स्वीट दही ( स्वीट कर्ड )

Submitted by मनीमोहोर on 10 May, 2015 - 12:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उन्हाळ्यात जेवण झालं की बाहेर एक चक्कर मारताना पाय आपोआपच ऑफिस च्या जवळ असलेल्या मेहेर या अगदी छोट्याशा कोल्ड्रिंक हाऊस कडे वळतात, जिथे लंच टाईम मध्ये अनेक जण लस्सी, ताक आणि हे वर लिहीलेलं स्वीट दही खात असतात. काचेच्या छोट्या ग्लासात विरजलेलं, बेताच गोड, थंड, घट्ट, पांढर शुभ्र दही उन्हाळ्यात खाताना जणुं स्वर्गीय सुखाचा आनंद्च मिळत असतो प्रत्येकाला. ह्या दह्यापासून प्रेरणा घेऊन मी तसं दही घरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला म्हणून इथे लिहीत आहे. कृती तशी अगदी सोपी आहे
साहित्य
१/२ लिटर होल मिल्क (मी गोकुळ घेतले )
चार मोठे चमचे साखर
दोन छोटे चमचे डेअरी व्हाईट मिल्क पावडर
विरजणासाठी दही
थोडे बदाम पिस्त्याचे काप आणि दुधात भिजवलेलं केशर (ऐच्छिक )

क्रमवार पाककृती: 

प्रथम दूध उकळून घ्यावे . त्यात साखर घालावी. दुधाचं पातेलं पाण्यात ठेऊन आणि येता जाता ढवळत राहुन ते विरजणाला योग्य अशा तपमानाला आलं की त्यात दूध पावडर मिक्स करावी आणि नॉर्मल आंबट अर्धा चमचा दही त्यात नीट मिसळावे. आता हे दूध आपल्याला आवडत असेल त्या आकाराच्या ग्लास मध्ये ओतावे. एका परातीत पाणी घालुन त्यात हे ग्लास सेट होण्यासाठी ठेऊन द्यावेत. मी सकाळी अकराला विरजण लावल आणि संध्याकाळी चारला दही सेट झालं . खाण्या आथी हे दही कमीत कमी चार पाच तास फ्रीज मध्ये ठेवावे . आपल्याला आवडत असेल त्या ड्राय फ्रूट ने सजवावे. काही न करता पांढर शुभ्र ही छान दिसतं

हा फोटो

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एकेक ग्लास ( छोटा)
अधिक टिपा: 

श्रीखंडाच्या आणि ह्याच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक आहे.
श्रीखंडा प्रमाणे हे पोटाला जड होत नाही.
होल मिल्कच वापरावे.
अर्ध्या लिटर दुधाचे सहा ग्लास ( शॉर्ट ग्लास) तयार झाले.
साखर व्यवस्थित घालावी कारण दही थोड तरी आंबट असतच आणि गार झाल्यावर पदार्थाची गोडी कमी होते थोडी.
डेअरी व्हाईट मुळे दही मस्त घट्ट होतं त्यामुळे ती घालणंआवश्यक आहे.
कमीत कमी चार पाच तास फ्रीज मध्ये ठेवावे म्हणजे अधिक घट्ट होते अणि थंडगारच खावे.
हे एक उत्तम प्रकारचे डेझर्ट होईल.
सजावटी साठी पुदिन्याचे पान ही छान दिसेल.
ड्राय फ्रुट जास्त घालु नयेत . एकसुरी पांढरा रंग मोडण्या पुरतीच घालावीत.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दही म्हणजे जीव की प्राण ... म स्त प्रकार... न क्की क र णा र ..
सगळ्यांचे वेरीयेशन्स छानच..
श र्मीला सांग तायत तो प्रकार खुपच इन्टरेस्टींग वाटतोय

ममो मस्त रेसिपी, उन्हाळ्यात हमखास बनवली जाते पण स्टीलच्या टोपात. ग्लासची आयडीया मस्त. मातीच्या कुल्हडमध्ये एकदा ट्राय करते.

धन्यवाद परत एकदा सर्वांना. सायली, तुझ्या प्रतिसादाची मी वाट बघत होते ( स्मित)

हे फोटोत दिसत आहे आकर्षक , पण चव समजत नाही फोटो पाहुन. याची चव खूपच सुंदर असते. उन्हाळ्यात असं पांढरं शुभ्र, मऊ मुलायम, घट्ट, गोड, दही जेवणानंतर जिभेवर रेंगाळवताना अक्षरशः स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. संपल की वाईट वाटत या वयातही ( स्मित)

आरती,, ग्लास मध्ये लावल की देताना छान दिसत. आणि घेणार्‍याला ही छान वाटतं. तो एक प्रेझेंटेशन्चा भाग आहे. चवीत नाही काही फरक पडणार. मुलं लहान असताना रोजच दही ही मी वेगवेगळ्या वाट्यात दही लावत असे. प्रत्येकाला सेपरेट वाटी ( स्मित)

मस्त रेसिपी ...माझाकडे दिपची मावा मिल्क पावडर आहे ती लावली दुधाला तर ..चवीत बदल होईल का ? कोणी करुन पाहिलेय का ?

हेमा ताई. .. नवर्‍या कडुन पहिल्या चमच्यातच भुवया उंचाउन दाद मिळाली.... खुप खुप ध न्य वाद एका सोप्या पण भ न्नाट डेझर्ट रेसीपी साठी....
आणि हो, हा फोटो आणि स्वीट कर्ड हे लेकीने स्व त हा केलय बरका... लेक धन्स म्हणतेय तुम्हाला... Happy
उ.ंमोदक आणि अ न न स साखर आंब्यामुळे तुम्ही आमच्या घ री फेमस आहात....:)
Photo3752.jpgPhoto3753.jpg

मस्त!
माझ्या ताक खूप आवडीचे, दही तितकेसे नाही.
हल्ली गरमीत तर ताक रोजचेच झालेय, पण दुर्दैवाने दिवसा नाही तर रात्रीच प्यावे लागते (आणि रात्री ताक पिऊ नये असे म्हणतात Sad ).
पण गेले काही दिवस एक आंबट फिलींग येतेय त्यामुळे ताक पिणे थांबवलेय, अन फार बेचैन आहे.
तर आता अचानक हा धागा बघून मस्त गोड अन वेगवेगळ्या फ्लेवरचे दही ट्राय करायला हरकत नाही असा विचार मनात आला.. त्याबद्दल धन्यवाद.. तेवढेच ताकाची तहान दह्यावर .. यातले काही सोपे सोपे प्रकार तर मी देखील करू शकेन असे वाटतेय..

वर्षु, धन्यवाद. मी ही आता वेगवेगळी वेरिएशन्स ट्राय करणार आहे. मस्त आहेत सगळीच.

सातु, ती मावा मिल्क पावडर काय असते ते मला माहित नाही. मिल्क पावडर घालायची ती दही घट्ट होण्यासाठी त्यामुळे ती चालेल असं मला वाटतय. करुन बघा आणि इथे सांगा.

सायली, धन्यवाद ग. तु प्रतिसाद इतके छान लिहीतेस की काय सांगु?
तु, .... नाही नाही, तुझ्या लेकीने हे दही तयार केले आणि घरी सगळ्यांना आवडले म्हणुन मलाच फार छान वाटते आहे. तुझ्या लेकीचं खूप कौतुक आहे हं !! भरतकाम, वेगवेगळ्या रेसिप्या कमाल आहे. फोटो ही छान काढला आहे.

ॠन्मेष, बघ जणु मला तुझा प्रॉब्लेम समजला आणि मी ही रेसिपी लोड केली. (स्मित ) ताक पिऊन त्रास होत असेल हे ट्राय करुन बघ. .

जुन्या लिखाणावर कुणाचा तरी प्रतिसाद आला पाहिजे तर दिसेल माझा प्रोफाईल फोटो ! >>> हा घ्या! दिला प्रतिसाद!!!

अपर्णा धन्यवाद .
सचिन, तुम्हाला ही धन्यवाद लगेच प्रतिसाद दिलात, त्यामुळे प्रोफाईल फोटो बघायला मिळाला.

ममो, मस्त रेसिपी. खावंसं वाटतंय अगदी आत्ता करुन. पण इथल्या हवेला विरजण इतकं घट्ट लागणार नाही आणि किती दिवस लागतील सेट व्हायला काय माहित?!

सायो,पद्मावती धन्स .
आता उन्हाळा आला. बनवा हे दही खा आणि व्हा गारेगार.

अरे अरे काय हे माझे रेप्युटेशन Happy
सायो नीट निगुतीने होल मिल्क तापवून, मग त्यात मिल्क पावडर, केशर, साखर( कमी पडली माझ्यामते ) ढवळून मग ते मिश्रण डेकोरेटिव काचेच्या बोल्स मध्ये ठेउन विरजलं दही. ड्रायफूट मात्र नाही घातली. दह्यात नको वाटतात.

काल हे गोड दही बनवले. दही विरजतानाच केशराच्या काड्या घातल्याने पुर्ण दह्याला केशराचा स्वाद आला. खुपच यमी झाले होते. झटपट आणि बेताचं गोड असल्याने सगळ्यांना आवड्ले. थॅन्क्यु मनीमोहोर या रेसिपी साठी.
मी लो फॅट दुध वापरले होते आणि फुल्ल फॅट मिल्क पावडर, तरीही छान घट्ट दही लागले.

शुम्पी, मनी, चंचल फोटो दाखवा ना असला तर . शुम्पी, ह्यात थोडेसे ड्राय फ्रुट छानच लागतात पुढल्या वेळी घालून बघ.
मी पण करते आता हे दही , बरी झाली आठवण ,उन्हाळा झालाच आहे सुरु आता इथे .
हे एक मस्त डेझर्ट आहे . करायला फार सोपं आणि खाणाऱ्याला वाटत काय भारी केलंय आपल्यासाठी ( स्मित ). फक्त डेकोरेटिव्ह ग्लास मध्ये दिलं कि झालं . strike>

Pages