवायला मला कोण मदत करायला तयार आहे ?<< जिप्स्यालाच पळवून नेउ या ना !!
आयला ही पण आयडीया भारीए !
छान फोटो. कांदापोहे यांच्याशी
छान फोटो.
कांदापोहे यांच्याशी सहमत!
हरिहरेश्वरचा समुद्र लाटांनी झिजलेल्या खडकांमुळे अत्यंत धोकादायक आहे, पोहण्याचा इथे अजिबात प्रयत्न करु नये.
हं .. हरिहरेश्वर .. मस्त
हं .. हरिहरेश्वर .. मस्त आठ्वणी आहेत इथल्या ..
चांगले दिवस होते
मित्रमैत्रीणींनी ठरवल कि कुठतरी फिरायला जाऊ .. मग ठरल की कोकणकिनारा .. स्पॉट ठरवले पहिला गणपतीपुळे आणि मग रत्नागिरीच्या श्रद्धा ला विचारु उरलेसुरले..
अशा तर्हेने त्या दिवशी सायंकाळी पाच पर्यंत स्पॉटफिक्सींग करुन रात्री १० ला गाडी ठरवून त्याच रात्री १२ वाजता आम्ही ६ जण पुण्याच्या बाहेर पडलो ..
गणपतीपुळे नंतर हरिहरेश्वर करुन परत पुणे ..
माझे पण काही प्रचि तिथले :
रत्नागिरी ते हरिहरेश्वर सकाळचा प्रवास करताना मधे एक खाडी पार करताना एक नाव दिसली ..
समोरचा समुद्र काळ्या दगडांवरून :
पायर्या :
आम्ही गेलो त्यावेळी भरतीची वेळ होती .. :
हे आम्हीच :
चांगले दिवस यासाठी की त्यानंतर आम्ही ६ कधीच एकत्र कुठ गेलो नै की भेटलोसुद्धा नै.. सगळा ग्रुप एका मुर्ख मुलीपायी फुटला .. पण ते दोन दिवस मात्र संस्मरणीय होते ..
वाईट म्हणजे आल्यानंतर काही दिवसांनी माझ्या बाजुला बसणारा ११ १२वीतला क्लासमेट तिथल्याच समुद्रात मरण पावला .. ते पण सहा लोकं तिथ गेले होते पैकी तो आणि आणखी एक मुलगी मरण पावली .. तिच प्रेतसुद्धा तिच्या घरच्यांना सापडलं नै
भन्नाट फोटो आणि माहिती.
भन्नाट फोटो आणि माहिती.
व्वा, छान फोटो व माहिती!
व्वा, छान फोटो व माहिती! धन्यवाद.
(शिंचे हे देवळाच्या परिसरातही फोटो काढायला बंदी का करतात काय कि...... परवा थेऊरलाही तसेच. कुणी मूर्तिचा काढु नका म्हणले (तसबिरींचा धंदा बुडेल म्हणुन) तर समजू शकते, पण बाकी गोष्टींचाही नाही काढायचा? नव्याने आचरट प्रथा/परंपरा सुरु होताहेत या )
मस्त फोटो. मी दोन-तीन वेळा
मस्त फोटो. मी दोन-तीन वेळा हरिहरेश्वरला जाऊन आले आहे. प्रदक्षिणासुद्धा एकदा केली आहे. खरोखरच फार नयनरम्य परिसर आहे!!
कांदापोहे +१. हरिहरेश्वरचा समुद्र अजिबात सेफ नाही. त्याचप्रमाणे प्रदक्षिणासुद्धा भरती ओहोटीचे गणित बघूनच आणि स्थानिक लोकांना विचारूनच करावी.
आहाहा! अप्रतिम फोटो. साधी
आहाहा! अप्रतिम फोटो.
साधी नेहमी पाहण्यात असलेली गोष्ट जिप्सीच्या कॅमेरातून अधिक सुंदर कशी दिसू शकते याचं उदाहरण ! + १११११
प्रचि १ २ ८केवळ अप्रतिम.
प्रचि १ २ ८केवळ अप्रतिम. जिप्सी अत्यन्त सुन्दर फोटो रे. धन्यवाद !
फारच सुन्दर.... लेख आणि
फारच सुन्दर.... लेख आणि प्र.चि. पणः)
खूप छान. खडकांचे आकार मस्त.
खूप छान. खडकांचे आकार मस्त. आणि त्यात झालेल्या जाळ्यांमुळे अजूनच छान.
आम्ही गेलो होतो त्यावेळी
आम्ही गेलो होतो त्यावेळी म्हसळा, " मिनी पाकिस्तान" म्हणून फेमस होते.
हरी आणि हर.. सहसा एका जागी असत नाहीत, ते इथे आहेत. तसेच इथे अस्थिविसर्जनासाठी पण जातात.
Pages