लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका
खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥
शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥
घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला
तुमच्या लेकीसूना घेऊन, नाचासाठी या ...॥
इलंक्शनच्या टायमाले, थैल्या ढिल्या करतो
नाक लाजिम करण्यासाठी, चिमटीमध्ये धरतो
तवा कुठं भूमीग्रहण, कायदा येत असते
पैशाबिगर कोणालेच, 'अभय' मिळत नसते
उचला आता धोपटी-बिर्हाड, अन चालते व्हा ...॥
- गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------------
छान.
छान.
जळजळीत वास्तववादी कविता
जळजळीत वास्तववादी कविता
झ्याक! अस्सल वऱ्हाडी तडका!
झ्याक! अस्सल वऱ्हाडी तडका!
m मॉदीप्रेमी लोक आल नाहीत
m
मॉदीप्रेमी लोक आल नाहीत
मस्त जमली
मस्त जमली
मुटे सर, आजच्या परिस्थितीत
मुटे सर, आजच्या परिस्थितीत एकदम वास्तववादी तडका.
धन्यवाद. सर्वाचे आभार.
धन्यवाद.
सर्वाचे आभार.